‘देहदान चळवळीला वाहून घेतलेल्या पुरुषोत्तम दादा हे दानी कुटुंबातील मंडळींना अत्यंत कठीण प्रसंगात धैर्य व संवेदनशीलता दाखवतात त्यामुळे हा विचार आज सर्वदूर विचारातून प्रसारात विलीन झाला आहे अर्थात ” फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी फ़ेडरेशन”चे अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ (दादा) पवार – पाटील हे बाहेरगावी प्रवासात असतानाही ते नेत्रदान -देहदान करणाऱ्या कुटुंबाच्या सतत संपर्कात राहून मार्गदर्शन करतात आणि हेच त्यांच्या सामाजिक बांधिलकी व मानवी दृष्टीकोन जपण्याचा मानस राहिला आहे .
होय हेच मूळ कारण आहे की आज ही दादांची ही देहदान चळवळ सर्वदूर पसरली आहे पालघरच्या सज्जनराजजी सुध्दा याचे एक उत्तम उदाहरण आहे !
वसई :- आशिष राणे
दि. ०४ जुलै २०२५ रोजी, शुक्रवार चा दिवस उजाडला आणि पालघरचे रहिवासी सज्जनराज सुखराज चाणोदिया (जैन, वय ६०) यांचे अचानक हृदयविकाराने निधन झाले. अशा कठीण प्रसंगीही त्यांच्या कुटुंबीयांनी धैर्य व संवेदनशीलता दाखवत अक्षरशः नेत्रदानाचा असा महत्त्वाचा निर्णय घेतला.
कुटुंबातील मित्रांनी तात्काळ फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनशी संपर्क साधला, नालासोपारा येथील कार्यकर्ते सागर वाघ यांनी तातडीने रिद्धी विनायक हॉस्पिटल येथे डॉ. विठ्ठल निकम यांच्या टीमला पाठवून नेत्रसंकलन (कॉर्निया रिट्रायव्हल) प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. हे नेत्र पुढे ठाणे येथील सहियारा आय बँक येथे पाठवण्यात आले.
या प्रेरणादायी निर्णयात दीपक चाणोदिया, त्यांच्या परिवारातील सदस्य, पालघर जैन युवक मंडळ व व्यापारी मित्रांनी भावनिक स्थैर्य आणि सेवाभाव दाखवला. या नेत्रदानातून किमान २ आणि कदाचित ४ अंध व्यक्तींना आयुष्यभरासाठी प्रकाश मिळू शकणार आहे.
या महत्त्वाच्या कार्यात नरेंद्र गाला, अनिल मेकाले, हरीश, सागर वाघ, अरुण जैन, राकेश जैन (बोईसर) यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.
बाहेरगावी प्रवासात असूनही सतत मार्गदर्शन करणारे फेडरेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार पाटील यांचे सहकार्यही अत्यंत मोलाचे ठरले आज सज्जनराजजी आपल्यात नाहीत, त्यांची काया भस्म झाली. पण त्यांच्या डोळ्यांतून प्रकाशाची ज्योत इतरांच्या जीवनात उजेड पेरणार आहे हे केवळ नेत्रदान नव्हे, तर मानवतेचा एक उज्ज्वल आदर्श आहे.
सज्जनराजजींना विनम्र श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोटी कोटी धन्यवाद दिल्याची माहिती फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी जिल्हा पालघर चे समन्वय: नरेंद्र गाला यांनी दिली
✍🏻देहदान -नेत्रदान साठी खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करा आणि चळवळी ला हातभार लावा !
समन्वय: नरेंद्र गाला
फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन
पालघर जिल्हा सह-समन्वयक
📞 ९३७२२३४००५
![]()
