इयत्ता ८ वी पासूनच संविधान विषयाचा अभ्यासक्रमात समावेश : ग्लोबल स्कूलचां अनोखा मात्र देशासाठी आदर्श उपक्रम..
मात्र दुर्देवाने फक्त कायदे पंडितांनाच संविधानाचं ज्ञान आहे, त्यांच्या व्यतिरीक्त पदवीधर आणि विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्यांना ही त्याची परिपुर्ण माहिती नाही. त्यामुळे चांगले नागरिक होण्यासाठी संविधानाचा अभ्यास खूपच महत्वाचा असणार आहे.संविधानाच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना आपले अधिकार कळतील आणि त्यातूनचं एक चांगली व शिक्षित पिढी घडण्यास मदत होईल अर्थात ही बाब लक्षात घेवूनचं यश विद्या निकेतन शाळेने ईयत्ता ८ वी पासून या संविधानाचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे हे फार स्तुत्य उपक्रमशील आहे.
माजी महापौर राजीव पाटील यांनी बुधवार दि. २६ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या संविधान कार्यक्रमा विषयी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली..
वसई :- आशिष राणे
चांगले नागरिक होण्यासाठी धार्मिक ग्रंथा इतकांच भारताच्या संविधानाचा अभ्यास अत्यावश्यक असल्याचे परखड मत वसई-विरार शहर महानगर पालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांनी विरार येथे व्यक्त केले.
पद्मश्री रमेश पतंगे लिखित आपले संविधान या पुस्तकाच्या मराठी आणि इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन उद्या बुधवार दि.२६ नोव्हेंबरला विरारच्या यश विद्या निकेतन ग्लोबल स्कूल येथे होणार आहे.
याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख आणि ॲड.सुरेश कामत यांच्यासह भारताच्या संविधानाचा अभ्यास असलेल्या काही प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यक्रमात संविधान याविषयावर विद्यार्थ्यांची एक स्पर्धा हीं आयोजित करण्यात आली असून,त्यात २१ शाळांमधील १४८ विद्यार्थ्यांनी भाग घेतल्याची माहिती डाॅ.अर्चना कुलकर्णी यांनी दिली.
तसेच या एकूणच कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी यश विद्या निकेतन शाळेत सोमवारी सकाळी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी माजी महापौर राजीव पाटील,विवा काॅलेजचे सचिव संजीव पाटील,माजी नगरसेवक हार्दीक राऊत,डाॅ.अर्चना कुलकर्णी आणि स्विडल बंगाळे आदी प्रमुख मान्यवर मंडळी पत्रकार परिषदेला आवर्जून उपस्थित होती.
या पत्रकार परिषदेत राजीव पाटील यांनी संविधान कार्यक्रमा बाबत माहिती देताना स्पष्ट केलं की,गिता,कुराण,महाभारत,बायबल या धर्म ग्रंथाइतकेच भारतीय संविधानाला महत्व आहे.
मात्र दुर्देवाने फक्त कायदे पंडितांनाच त्याचे ज्ञान आहे.त्यांच्या व्यतिरीक्त पदवीधर आणि विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्यांना ही त्याची परिपुर्ण माहिती नाही. त्यामुळे चांगले नागरिक घडवण्यासाठी संविधानाचा अभ्यास महत्वाचा असणार आहे.संविधानाच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना आपले अधिकार कळतील,त्यातूनचं एक चांगली व शिक्षित पिढी घडण्यास मदत होईल.
ही बाब लक्षात घेवूनचं यश विद्या निकेतन शाळेने ईयत्ता ८ वी पासून संविधानाचा अभ्यासक्रमात समावेश केल्याची माहिती यावेळी राजीव पाटील यांनी माध्यमांना दिली.
दरम्यान या कार्यक्रमात दोन्ही पुस्तक प्रकाशनानंतर मराठी आणि इंग्रजी भाषेत वकृत्व,निबंध,पोस्टर बनवणे आणि न्यूज ॲंकरींग सारख्या विविध स्पर्धा देखील घेण्यात येणार असल्याची माहिती डाॅ.कुलकर्णी यांनी शेवटी दिली.
![]()
