यावेळीही परिवर्तनाची लाट….येता येता ओसरली..
फुकटचां सल्ला नको मात्र केवळ आपल्या कृतीशील कामावर अधिक भर दिला पाहिजे असे म्हणत, मागील वेळेपासून संघाने हाती घेतलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत वजा एकां स्वप्नपूर्तीच्या कामात कुठेही खंड पडू नये,त्यामुळे आपण आपल्यात कुठलीही निवडणूक नं करता सर्वांनी अधिक जबाबदारीने एकसंघ वृत्तीनं कार्यकारणीस सहकार्य केले पाहिजे असे आवाहन सर्व सदस्यांनी करत नव्या कार्यकारणीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
वसई :- आशिष राणे
सल्ला नको मात्र प्रत्यक्ष कृतीवर अधिक भर देत पालघर जिल्ह्यासह संबंध वसई तालुक्यात आपल्या कामातून एक वेगळी ओळख गेली दोन दशकाहून अधिक काळ निर्माण केलेल्या वसई तालुका पत्रकार संघ (रजि) यांची त्रेवार्षिक कार्यकारिणी निवडणूक पुन्हा तिसऱ्या वेळी हीं बिनविरोध पार पडली आहें.
वसई तालुका पत्रकार संघाच्या या त्रेवार्षिक निवडणुकीत पुन्हा तिसऱ्या वेळी अध्यक्ष पदी संदीप पंडित व सचिव म्हणून आशिष राणे यांची एकमताने निवड झाली आहें.
तर खजिनदार अरुण सिंग, उपाध्यक्ष म्हणून भरत म्हात्रे आणि कार्यालय प्रमुख पदी नितांत राऊत यांची कार्यकारणीवर बिनविरोध निवड झाली.
शनिवार दि.२९ नोव्हेंबर २०२५ रोजी विरार कणेर फाटा येथील एका फार्म वर वसई तालूका पत्रकार संघाच्या वार्षिक सर्व साधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी नवी कार्यकारणीची त्रेवार्षिक निवडणूक प्रक्रिया देखील पार पडली.
दरम्यान निसर्गाच्या सानिध्यात तथा खेळीमेळीच्या वातावरणात हीं संघाची वार्षिक सर्व साधारण सभा व निवडणूक प्रक्रिया पत्रकार संघाने निरीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शासनाचे निवृत्त माहिती अधिकारी तथा जेष्ठ पत्रकार निरंजन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
यावेळी पत्रकार संघाचे सदस्य- पदाधिकारी असे सर्वश्री संदीप पंडित, आशिष राणे, अरुण सिंग, भरत म्हात्रे, नितांत राऊत, विवेक पाटकर, किरण पाटील, शिवकुमार शुक्ला, नरेंद्र पाटील आणि जेष्ठ पत्रकार निरंजन राऊत उपस्थित होते
निरीक्षक निरंजन राऊत यांनी बिनविरोध कार्यकरणी घोषित केल्यावर अध्यक्ष संदीप पंडित यांनी उपस्थित सर्व सदस्य आणि निरीक्षकांचे आभार मानले मानले,

माझी आपण पुन्हा तिसऱ्या वेळेस हीं अध्यक्ष पदी निवड केल्याने माझ्यासह सर्वांची जबाबदारी वाढली असून संघास एकसंघ ठेवण्याचं काम नेहमीच माझ्याकडून होईल, असे पंडित यांनी सांगितले,

तर नक्कीच आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच मी मागील दोन टर्म चांगले काम केले. तर एक उत्तम प्रशासक म्हणून हीं पोचपावती असल्याचे सचिव आशिष राणे यांनी सांगितले.

तर शेवटी निरीक्षक निरंजन राऊत यांनी सांगितले की, संघाच्या साथीने पदाधिकारी सर्वोत्तम काम करत असल्यानेच हीं निवडणूक बिनविरोध झाली हेच या संघाचे यश आहें.
यावेळी किरण पाटील, शिवकुमार शुक्ला, अरुण सिंग, भरत म्हात्रे, विवेक पाटकर आणि नरेंद्र पाटील यांनी आपले संघाप्रति मुक्त असे विचार मांडले आणि स्पष्ट केलं की मागील वेळेपासून संघाने हाती घेतलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत वजा एकां स्वप्नपूर्तीच्या कामात कुठेही खंड पडू नये त्यामुळे आपण कुठलीही निवडणूक नं करता सर्वांनी अधिक जबाबदारीने एकसंघ वृत्तीनं कार्यकारणीस सहकार्य केले पाहिजे असे आवाहन करत नव्या कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या.
![]()
