पालघर जिल्ह्यातील मुलींची नांदेड मध्ये चमकदार कामगिरी…

 

राज्यस्तरीय थ्रो बॉल ⚽ स्पर्धेत पालघर जिल्हातील मुलींची चमक : नांदेडचं मैदान हीं गाजवलं…✅

( प्रायोजक लोगो )

वसई/नांदेड :- क्रिडा बातमीदारांकडून

पालघर जिल्हा थ्रो बॉल स्पर्धेत अंडर १४ मुलींच्या संघाने प्रथमच महा थ्रो बॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

‘थर्ड सब ज्युनिअर स्टेट थ्रो बॉल चॅम्पियनशीप’ साठी सदर स्पर्धा झाली होती. ही स्पर्धा दिनांक २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान नांदेड येथील तालुका स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सिडको-नांदेड येथे संपन्न झाली.

पालघर जिल्हा थ्रो बॉल संघामध्ये कांदबरी काळे (कर्णधार), अहना ढेकले (उपकर्णधार), इशिता यादव, आरूषी चौरसिया, किया खान, मिरा सुवर्णा, शैवी जाधव, विरजा पाटील, याना पंचाल, याना पुरोहित, स्वरा येवले व मायरा तावडे या खेळाडु मुलींचा समावेश होता.

संघाचे प्रशिक्षक म्हणून मयुरेश कमळाकर वालम, कौशिक राजू सामबार यांनी काम पाहिले.

या संघाचे प्रायोजक अश्विन पंचाल (विसावा रिसॉर्ट-पनवेल) व पालक होते. विजेत्या संघाचं पालघर थ्रो बॉल असोसिएशनचे सुरेंद्र गमरे यांनी विशेष कौतुक केलं आहे.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!