१० नवीन टाक्यासह,सनसिटी व आनंदनगरात २ नवीन उंच टाक्यांची उभारणी : या कामांतर्गत २०० ते ८०० , ७०० ते १२५० , ३०० ते ८०० एम.एम अशा विविध प्रकारच्या व्यासाच्या जलवाहिनीचे काम चालू आहे व काही ठिकाणी कामें प्रगतीपथावर आहेत.
त्याचसोबत पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम देखील होत आहेत विशेष म्हणजे शहरात १० नवीन पाण्याच्या उंच टाक्या होणार आहेत त्यात ५ ते १७ लक्ष लिटर्स क्षमतेच्या टाक्याचां समावेश आहे

वसई :- आशिष राणे
वसई पश्चिमेस नवघर माणिकपूर परिसरात अमृत योजनेंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली असून यासंदर्भात माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश आले आहें.
दरम्यान वसईतील सनसिटी व आनंद नगर परिसरात दोन उंच पाण्याच्या टाक्या लवकरच उभारल्या जाणार आहेत याचे काम प्रगतीपथावर आहे त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला पुरेशा दाबाने व नियमित पाणी उपलब्ध होणार आहे.

Adv ✅
अधिक माहितीनुसार,केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेंतर्गत वसई विरार शहरातील वितरण व्यवस्था बळकटीकरता व विस्तारिकरण करण्याच्या कामाचे एकंदर ४९४ कोटी रुपयाचे कामाचे भूमिपूजन बविआ अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते बाभोळा येथे करण्यात आले होते.
त्याप्रसंगी माजी महापौर नारायण मानकर,प्रविण शेट्टी, माजी सभापती, अनेक नगरसेवक उपस्थित होते.

एकूणच माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या अमृत योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता,त्यानुसार आता यां कामाला मंजुरी मिळाली आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन झाले, त्यानंतर टप्प्याटप्प्याने कामास सुरुवात करण्यात आल्याचे माजी महापौर नारायण मानकर यांनी सांगितले.

याप्रकरणी अधिक बोलताना मानकर यांनी स्पष्ट केलं की, या कामांतर्गत २०० ते ८०० , ७०० ते १२५० , ३०० ते ८०० एमएम अशा विविध प्रकारच्या व्यासाच्या जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर चालू आहे व काही ठिकाणी कामें प्रगतीपथावर आहेत.
त्याचसोबत पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम देखील होत आहेत विशेष म्हणजे शहरात १० नवीन पाण्याच्या उंच टाक्या होणार आहेत त्यात ५ ते १७ लक्ष लिटर्स क्षमतेच्या टाक्याचां समावेश आहे

नवघर-माणिकपूर शहरात सनसीटी परीसरात ७.५० लक्ष लिटर क्षमतेची टाकी व आनंदनगर परीसरात ७.५० क्षमतेची उंच टाकी होणार आहे. वरील दोन्ही टाक्यांमुळे नवघर -माणिकपूर परीसरातील १०० फुटी मार्ग सनसिटी परीसर व इतर ठिकाणी वाढणाऱ्या परीसरात चांगल्या प्रकारे पाणीपुरवठा होणार आहे. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे हे प्रयत्न असून यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
नारायण मानकर – माजी महापौर
———–
———–
![]()
