माजी महापौर  नारायण मानकर यांनी केली वसई उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी : पर्यायी रस्ता पूर्ववत ठेवा

 

वसई पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या जून्या पुलाचा पर्यायी रस्ता पूर्ववत ठेवा
—-✅ माजी महापौर नारायण मानकर 

खाडीवरचा पूल रेल्वेकडून करण्यात येणार असल्याने वसई विरार शहर महापालिकेच्या खर्चाची बचत, वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे.

पूर्वी जुन्या पुलाजवळ,पेट्रोल पंपाजवळ उतरण रस्ता होता. परंतु नवीन पुलाच्या बांधकामाच्या वेळी हा उतरण रस्ता कायम ठेवण्यात आलेला नाही,यामुळे नवघर औद्योगिक वसाहतीतील नागरिक, कामगार व कारखानदार यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असून वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे, तर वसई रोड पश्चिमेतून  पूर्वेला जाण्यास सिग्नलच्या अलीकडे मोठी जागा उपलब्ध असल्याने तिथे पुलाची उतरण दिल्यास पश्चिमेकडून पूर्वेला जाण्याचा मार्ग मोकळा होईल अशी विनंती माजी महापौर नारायण मानकर यांनी केली आहे.

वसई :- आशिष राणे

वसई येथील रहदारीसाठी असलेल्या जुन्या उड्डाणपुलाचे काम रेल्वेकडून सुरु करण्यात आले आहे, मात्र हा पूल तयार करताना प्रवाशांना सुखदायी प्रवास करता यावा, आणि वाहतूक कोंडी समस्या सुटावी यासाठी रेल्वे,पालिका प्रशासना सोबत माजी महापौर नारायण मानकर,माजी विरोधी पक्षनेता विनायक निकम यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे माजी लोकप्रतिनिधी व शिवसेना  पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.यावेळी प्रवाशांच्या सुविधा मिळावी यासाठी प्रशासनाला सूचना करण्यात आल्या.

वसई इंडस्ट्रीयल असोसिएशनने माजी महापौर नारायण मानकर यांना देखील पुलासंबंधी येणाऱ्या अडचणी बाबत पत्र दिले होते, त्यापत्रानुसार, पुर्व-पश्चिम पुलाचे काम सुरू आहे.

पूर्वी जुन्या पुलाजवळ उतरण रस्ता होता. रेल्वे कॉर्पोरेशनकडून नवीन पुलाची रचना अंतिम  झाली आहे. सदर नवीन पुलाचे बांधकामाचा रचनेनूसार जून्या पुलाजवळ असलेला रस्ता रद्द  केला आहे.

मात्र सिग्नलच्या अलीकडे मोठी जागा उपलब्ध आहे. सदर जागेत पूर्वेकडून पश्चिमेला जाण्याचा रस्ता बनविला तर नवघर वसाहतीतील नागरिकांना, कामगारांना व कारखानदारांना सोयीचे होईल.तसेच ट्रॅफिकची समस्या दूर होईल असे नमूद करण्यात आले

याबाबत बविआ अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर नारायण मानकर यांनी जिल्हाधिकारी तथा वसई विरार शहर महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड , तसेच रेल्वे अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला त्यानंतर रेल्वे अधिकारी , महापालिका अधिकारी तसेच माजी महापौर नारायण मानकर ,वसई इंडस्ट्री असोशिएशनचे अध्यक्ष अनिल अंबर्डेकर ,सचिव फ्रान्सिस फर्नांडिस , खजिनदार .प्रशांत बागर  तसेच शिवसेनेचे नेते विनायक निकम , राजाराम बाबर , उदय चेंदवणकर ,माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज , माजी सभापती उमा (वृन्देश) पाटील आदींनी प्रत्यक्ष जाऊन या पुलाच्या कामाची पाहणी केली.

वसई येथील खाडीवरचा ब्रिज ३६ मीटर लांब असणार आहे तर  जुना उड्डाणपूल दीड मीटर उंच करण्यात येणार आहे याठिकाणी खाडीचा गाळ, तसेच सुरु असलेल्या पुलाचे काम पाहता मलबा निघणार आहे. त्यामुळे खाडीची स्वच्छता करावी जेणेकरून पावसाळी पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल तसेच स्मशानभूमी रस्ता तयार करून सुसज्ज करणे, पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यास रस्ता करावा अशा सूचना माजी महापौर नारायण मानकर यांनी यावेळी केल्या,

खाडीवरचा पूल रेल्वेकडून करण्यात येणार असल्याने वसई विरार शहर महापालिकेच्या खर्चाची बचत, वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे.
पूर्वी जुन्या पुलाजवळ, पेट्रोल पंपाजवळ उतरण रस्ता होता. परंतु नवीन पुलाच्या बांधकामाच्या वेळी हा उतरण रस्ता कायम ठेवण्यात आलेला नाही. यामुळे नवघर औद्योगिक वसाहतीतील नागरिक, कामगार व कारखानदार यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे, तर वसई रोड पश्चिमेतून  पूर्वेला जाण्यास सिग्नलच्या अलीकडे मोठी जागा उपलब्ध असल्याने तिथे पुलाची उतरण दिल्यास पश्चिमेकडून पूर्वेला जाण्याचा मार्ग मोकळा होईल अशी विनंती माजी महापौर नारायण मानकर यांनी केली आहे.
———–
रेल्वे कॉर्पोरेशनकडून नवीन पुलाची रचना (डिझाईन) अंतिम  झाली आहे. या रचनेत जुन्या पुलाजवळ असलेला उतरण रस्ता समाविष्ठ करावा. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या कोंडीच्या  समस्या कमी कराव्यात व  वसई पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या जून्या पुलाचा पर्यायी रस्ता पूर्ववत ठेवण्यात यावा यासाठी पत्र देण्यात आले जागेवर जाऊन पाहणी केली  

नारायण मानकर –  माजी महापौर
————
नवघर भागात औद्योगिक व रहिवासी अशी वस्ती आहे मात्र पूर्व पश्चिम भागात ये जा करण्यासाठी वाहनांची गर्दी निर्माण होत असते उड्डाणपूल तयार करताना वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे.

विनायक निकम – माजी विरोधी पक्षनेता

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!