आणि माजी आम. हितेंद्र (आप्पा ) ठाकूरांच्या टॉनिकने कार्यकर्त्यांना मिळाली भरीव ऊर्जा…!

आम्ही कधी विकासकामांची जाहिरात सोशल मीडियावर केली नाही आणि पक्ष कुठला ते सुद्धा नाही पाहिलं तर नागरिक व खास करून महिला सक्षमीकरणासाठी असंख्य कामे केली,आपल्या येथील महिला बाल कल्याण समितीच्या योजना अवघ्या भारतातील एकमेव चांगले उदाहरण आहे त्यात विद्यार्थ्यांच्या फी पासून ते विधवा महिलासाठी,मुलींसाठी योजना आणल्या या योजनेचे लोकांनी बऱ्यापैकी फायदे घेतले… आणि आता..
वसई :- आशिष राणे
प्रत्येक वेळी कार्यकर्ता हा जीव ओतुन काम करत असतो धडपड करतो निवडणुकीसाठी कोणता उमेदवार असावा हे मी नाही, तर माझा कार्यकर्ता ठरवणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतले जाणार आहे.
त्यामुळे आपसूकच इच्छुकांची मदार कार्यकर्त्यांवर आहे असे सूचक विधान बविआ अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जंबो अशा व्यासपीठावरूनच दिल्याने येणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्ता कोणता उमेदवार निवडणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
वसई पश्चिम माणिकपूर येथील वाय.एम.सी.ए सभागृहात बुधवारी सायंकाळी बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता,
यावेळी व्यासपीठावर बविआ अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या समवेत जेष्ठ नेते व माजी महापौर नारायण मानकर, प्रविण शेट्टी ,संदेश भाऊ जाधव, फ्रॅंक आपटे तसेच गुजराती समाजाचे हसमुखभाई शहा, उत्तर भारतीय नेते संतोष सिंह , वसई रोड जैन समाजाचे वसंतभाई वोरा, बसीन केरला समाजाचे पी.व्ही.के नम्बीयार , के.ओ. देवसी, तामिळ संगमचे शंकरा पांडियन ,ख्रिस्ती समाजाचे जेष्ठ नागरिक मायकल लोपीस तर मुस्लिम समाजाचे कल्लन खान, खोजा जमात खानाचे सिराज कमाल,उत्तरांचल समाजाचे जगदिश पाठक, कर्नाटक संगमचे विश्वनाथ शेट्टी, वर्धमान स्थानकवासी संघाचे मुकेश भाई, उत्तर भारतीय समाज संतोष सिंग, विश्वकर्मा समाजचे राजू विश्वकर्मा, पांडू शेट्टी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी आमदार हितेंद्र ठाकूर म्हणाले कि, आजपर्यंत अनेक योजना आणल्या नागरिकांच्या समस्या सोडवल्या कोट्यवधींची कामे शहरात केली, मात्र आता अनेक समस्यांनी नागरिकांना घेरले आहे. विकासकामांचे आश्वासन दिले जात आहे. मात्र ते पूर्ण होत नाही आगोदर अनेक खासदार , मंत्री झाले त्यांनी या भागासाठी नेमके कोणते काम केले याचा लेखाजोगा माझ्याकडे आहे. त्यामुळे जनतेने याचा देखील विचार करावा,माझा कार्यकर्ता हा कामाचे मुद्दे मांडण्यात सक्षम आहे.
आम्ही कधी विकासकामांची जाहिरात सोशल मीडियावर केली नाही तर पक्ष नाही पाहिला तर महिला सक्षमीकरणासाठी कामे केली,आपल्या येथील महिला बाल कल्याण समितीच्या योजना भारतातील एकमेव चांगले उदाहरण आहे. विद्यार्थ्यांच्या फी पासून ते विधवा महिलासाठी , मुलींसाठी योजना आणल्या या योजनेचे लोकांनी बऱ्यापैकी फायदे घेतले.
यावेळी गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच भारतीय महिला क्रिकेट मध्ये महिलांनी नाव उंचावले त्यांचे अभिनंदन केले.तर माजी महापौर नारायण मानकर यांनी गेल्या ३५ वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला मुबलक पाणी, सूर्या , उसगाव, पेल्हार ३८० एमएलडी पाणी येत आहे तसेच नव्या योजना देखील आणल्या आहेत सुसरी , खोलसापाडा , यासह अनेक योजनांतून भविष्यासाठी तजबीज केली आहे.
विद्युत पुरवठा योजनेचा पाठपुरावा केला त्यामुळे भारनियमन बंद झाले वाढती मागणी लक्षात घेता चिखलडोंगरी, कामण,सोपारा -विरार मध्ये पॉवर स्टेशन होत आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून १०८ कोटींचा नायगाव पूल झाला, अंबाडी रोड उड्डाणपूल झाला , ७ रस्ते मंजूर केले.
ज्यामध्ये वालीव – सातिवली , नायगाव पूर्व पश्चिम , विरार -अर्नाळा ,नालासोपारा ते निर्मळ,भोईदापाडा ते टीवरीं यासह अन्य रस्ते झाले कोणत्याही व्यापाऱ्याचे नुकसान न करता हे रस्ते केले.रिंगरूट मंजूर झाले. मेट्रोची मागणी केली होती आणि ती देखील मंजूर झाली. नायगाव ते विरार अशी मागणी केली होती आरोग्य सेवेला बळकटी दिली.
आणि जेष्ठ नेते नारायण मानकरांची कोपरखळी : ३५ वर्षात काय केले हे दुसऱ्या पक्षात गेल्यावर समजले का ?
यासह अन्य माहिती उपस्थितांना दिली तर आम्हाला विचारले जाते कि ३५ वर्षात काय केले. यामध्ये अनेक मोठं मोठ्या योजना , विकास प्रकल्पांचा समावेश होता ‘३५ वर्षात काय केले हे दुसऱ्या पक्षात गेल्यावर समजले का ? अशीही कोपरखळी नारायण मानकर यांनी लावली. यावेळी खास करून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात तरुणांचा उत्साह दिसून आला.
शेवटी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी मनमोकळेपणाने हितगुज साधले असता त्यावेळी अनेक जणांनी आपले स्पष्ट विचार देखील मांडले किंबहुना शेकडो कार्यकर्ताकडून मांडल्या गेलेल्या सूचनांना माजी आम. हितेंद्र ठाकूरांनी अगदी समर्पक व समाधानकारक उत्तरे दिली आणि अखेर कार्यकर्ताच मोठा आणि तोच यां निवडणुकीत प्रमुख असेल आणि उमेदवार ही तोच ठरवेल असे ही घोषित केले.
दोन ते अडीच तास सुरु असलेल्या यां कार्यकर्त्यां मेळाव्यास शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात युवा वर्ग, युवा विकास आघाडीचे पदाधिकारी आजी -माजी नगरसेवक,रिक्षा चालक मालक संघ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….
![]()
