विकासकामांचा अध्याय सुरु : मुख्यमंत्र्यांच्या थेट आदेशाने शहरातील विकासकामांचे आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते नारळ वाढवून ठिकठिकाणी शुभारंभ कार्यक्रम संपन्न..!

 

“लोकांचा विश्वास आणि साथ हेच आमचं खरं बळ आहे.” 

“वसई विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. नागरिकांना दर्जेदार सुविधा, चांगले रस्ते, स्वच्छता आणि सुरक्षितता उपलब्ध करून देणे हेच आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे आणि सोबत लोकांचा विश्वास आणि साथ हेच आमचं खरं बळ आहे.

”तर “वसईचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा नव्हे, तर लोकांच्या जीवनमान उंचावण्याचा प्रवास आहे आणि या प्रवासात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी म्हंटलं आहे.


वसई :- आशिष राणे
वसई विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या सोयी सुविधा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने गुरुवारचा दिवस हा ऐतिहासिक ठरला, वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते गुरुवार दि.६ नोव्हेंबर २०२५ रोजी नारळ वाढवून वसई विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाल्याची माहिती आमदारांच्या वसई रोड स्थित भाजपा जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.

वसई मतदारसंघात विकासाभिमुख कामासाठी आम. स्नेहाताई दुबे पंडित यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मधल्या काळात मंत्रालयात भेट घेऊन वसईतील विविध विकासकांमे व अन्य दयनीय रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करून ही कामे तातडीने हाती घेण्यासाठी पालिका आयुक्तांना आदेश देण्याची विनंती केली होती.
त्यानुसार या मागणीची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना वसई-विरार महापलिका आयुक्तांना दिल्या.

दरम्यान वसई विधानसभा मतदारसंघ आणि बोईसर विधानसभा मतदार संघातील वसई लगतच्या काही विविध भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय झालेली अवस्था आणि नागरिकांना दैनंदिन त्रासातून मुक्त करण्यासाठी वसई विरार महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशांचे त्वरीत पालन करून वसई तालुक्यातील महत्वाच्या अशा १४ रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केल्या आहेत.

यामध्ये सर्व कामांची विहीत प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कामांचे कार्यादेश महानगरपालिकेने जारी केले असून या १४ कामांपैकी ०३ कामांचा शुभारंभ गुरुवार दि.०६ नोव्हेंबर २०२५ रोजी आम.स्नेहाताई दुबे पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

तसेच उर्वरित ११ कामांची सुरुवात पुढील काही दिवसांत करण्यात येणार असल्याचे ही आयुक्तांनी सांगत त्याची माहिती लागलीच त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाला पाठविल्याचे ही स्पष्ट केलं असून या विकासकामांमुळे वसई विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि टिकाऊ रस्ते सुविधा व अन्य सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.

या कार्यक्रम प्रसंगी वसई विधानसभेच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित, बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे, प्रभाग समिती “जी” चे सहायक आयुक्त निलेश म्हात्रे, प्रभाग समिती “एच” सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता घाडीगावकर, भाजपा वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस बिजेंद्र कुमार, जिल्हा सचिव प्रवीण गावडे, वसई पूर्व वालीव मंडळ अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, वसई पूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष उदय शेट्टी, वसई रोड मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर, धरेंद्र कुलकर्णी, किरण पवार, श्रीमती विमल वैष्णव, दिपक शर्मा व महानगरपालिकेचे अधिकारी, अभियंते, कर्मचारी, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वसई विधानसभा मतदारसंघाच्या सर्व भागांमध्ये विकासकामांचा वेग वाढविण्यात आला असून, आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या पुढाकाराने अनेक प्रलंबित कामांना गती मिळाली असून वसईचा चेहरा बदलण्याच्या दिशेनं हे एक विकासाचे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

गुरुवार दि. ६ नोव्हेंबर २0२५ रोजी शुभारंभ करण्यात आलेली कामे खालीलप्रमाणे :

(१) वालीव गाव ते रेंज ऑफिस मार्गावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे

(२) सातिवली खिंड ते रेंज ऑफिस या मार्गावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे

(३) रेंज ऑफिस ते गोखिवरे तलाव मार्गावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे, त्याचप्रमाणे संपूर्ण वसई विधानसभा कार्यक्षेत्रातील रस्त्यांचे खड्डे भरण्याच्या दुरुस्तीकरणाच्या कामांचा शुभारंभ १०० फिट रोड, वसई पश्चिम येथे दुपारी २.०० वाजता वसईच्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या हस्ते पार पडला.

पुढील काही दिवसात सुरू करण्यात येणाऱ्या ११ रस्त्यांच्या नावांची यादी पुढीलप्रमाणे,
) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती डी व एचमधील गोखिवरे तलाव ते माणिकपूर नाक्यापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
२) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती एच व आय मधील माणिकपूर नाका ते दत्तानी मॉल पर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
३) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती आप कार्यक्षेत्रातील दत्तानी मॉल ते वसई गाव पर्यतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,
) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती जी कार्यक्षेत्रातील यालीच गाव ते रेंज ऑफीस पर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
५) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती आय कार्यक्षेत्रातील बंगली हॉस्पीटल ते देवतलाव पर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
६) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती आय मधील पारनाका ते किल्ला बंदर जेटी पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती आय मधील पारनाका ते वेणापट्टी पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
८) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती आय मधील पारनाका ते देवतलाव पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
९) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती आय मधील दिपमाळ ते पाचू बंदरसमुद्र हॉटेल पर्यत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
१०) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती डी मधील नवघर पूर्व स्मशानभूमी ते वसई (पु) रेल्वे स्थानक पर्यत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
११) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती आय मधील देवतलाव ते निर्मळ हिंदू स्मशानभूमी पर्यत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.

(Source :- वसईच्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित, भाजपा वसई रोड (प) यांच्या जनसंपर्क कार्यालयातून प्रसिद्ध )

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!