उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्र्याचं आश्वासक पाऊल…
पिंपरी चिंचवड, ठाणे महापलिका यांच्या धर्तीवर शास्ती माफी, प्राथमिक सोयी सुविधासाठी विशेष विकास निधी आणि कला क्रीडा महोत्सवाला अनुदान द्यावे अशा तिन्ही महत्वाच्या विषयावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत बविआच्या शिष्टमंडळाची सकारात्मक व समाधानकारक चर्चा….
वसई :- आशिष राणे
वसई- विरार शहरातील सर्व मालमत्ताधारकांची शास्ती सरसकट माफ करण्याची आग्रही मागणी बाविआ पक्षाचे अध्यक्ष तथा वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूरांनी राज्य सरकारकडे केली आहे.
मा.आम. ठाकूर यांनी राज्यसरकार कडे केलेल्या मागणी पत्रात म्हंटले आहे कि, वसई-विरार शहर महानगरपालिकेत साधा : १०लाखांच्यावर मालमत्ताधारक असून ६५ हजाराहुन अधिक मालमत्तांना महानगरपालिकेकडून शास्ती करण्यात येत आहे.
यामध्ये औद्योगिक वसाहतीतील गाळे, स्वतःला राहाण्यासाठी असलेली निवासी घरे व चाळीचा देखील समावेश आहे, किंबहुना वसई-विरार शहरात शास्ती रक्कमेंचं प्रमाण मूळ करांपेक्षा जास्त असल्याने शास्ती कर भरणा करणे याबद्दल मालमत्ताधारका मध्ये कमालीची उदासीनता दिसून येते, त्यामुळे मालमत्ताधारक शास्तीसह मुळ कराचाही भरणा करीत नाहीत.
पिपंरी चिंचवड व ठाणे महापलिका यांच्या धर्तीवर शास्तीस माफी दयावी..!
दरम्यान शासन निर्णय दि. मार्च 2023 नुसार पिंपरी चिंचवड महापालिका व तदनंतर ठाणे महापालिकेने शास्ती माफ करण्यास मंजूरी दिली आहे, त्या धर्तीवर वसई विरार शहर महानगरपालिकेतील सर्व थरातील मालमत्ताधारकांना शास्ती माफ करण्यात यावी अशी आग्रही मागणी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांच्याकडे नुकतीच केली आहे.
२५ लाख लोकसंख्या असलेल्या वसई विरार शहराला प्राथमिक सोयीसुविधा व विकास कामे करताना सध्या महानगरपालिकेची दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत ५० कोटीचां विशेष निधी महानगरपालिकेंस मिळावा अशी जोड मागणी देखील अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
खेळाडूंना ऊर्जा देणाऱ्या वसई तालुका कला-किडा महोत्सवाला २ कोटीचं अनुदान मिळावे..!
वसई तालुका कला क्रिडा महोत्सवाचे यंदा ३६ वे वर्ष असून गतवर्षी एकूण ६५ हजार स्पर्धकांनीं सहभाग घेतला होता.यामध्ये ३४ कला तर क्रिडेच्या ५४ प्रकारांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
यंदाच्या वर्षीही विक्रमी स्पर्धक भाग घेणार आहेत.तर वसई तालुका कला- क्रिडा महोत्सवात राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरच्या काही स्पर्धा घेतल्या जातात. या माध्यमातून अनेक क्रिडापट्टू व सिने नाट्य कलावंत हे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहेत, विशेष म्हणजे या स्पर्धाची गिनीज वल्ड बुकात नोंद झाली आहे
त्यानुसार अशा खेळाडूंना ऊर्जा देणाऱ्या वसई तालुका कला -किडा महोत्सवाला साधारण २ कोटी रुपयांचे अनुदान देण्यांत यावे अशी आग्रही मागणी देखील माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे चर्चे दरम्यान केली.
एकूणच शास्ती माफी, विषेश विकास निधी आणि अनुदान अशा तिन्ही महत्वाच्या विषयावर समाधानकारक चर्चा होऊन संबंधित सचिवांशी बोलून एकत्रित सभा घेऊन योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उपस्थित शिष्टमंडळाला दिले.
यावेळी मा.आम हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळात बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते तथा माजी महापौर नारायण मानकर, अशोक कुलास,अशोक ग्रोवर ,वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचे प्रकाश वनमाळी आदी जेष्ठ पदाधिकारी मंडळी आवर्जून उपस्थित होते.
![]()
