मुख्यमंत्री १५० दिवस कृती आराखडा अंतर्गत महावितरण कं.कडून ३५ हजार अर्जांना स्वयंचलित मंजुरी..!

 

मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी कटीबद्ध….!

मुख्यमंत्री कृती आराखडा योजने अंतर्गत महावितरण कडून वर्षभरात अनेक ग्राहकाना लोकाभिमुख सेवा देण्यात आल्या. आगामी काळात देखील यात वाढ करण्याचा महावितरण कंपनीकडून सातत्याने प्रयत्न सुरू राहणार आहेत

कल्याण : – (महावितरण कार्यालयाकडून ) 

वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी कटीबद्ध असलेल्या महावितरण कंपनीने वाढीव जोडभार, रूफटॉप सोलर योजना तसेच नावात बदल या सारख्या योजनेत अर्ज केलेल्यांच्या अर्जाला स्वयंचलित मंजुरी देण्याचे धोरण स्वीकारले.

परिणामी मागील दिड महिन्यात कोकण प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या विविध ठिकाणी सुमारे ३५ हजार अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात आली.

या अगोदर नावात बदल करणे, वाढीव जोडभार मंजूर करणे या प्रक्रियेत साधारणपणे एक महिना लागायचा, पण स्वयंचलित मंजुरी प्रक्रियेत हा कालावधी आता ३ ते ७ दिवसांवर आला आहे. यासाठी वीज ग्राहकांना आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क महावितरणच्या संकेतस्थळावर जमा करणे आवश्यक आहे.

महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील दिड महिन्यात रूफटॉप सोलर योजनेत एकुण २६,१२० अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात आली. यात भांडूप परिमंडळात १५०८, जळगाव १२,३६९, नाशिक १०६७७, कल्याण ८८९, कोकण परिमंडळ रत्नागिरी ६७७ अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात आली. 

नावात बदल करण्यासाठी आलेल्या ६८३७ अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात आली. यात भांडूप परिमंडळातील सर्वाधिक २१२५ अर्ज, कल्याण परिमंडळातील ४४९, जळगाव परिमंडळात २५६, नाशिक ६५७, कोकण परिमंडळ रत्नागिरी येथील २३७ अर्जांचा समावेश आहे. कोकण प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या परिमंडळात एकुण १९१७ वाढीव जोडभार अर्ज मंजूर करण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजग्राहकांना तत्पर व घरबसल्या सेवा देण्यासाठी महावितरणच्या डिजिटल सेवेत ग्राहकाभिमुख बदल करण्याचे निर्देश दिले आहे.

त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी बिलावरील ग्राहक नावात बदल करण्याच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित व कार्यान्वित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कृती आराखडा योजने अंतर्गत महावितरण कडून वर्षभरात अनेक ग्राहकाना लोकाभिमुख सेवा देण्यात आल्या. आगामी काळात देखील यात वाढ करण्याचा महावितरण कंपनीकडून सातत्याने प्रयत्न सुरू राहणार आहेत,असे कोकण प्रादेशिक कार्यालयाचे अधिक्षक अभियंता निलकमल चौधरी यांनी सांगितली असल्याची माहिती उपमुख्यजनसंपर्क अधिकारी कोकण प्रादेशिक कार्यालय, कल्याण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहें.

Adv

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!