बहुजन विकास आघाडीचे पहिले अध्यक्ष आणि थिंक टॅंक म्हणूनही ओळख....
गेली ३७ वर्ष वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचे मुख्य आधारस्तंभ, मार्गदर्शक म्हुणुन असलेले आणि राज्यात कला क्रीडा मोहोत्सवाला नावारूपाला आणणारे मुकेश सावे अशी त्यांची ओळख होती.
विरार ता. (बातमीदार)
वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचे शिल्पकार,विरारच्या माजी नगराध्यक्ष मुकेश सावे (वय ७३) यांचे रविवारी (दि.३०) पहाटे अल्पशा आजाराने दादर येथे निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.
गेली ३७ वर्ष वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचे मुख्य आधारस्तंभ, मार्गदर्शक म्हुणुन असलेले आणि राज्यात कला क्रीडा मोहोत्सवाला नावारूपाला आणणारे मुकेश सावे अशी त्यांची ओळख होती.
कला क्रीडा महोत्सवा बरोबरच त्यांचा संकल्पनेतुन कला क्रीडा महोत्सवाच्या पंचविसाव्या वर्षी माही वसई हा वसईतील परंपरा ,जुन्या काळातील वसई यांची मांडणी करण्यात आली होती.
तर कला-क्रीडा महोत्सवाच्या ३० व्या वर्षी पालघर जिल्ह्या पासून सिंधुदुर्ग जिल्ह्या पर्यंत पसरलेल्या कोकणातील संस्कृती,तेथील व्यापार यावर प्रकाश टाकणारे प्रदर्शन कोकण पर्व -कोकण सर्व आयोजित करण्यात आले होते.
कला क्रीडा महोत्सवाच्या ३५ व्या वर्षी भारताची सुवर्ण गाथा यामधून भारताचे लष्करी सामर्थ्य, प्रजासत्ताक दिनाचे संचलन यावर प्रकाश टाकण्यात आला होता. हे प्रदर्शन आज हि विवा महाविद्यालयात ठेवण्यात आले आहे.
शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेत ते उपाध्यक्ष होते. दत्ताजी साळवी यांचे ते निकटवर्ती होते. तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर कामगारांच्या प्रशांवर अनेक बैठकीत ते उपस्थित होते.
मुकेश सावे हे बहुजन विकास आघाडीचे पहिले अध्यक्ष आणि थिंक टॅंक म्हणूनही ओळखले जात होते. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जात होते. त्यांची विरार नगरपालिकेतील नगराध्यक्ष म्हणूनही कारकीर्द हि गाजली होती.
वसई तालुका कला क्रीडा महोत्सव काही दिवसावर येऊन ठेपला असतानाच मुकेश सावे यांचे जाणे चटका लोआवणारे असल्याचे मोहोत्सवाचे अध्यक्ष दत्ताराम मणेरीकर यांनी सांगितले.
तर माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले कि राजकीय , सामाजिक आणि कला-क्रीडा क्षेत्रात माझ्या बरोबर ठाम उभा राहणारां माझा भाऊ गेला आहे. त्याच्या जाण्याने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मुकेश सावे यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर माजी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर,आमदार राजेश पाटील ,माजी महापौर राजीव पाटील ,नारायण मानकर,प्रवीण शेट्टी, रुपेश जाधव यांनी दुःख व्यक्त केले आहे. मुकेश सावे यांच्या अंत्य दर्शनासाठी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक,नगरसेविका आणि असंख्य कार्यकर्ते दादर येथे रवाना झाले आहेत.
सावे यांच्यावर वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात येणार असल्याचे बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते अजीव पाटील यांनी सांगितले.
![]()
