वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

वसई – विरार जिल्हाध्यक्षपदी प्रज्ञाताई पाटील यांची वर्णी !

वसई विधानसभेंच नेतृत्व आम स्नेहाताई दुबे पंडित यांच्यानंतर आता भाजपचे पक्ष वाढीसाठी प्रथमच पुन्हा महिलेला स्थान !

विरार :- संदीप पंडित 

विधानसभा निवडणुकीच्या वेळेला बहुजन विकास आघाडीच्या विरोधात ठाम पणे भूमिका घेतलेल्या व प्रसंगी जोरदार लढलेल्या भाजपच्या प्रज्ञा पाटील यांना भाजपने त्यांचे बक्षीस दिले असून, वसई विधानसभा आम स्नेहाताई दुबे पंडित यांनी आपल्या कडे खेचून आणल्यानंतर राजकीय समतोल उत्तम राहावा याकरता वसई विरार जिल्हाध्यक्षपदी देखील पहिल्यादा एका महिलेची निवड झाल्याने प्रत्यक्ष रित्या खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा सन्मान झाल्याचे वसईत बोलले जात आहे.

दरम्यान मधल्या काळात विधानसभा २०२४ च्या निवडणुकीच्या वेळी विरार येथील हॉटेल विवांता मध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्ये मोठा राडा झाला होता. त्यावेळी भाजपच्या वतीने ठामपणे बहुजन विकास आघाडीच्या विरोधात उभ्या राहिलेल्या प्रज्ञा पाटील यांना बक्षीस मिळाले असून वसई विरार भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
प्रज्ञा पाटील यांच्या निवडीने भाजपमध्ये महिलांचाही सन्मान करण्यात येत असल्याचे अधोरेखित करतानाच भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा मुख्यप्रवाहात आणण्याचे काम करण्यात आल्याचे बोलले जात आहे. प्रज्ञा पाटील या विशेष मागासवर्ग (हिंदू सोनकोळी) समाजाच्या आहेत.

“प्रज्ञा पाटील यांची अध्यक्षपदी झालेल्या निवडीचे नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी जोरदार स्वागत केले असून पाटील यांच्या निवडीने पक्षाला एक सक्षम व खंबीर असे नेतृत्व मिळाल्याचे त्यांनी माय मराठी 7 शी बोलताना सांगितले.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!