सोनम वांगचूक – अभिजित दिपके व अन्य हजारोंच्या समर्थनासाठी वसईकर-चुळणकर माणिकपूर नाक्याच्या रस्त्यावर ..!

ही तर विद्यार्थ्यांच्या सहनशक्तीची सत्वपरीक्षा : मन कीं बात रस्त्यावरच..?

दिल्ली येथे मागील २० दिवस झाले सुरु असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आमरण उपोषण -आंदोलनाच्या समर्थनार्थ वसईकर खास करून चुळणकर ग्रामस्थ देखील आज सरसावले आणि त्यांनी रविवारी सायंकाळी भर पावसात माणिकपूर नाका येथे जागृती सेवा संस्था, चुळणे यांच्या वतीने “मूक आंदोलन” करीत जेष्ठ सामाजिक तथा पर्यावरण कार्यकर्ते, शिक्षण सुधारक सोनम वांगचूक तसेच अभिजित दिपके व अन्य हजारो विद्यार्थी नागरिक,कार्यकर्ते यांच्या  एकूणच शिक्षण व्यवस्थेतील  बदला बरोबर Neet परीक्षा घोळ व पेपर फुटी नंतर नैराश्येतून २१ तरुण तरुणी विद्यार्थी मित्रांनी आपले जीवनचं संपवलं,  त्यामुळे या वारंवार घडलेल्या घटनाना जबाबदार असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा आंदोलनाला मुक्त पणे पाठींबा दर्शविला.

वसई :- आशिष राणे 

सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखालील ‘नीट’ (NEET) पेपरफुटी आणि भारतातील एकूणच शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारा विरोधातील आमरण उपोषणाला देशभरातून व्यापक पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी मोर्चे, उपोषणे आणि मुक आंदोलने आयोजित केली जात असून
ज्येष्ठ सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ते,आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचूक यांनी पुकारलेल्या या देशव्यापी आंदोलनाचे तीव्र पडसाद मुंबई सहित वसई-विरार भागातही उमटू लागले आहेत.

रविवार दि.​ १९ जुलै सायंकाळी ५ ते ६.३० दरम्यान ‘जागृती सेवा संस्था, चुळणे’ तसेच नवघर-माणिकपूर परिसरातील जागरूक नागरिक, तरुण मंडळी तसेच विद्यार्थीनी आणि विद्यार्थी वर्गाच्या वतीने माणिकपूर नाका येथे भर पावसात एक भव्य असे ‘मूक आंदोलन’ करण्यात आले.
दिल्ली येथील जंतर मंतर येथे मागील २० दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचूक यांना अचानक शनिवारी पहाटे साध्या वैशात आलेल्या दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरून ताब्यात घेत त्यांना काही मिनिटातच नजीकच्या सफदरचंद सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं खरं मात्र या घटनेचं बऱ्या पैकी चित्रीकरण व माहिती काही सेकंदातचं सोशल मीडियामुळे वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र एकच खळबळ माजली

विद्यार्थी -पालकांनी आपापल्या राज्यात, जिल्ह्यात शांततेत आंदोलन करा :-अभिजित दिपके याचे आवाहन🙏🙏

फोटो :अभिजित दिपके ☝️

सोनम वांगचूक यांना आंदोलन स्थळावरून हटवल्यामुळं या आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढली आहे. अर्थात त्यांचं हे आंदोलन आता अभिजित दिपके या तरुणाने पुढे नेल असून आणि मला ही पोलिसांनी उचलून नेलं तर हे आंदोलन जनता म्हणून तुम्ही पुढे न्या… या संदर्भात अभिजित दिपके याने संबंध भारतातील नागरिक विद्यार्थी,तरुण सहकारी आणि त्यांच्या पालकांना आवाहन केलं आहे कीं,

आपण ज्या राज्यात, जिल्ह्यात किंवा तालुका, शहरात गावात राहतात त्याठिकाणी आपले आंदोलन शांत पणे करा अशी भावनिक साद घालत आवाहन केलं आहे.

गेल्या २१ दिवसांपासून ज्येष्ठ पर्यावरण व सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण सुधारक सोनम वांगचूक यांनी नवी दिल्लीच्या जंतर- मंतर येथे आंदोलन सुरू केलं आहे..

Adv

देशातील ‘नीट’ सारख्या प्रमुख स्पर्धा परिक्षांमधील पेपरफुटी आणि घोटाळ्यां विरोधात हे आंदोलन असून त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची व परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करीत अजूनही हे आंदोलन सुरू ठेवले आहे.
मात्र सरकारकडून अजूनही या आंदोलनाची जरा सुद्धा दखल घेतली जात नसल्याने दिवसेंदिवस हे आंदोलन अधिक प्रभावीपणे सुरू झाले आहे.

माणिकपूर नाक्यावर विद्यार्थीनी -विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग..

✅वसईतील माणिकपूर नाक्यावरील जागृती सेवा संस्था, आयोजित “मूक आंदोलन” ☝️

सायंकाळी ५ ते ६.३० या दीड तास रस्त्याच्या कडेला उभं राहून चाललेल्या या मूक आंदोलनात परिसरातील तरुण-तरुणी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी सहभागी विद्यार्थी व तरुणांनी व अन्य जागरूक नागरिकांनी आपल्या हातात मागण्यांचे फलक घेऊन अत्यंत शांततापूर्ण मार्गाने वसईतील विविध प्रशासनाचे आणि खास करून सरकारचे लक्ष वेधून घेतले, सोनम वांगचूक यांनी छेडलेले हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या हिताचे असल्याने त्याला वसई विरार मधील जनतेने ही पाठींबा दर्शवला असल्याचे जागृती सेवा संस्थाचे जॅक गोम्स यांनी सांगितलं

हेही वाचा :- सोमवारी वसई तहसीलदार येथे ही आंदोलन..!

☝️विशेष म्हणजे सोनम वांगचूक सहित अभिजित दिपके व अन्य विद्यार्थी नागरिक आदी यांच्या मागणीबाबत दिल्ली येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर  व सोमवारी संसद भवन येथे लॉंग मार्च निघणार आहे त्यामुळे वसई तहसीलदार कार्यालयासमोर त्याच्या समर्थनासाठी सकाळी १० ते ५ दरम्यान धरणे आंदोलन केले जाणार आहे.

Adv

=====================================

✅⚠️महत्त्वाची नोंदकोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal : Mymarathi7.कॉम वर संपर्क साधावा.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!