समाजातील वास्तव परिस्थितीचं भान : ठरतंय साहित्य क्षेत्रातील सोनेरी पान…!
नाशिक येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयात कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त गुरूवार दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पार पडणाऱ्या विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सदरील पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

वसई :- आशिष राणे… ✍️
वसईतील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या डॉ. सखाराम डाखोरे यांच्या सृजनसंवाद प्रकाशन, ठाणे तर्फे प्रकाशित ‘हूलबिगूल’ कवितासंग्रहास नाशिक येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाचा साहित्यक्षेत्रात मानाचा समजला जाणारा ‘कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे.

रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. समाजातील वास्तव परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या या संग्रहातील कवितांनी वाचकांचे लक्ष वेधले आहे. २०२६ या वर्षात ह्या संग्रहाला मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे.

वर्धा येथील मारोतराव नारायणे प्रतिष्ठाणचा मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार, अकोले येथील फडकी फाऊंडेशनचा डॉ. गोविंद गारे राज्यस्तरीय उत्कृष्ट आदिवासी साहित्य पुरस्कार, सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठाणचा राज्यस्तरीय उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार अशा प्रतिष्ठीत तीन पुरस्कारानंतर कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साहित्यक्षेत्रातून कवी डॉ. सखाराम डाखोरे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

✅🔝📌महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा ! Mymarathi7.com
![]()
