मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तांकडून माणिकपूर व नालासोपारा पोलीस ठाण्यासहित अन्य प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या उचलबांगड्या..

 

मीरा – भाईंदर वसई -विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या पोलीस आयुक्तांकडून बदल्या..

पोलीस कर्तव्यात संयम आणि नम्रता व जनतेशी एकोप्याने वागणे….. कुठं गेले…?
पोलीस अधिकारी यांचं लोकप्रतिनिधी,पत्रकार मंडळी, समाजसेवक आणि त्या -त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनतेप्रती त्यांचं वर्तन हे सर्वाप्रती अत्यंत संवेदनशील, आदरयुक्त,मैत्रीपूर्ण आणि सहकार्याचे असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी कार्यरत असते.

वसई :- आशिष राणे….✍️

मीरा -भाईंदर वसई -विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी माणिकपूर व नालासोपारा प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या असून त्या संदर्भातले कर्तव्य वाटप व बदल करण्यात आलेल्या ठिकाणाचे बदली आदेश मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस उप -आयुक्त (मुख्यालय ) संजयकुमार पाटील यांनी गुरुवारी बजावले.


दरम्यान प्राप्त बदली आदेशात खास करून माणिकपूर व नालासोपारा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक या दोघांच्याही बदल्या वजा उचलबांगड्या केल्या आहेत, अर्थात त्यांच्याकडील स्वतंत्र पोलीस ठाण्याचा पदभार काढून त्यांना दोन विविध विभागात पदभार दिला आहे.

यामध्ये एक नंबरला माणिकपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हरीलाल नामदेव जाधव यांची बदली आर्थिक गुन्हे शाखेत तर नालासोपारा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल प्रभाकर वळवी यांची बदली बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, मुख्यालय येथे करण्यात आली असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांना मात्र नालासोपारा पोलीस ठाण्यात धाडले आहे.

माणिकपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक पदी प्रतापराव कदम यांची तात्पुरता नियुक्ती..!

सद्यस्थितीत परिमंडळ -३ अंतर्गत कर्तव्यार्थ विरार पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून असलेले प्रतापराव कदम यांची माणिकपूर पोलीस ठाणे येथील( प्र.पो.नि ) हिरालाल जाधव यांच्या उचलबांगडी नंतर रिक्त झालेल्या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कर्तव्य बदली करण्यात आली असून पोलीस निरीक्षक प्रतापराव कदम यांनी तात्काळ माणिकपूर पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारावा आणि त्याबाबत अनुपालन अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त निकेत कौशीक यांनी काढले आहेत.

नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रतापराव कदमांनी स्वीकारला पदभार…💐


मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने आदेशीत झालेल्या प्रभारी पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी शुक्रवारी आपला माणिकपूर पोलीस ठाण्याचा पदभार नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रतापराव कदम यांच्याकडे सोपवला असून नव्या प्रभारी पोलीस निरीक्षकांनी हा पदभार स्वीकारला आहे.

बदली कीं उचलबांगडी..??.. चर्चेला उधाण…


मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेनुसार निघालेल्या या दोन्ही माणिकपूर व नालासोपारा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या नव्हे तर अन्य पोलीस निरीक्षक यांच्या ही उचलबांगड्या झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याकडून मिळाली आहे

या संदर्भात पोलीस उप -आयुक्त संजयकुमार पाटील यांना या नियमित बदल्या कीं..उचलबांगड्या आहेत ? असे विचारलं असता पाटील यांनी ” मी या बदलीच्या प्रक्रियेतचं नाही आहे. किंबहुना हे आदेश स्वतः पोलीस आयुक्तांनी काढल्याची माहिती दिली.


परिणामी मध्यतंरी वसई विरार नालासोपारा अंतर्गत मोडणाऱ्या बहुतेक पोलीस ठाण्यातील प्रभारी व अन्य वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या एकूणच पोलिस ठाण्यातील कामकाज पद्धती, जनतेस वा आलेल्या अभ्यंगताना व दस्तुरखुद्द पोलीस कर्मचारी यांनाही दुय्यम वागणूक, चुकीचे गुन्हे, निरीक्षण अशा विविध प्रकारच्या तक्रारी  गृहखाते असो किंवा स्वतः पोलीस आयुक्त यांच्याकडे गेल्या होत्या त्यातीलचं काही तक्रारीची शहानिशा केल्यावर पोलीस आयुक्तांनी या सर्व प्रभारी पोलीस निरीक्षक यांच्याकडून स्वतंत्र पदभार काढून घेत त्यांना साईड ब्रांच म्हणजेच अन्य विभागात पाठवलं आहे,

आणि याच पार्श्वभूमीवर या सर्वावर एकप्रकारे पोलिसी कारवाई केल्याची जोरदार वंदिता आहे. त्यामुळे नक्कीच या बदल्या नाहीत तर या पोलीस अधिकारी यांच्या चुकीच्या वर्तणूकींमुळे कर्तव्यात कसूर केल्यानं उचलबांगड्या केल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

पोलीस कर्तव्यात संयम आणि नम्रता व जनतेशी एकोप्याने वागणे….. कुठं गेले…?
पोलीस अधिकारी यांचं लोकप्रतिनिधी,पत्रकार मंडळी, समाजसेवक आणि त्या -त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनतेप्रती त्यांचं वर्तन हे सर्वाप्रती अत्यंत संवेदनशील, आदरयुक्त,मैत्रीपूर्ण आणि सहकार्याचे असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी कार्यरत असते.

पोलीस अधिकारी आणि जनतेमधील आदर्श संबंध आणि वर्तनात आदरयुक्त व सौजन्यशीलता असणं आवश्यक आहे,अन्यथा आपला मूळ स्वभाव, अहंकार आणि माणूस बघून त्यास वागणूक कोणत्या दर्जाची दयायची हे जर अंगी बाळगला तर नुकसान स्वतःचेच आहे, मात्र त्या समाजाचं देखील आहे.

त्यामुळे पोलीस अधिकारी यांचा स्वभाव गुणविशेष वर्तनात शालीनता कर्तव्यात संयम आणि नम्रता व जनतेशी एकोप्याने राहणं हे अभिप्रेत व आवश्यकचं आहे.

तरच “महाराष्ट्र पोलिसांचं “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात सार्थक रूप म्हणून खरे ठरेल…. याचाही विचार व्हायला हवा.. बाकी “ये पब्लिक है ये सब जानती है… पब्लिक है, अजी अंदर क्या है.. अजी बाहर क्या है..!

*******************************************

काय आहे पोलीस आयुक्त यांचा आदेश..वाचा .✍️

✅✍️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा ! Mymarathi7.com

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!