तासभर ईडी दरवाजा बाहेर, माजी आयुक्तानी पुरावे प्लश केले का? काय नेमकं घडलं व समोर काय येणार ? वसई विरारकरां सहित उभ्या महाराष्ट्राला आहे प्रतीक्षा
मात्र तब्बल 18 तासानंतर ही चौकशी वजा सर्च कारवाई पूर्ण झाली असली तरीही ईडीने अदयाप अधिकृत माहिती माध्यमासमोर आणलेली नाही यदाकदाचित आज बुधवारी ईडी प्रेसनोट प्रसिद्ध करेल.

वसई : – आशिष राणे
वसई-विरार शहर महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या वसईतील शासकीय घरावर ईडीने केलेली छापे मारीची कारवाई आता पूर्ण झाली आहे. मंगळवारी दि.29 जुलै रोजी सकाळी 7.30 वाजता सुरु झालेली हि कारवाई अखेर तब्बल 18 तासानंतर पूर्ण झाली आहे.
या कारवाईत ईडी ने कुणालाही ताब्यात घेतले नसून, सिसिटीव्ही फुटेज,काही कागदपत्रे, हार्ड डिस्कमध्ये मोठा डाटा जमा करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. दि 30 जुलैच्या रात्री दीड वाजता ईडीचे अधिकारी आयुक्त निवास्थानातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
त्यामुळे या सर्व चौकशीत नेमकं काय मिळाले ? याची अधिकृत माहिती अदयाप मिळालेली नाही. या चौकशीत नेमके काय सापडले, कुणाचे धागेदोरे ईडी अधिकारी यांच्या हाताला लागले, हे अजूनही गुलदस्त्यात आहे, अर्थात हे सर्व ईडीच्या अधिकृत माहिती नंतरच समोर येणार आहे.

वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या शासकीय बंगल्यावर मंगळवारी दि.29 जुलैच्या सकाळी 7. 30 वाजता (ईडी )सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. ही कारवाई वसई विरार परिसरातील डम्पिंग ग्राऊंड येथे बांधण्यात आलेल्या बेकायदेशीर 41 इमारतींच्या बांधकामाशी संबंधित मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भात सुरू होती.
इंजिनियर व अन्य नातेवाईकांच्या घरीही ईडीची छापेमारी!

मिळालेल्या माहितीनुसार, खरं तर आयुक्त पवार यांची बदली दि 17 जुलै 2025 रोजी ठाणे येथे मलाईदार पदावर झाली होती किंबहुना ही बदली होऊन दहा दिवस झाले होते मात्र पदभार सोडला नव्हता तर सोमवारी नवे आयुक्त मनोज सूर्यवंशी यांनी दुपारी पदभार स्विकराला व सोमवारी पवार यांना मोठा गाजा बाजा करीत आजी माजी आमदार महापौर, मंत्री अधिकारी वर्ग अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हृदय निरोप देण्यात आला.
परंतु भ्रष्टाचाराच्या गडद चिखलात अडकलेल्या माजी आयुक्त पवार कधी पाय उतार होतात याकडे ईडीने मागील बरेच दिवसापासून बारीक लक्ष ठेवलं होतं आणि अवघा एक दिवस उलटत नाही तोच भल्या पहाटे ईडी ने ही धडक कारवाई केली आहे.
दि 28 जुलैला निरोप समारंभ झाल्यानंतर माजी आयुक्त पवार यांनी पालिकेतून सर्व कागदपत्रे घरी आणली आहेत. त्यामुळे मंगळवारची अचूक वेळ ईडी ने साधली असल्याचं समजत आहे.
या प्रकरणात ईडी कडून पवार यांच्याशी संबंधित राज्यात एकूण 12 ठिकाणी छापे टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.

निवासस्थानी आर्किटेक, बिल्डर्स आणि ठेकेदारांना बोलवलं ?
मंगळवारी सायंकाळी पवार यांच्या या निवासस्थानी काही आर्किटेक, बिल्डर्स आणि कॅान्ट्रेकर यांना ही बोलावण्यात आले होते असेही समजते,. तर या संपूर्ण धाडीत पवार यांच्या काही निवडक नातेवाईकांच्या घरी ही ईडी ची छापेमारी झाल्याचे सूत्राकडून कळलं आहे.
ईडी चं पथक तास दीड तास घराबाहेर ! काय घडलं असेल ?

वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या वसई पश्चिम भागातील पं. दीनदयाळ नगर स्थित शासकीय निवासस्थानावर मंगळवार दि. 29 जुलै रोजी भल्या पहाटे 5.30 वा. ईडीचं पथक छापा टाकण्यासाठी दाखल झालं होतं मात्र कारवाई ची चुणूक लागलेल्या हुशार माजी आयुक्तानी सुरुवातीला दरवाजा तर उघडलाच नाही याउलट घरामध्ये कुणीच नाही आहे असे भासवण्यासाठी चक्क बाहेरून कुलूप बंद ही केलं होत त्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी शेवटी तास दीड तासानंतर कुलूप तोडून घरात सात वाजता प्रवेश केला.

माजी आयुक्तानां मिळाला तास दीड तास ! गोल्डन चान्स साधला का ? रोकड,कागदपत्रे, पुरावे फ्लश केली का ?
मात्र तास दीड तास माजी आयुक्तानी काही बेहिशोबी मालमत्तेची कागदोपत्री पुरावे नष्ट केले का ? कुठं फोन केले का? रोकड प्लश केली की जाळली ? काय नेमकं घडलं त्या तास दीड तासात हे असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत राहिले आहेत.मात्र माजी आयुक्तानी तो तासाभराचा गोल्डन चान्स साधला असल्याचे ही खास सूत्राकडून कळते आहे.तरीही नेमकं काय घडलं असावे कारवाई त काय घबाड मिळालं या माहितीसाठी केवळ वसईकर नव्हे तर उभा महाराष्ट्र आतुर आहे
![]()
