“राज्य आदिवासी आढावा समिती अध्यक्ष विवेकभाऊंनी आयुक्त अनिलकुमार पवारांना सन्मानाने घातलेली लाल पगडी ईडी ने काही तासांतच उतरवली आहे
वसई विरार महापालिकेचे माजी प्रशासक तथा आयुक्त अनिलकुमार पवार यांची बदली होताच ईडीने मुंबई,पुणे, नाशिक सहित 12 ठिकाणी छापेमारी केली असून या घोटाळ्यात भ्रष्टाचाराची व्याप्ती डोळे दिपून टाकणारी असेल यात अजिबात शंका नाही तर या कारवाईत गावाहून आयात केलेल्या काही कनिष्ठ अभियंत्यांचा ही समावेश आहे तर अजुन काही बिल्डर्स, राजकारणी मंडळी ही रडारवर आहेत”

वसई :- आशिष राणे
दिल्ली स्थित सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच (ईडी) च्या मुंबई येथील पथकाने पून्हा तिसऱ्या वेळी वसईला पुन्हा लक्ष केलं असून वसईत मंगळवार दि.29 जुलै रोजी सकाळी वसई विरार महानगरपालिकेचे माजी प्रशासक तथा आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या वसईच्या पं. दीनदयाळ नगरातील शासकीय निवासस्थानी धाड टाकली आहे इतकंच नाही तर ईडीने आयुक्त यांच्या संबंधित मुंबई,पुणे, नाशिक सहित अन्य 12 ठिकाणी या धाडी टाकल्या आहेत.
विशेष म्हणजे मंगळवारी केलेल्या छापेमारीत ईडीने वसईत आयुक्त अनिलकुमार पवार समवेत त्यांचे गावावरून आणलेले काही निकटवर्तीय कनिष्ठ इंजिनियर व निवडक कर्मचारी यांच्यावर देखील धाड टाकित त्यांची चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यांची व्याप्ती पाहता पुढील काही महिने जर अशीच सखोल चौकशी सुरू राहिल्यास या घोटाळ्याच्या आर्थिक रकमेची व्याप्ती नक्कीच डोळे दिपून टाकणारी ठरेलं असे सर्वत्र बोलले जात आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार,याआधी दि.13 व 14 मे 2025 रोजी ईडीने पहिलं धाडसत्र टाकल्यानंतर तत्कालीन उपसंचालक वाय.शिवा. रेड्डी यांच्या वसई पूर्व व हैद्राबाद येथील घरी जे काही कोट्यावधी रुपयांचे घबाड समोर आलं त्यानुसार वसई विरार परिसरातील अनधिकृत बांधकामां प्रकरणात गुन्हा दाखल केला होता,पुन्हा त्यांनी दुसऱ्या वेळी वसईतील काही मोठे वास्तुविशारद (आर्किटेक ) व बिल्डर्स आणि काही इंजिनिअर्स यांच्यावर देखील धाडी टाकल्या होत्या.त्यात ही रोख रक्कम व कोटींच्या मुदत ठेवी,विविध कंपनी चे शेअर्स, मालमत्तेची कागदपत्रे आदी जप्त करण्यात आले होते
या सर्व पार्श्वभूमीवर ईडीचा तपास सुरूच होता, दोन्ही वेळी कारवाई झाली तेव्हा आयुक्त पवार हे प्रशासकीय कामकाज निमित्ताने बाहेरगावी होते.

तर एकूणच पवार यांच्या कार्यपद्धती वरच त्यावेळेपासूनच प्रश्न उपस्थित झाले होते,तसेच 41बिल्डिंगच्या तोडक कारवाई विषयी ही त्यांच्यावर प्रसार माध्यमातून आरोप झाले होते, पुन्हा वादग्रस्त उपसंचालक रेड्डी पकडले तरीही आयुक्त यांच्यावर ईडी कधी कारवाई करणार असे वारंवार प्रश्न समोर येत होते, प्रसंगी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाला होता, तर आयुक्त पवार यांना दोन्ही वेळी राजाश्रय मिळाला होता मात्र ईडी ला काही हे पटलेलं दिसत नाही
मधल्या काळात नालासोपाराचे माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी आयुक्त यांना तक्रारी केल्या होत्या मात्र आयुक्तानी जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याने पुन्हा गावडे यांनी ईडी कडे तक्रारी केल्या, तर अलीकडे सुद्धा दोन गंभीर तक्रारी केल्या होत्या अर्थात आधीच्या व आताच्या त्या तक्रारीत बऱ्यापैकी तथ्य असल्यानेच ईडी पुन्हा आक्रमक झाली असावी अशी वंदिता सर्वश्रुत आहे.

अखेर पहिल्या दिवसापासूनच ईडीच्या रडारवर असलेले आयुक्त पवार हे देखील नजरेतून सुटले नाही, त्यांनी आपल्या राजकीय शक्तीने पंधरा दिवसापूर्वीच ठाणे शहरात येथे एस आर ए विभागातील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मलईदार पदावर बदली करून घेतली होती.
सोमवारी नवनियुक्त आयुक्त मनोज सूर्यवंशी यांनी पवार यांच्याकडून पदभार स्विकराला व त्याचवेळी सायंकाळी सर्व पक्षीय आजी माजी आमदार अन्य मान्यवर मंडळी कडून आपला निरोप समारंभ सत्कार करून तर घेत लाल पगडी ही परिधान केली
मात्र ” घर फिरले की घराचे वासे हिं फिरतात” या म्हणीनुसार आजी आयुक्त माजी झाले आणि विरार महापालिका मुख्यालयातून पाय उतार होताच दि 29 जुलै रोजी मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास मनपाचे माजी प्रशासक तथा आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या शासकीय निवास्थानासह 12 ठिकाणी ईडी ने छापे टाकले.
अक्षरशः ईडी ने आयुक्त यांचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला ही एका आय. ए.एस दर्जा प्राप्त अधिकाऱ्यांला न साजणारी फार लज्जा स्पद बाब आहे
आदरणीय विवेक भाऊंनी लाल पगडी आयुक्त यांना घातली व ईडीने ती अवघ्या काही तासातच उतरवली !

गंमतीचा भाग म्हणजे सोमवार दि 28 जुलै 2025 रोजी पालिकेत मोठा गाजावाजा करत आयुक्त पवार यांचा निरोप समारंभ आणि सत्कार, कार्यक्रम आजी माजी आमदार, महापौर, मंत्री, अधिकारी वर्ग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला होता, त्यात प्रामुख्याने राज्याच्या आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेकभाऊ पंडित यांनी आयुक्त अनिलकुमार पवार यांना चक्क लाल पगडी परिधान करीत त्यांचा हृदयसत्कार ही केला होता,गंभीर म्हणजे निरोप समारंभा नंतर आयुक्ताच्या निवास स्थानी रात्री 1.30 वाजेपर्यंत जेवणाची मेजवानी ही झाल्याचे समजते यावेळी घरातील नोकर मंडळींना सुट्टी देण्यात आली होती,मात्र अवघ्या काही तासाच्या आतच माजी आयुक्त पवार यांची लाल पगडी ईडीने सपशेल उतरवली आहे
परिणामी मंगळवार दि 29 रोजी वसईत पुन्हा एकदा ईडीची कारवाई झाल्यामुळे वसईत व मनपा अधिकार्यांमध्ये खळबळ माजली आहे. धक्कातंत्र पाहता ईडीची ही कारवाई मुंबई, पुणे, नाशिक, वसई, विरार येथील ठिकाणांचा समावेश आहे. बहुसंख्य छापे हे पवार यांच्याशी संबंधित असणार्या ठिकाणांवरच टाकण्यात आले आहेत
वसई विरार परिसरात मंगळवारी पहाटेपासून छापे सुरू असून त्याबाबत ईडीने कमालीची गुप्तता पाळली आहे. एकाच वेळी राज्यात 12 ठिकाणी शोध मोहीम सुरू झाली आहे.
या अधिकाऱ्याच्या निवासस्थानीही शोध मोहीम सुरू असून उशीरापर्यंत कारवाई सुरू राहील, तर आयुक्ताची चौकशी सकाळ पासून सुरूच आहे कागदोपत्री व डिजिटल पुरावे, सिसिटीव्ही कॅमेरे ही ताब्यात घेत चौकशी सुरु असल्याचे विशेष सूत्रांनी सांगितले मात्र अदयाप ईडीने अधिकृत पणे या संपूर्ण कारवाई बाबत प्रसारमाध्यमाना काहीही माहिती दिलेली नाही त्यामुळं ही कारवाई अजुन किती वेळ व यातून समोर काय निष्पन्न होईल ते येणारी वेळच सांगेल.

आयुक्त यांच्या पत्नी व मुलींची ही चौकशी: अन्य ठिकाणी हलवले!
आयुक्त पवार यांच्या वरील एकूणच धाडसत्रात त्यांची पत्नी त्यांच्या समवेत बंगल्या तच होती तर कारवाई नंतर बऱ्याच वेळाने त्यांची मुलगी घरी आली मात्र ईडी च्या पथकाने पत्नी व मुलीला अधिक चौकशी साठी शासकीय निवास स्थानातून बाहेर नेत चौकशी साठी अन्य जागी हलविले असल्याचे समजले आहे तूर्तास दोन वेगळ्या गाड्या मधून दोघीना पोलीस बंदोबस्त देत तेथून हलविले असल्याच फुटेज मधून समोर आले आहे

![]()
