वसई वकील संघटनेचे शिष्टमंडळ भाजपा आम.रविंद्र चव्हाणांच्या भेटीला : वकिलांना दिलं सकारात्मक आश्वासन….!

वसई न्यायालयाच्याच शेजारी उपलब्ध झालेल्या नविन जागेत ही तात्पुरती न्यायालये उभी करण्यात यावी असा आग्रह वकीलांच्या शिष्टमंडळाने धरला होता. त्यास न्या. राजेंद्र सावंत यांनी होकार ही दिला. अशी तात्पुरती (कंटेनर कोर्टस् ) उभारण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे न्या. राजेंद्र सावंत यांनी वकीलांच्या निदर्शनास आणले. अर्थात असा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऍड.संग्राम देसाई यांनी वकीलांच्या शिष्टमंडळाची रविंद्र चव्हाण यांच्याबरोबर बैठक आयोजित करुन दिली.या बैठकीमध्ये किमान एक कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने रविंद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणले.

वसई :- आशिष राणे ✍️ 📊🏛️
वसईतील न्यायालयांच्या प्रलंबित समस्या तथा अतिरिक्त न्यायालय संख्या वाढवून लागणाऱ्या निधी उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाचे माजी अध्यक्ष आणि नवनिर्वाचित सदस्य ऍड.संग्राम देसाई यांच्या मध्यस्थीने वसई वकीलसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दि.४ जुलै रोजी महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे.
वसई न्यायालयाचा प्रश्न युध्द पातळीवर पोहचलेला आहे.आज ७० हजारांवर प्रलंबित असलेले खटले, न्यायाधिशांची अपुरी संख्या आणि न्यायालयांची कमतरता यामुळे वसईच्या वकीलांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

Adv ☝️✅ मध्यंतरी ठाणे जिल्हयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधिश राजेंद्र सावंत यांनी या संदर्भात वसईला भेट देऊन वकीलांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली होती. तर या प्रकरणांचा निपटारा जलद गतीने व्हावा, यासाठी दहा न्यायालये चालू करण्यास त्यांनी संमत्ती देखील दिली होती.
न्यायालयाच्याच शेजारी उपलब्ध झालेल्या नविन जागेत ही तात्पुरती न्यायालये उभी करण्यात यावी असा आग्रह वकीलांच्या शिष्टमंडळाने धरला होता. त्यास न्या. राजेंद्र सावंत यांनी होकार ही दिला. अशी तात्पुरती (कंटेनर कोर्टस्) उभारण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे न्या. राजेंद्र सावंत यांनी वकीलांच्या निदर्शनास आणले. अर्थात असा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऍड.संग्राम देसाई यांनी वकीलांच्या शिष्टमंडळाची रविंद्र चव्हाण यांच्याबरोबर बैठक आयोजित करुन दिली.
या बैठकीमध्ये किमान एक कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने रविंद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणले.

Adv☝️✅याप्रसंगी चव्हाण यांनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याशी तातडीने बोलून हा निधी उपलब्ध करुन देतो असे आश्वासन त्यांनी वकीलांच्या शिष्टमंडळाला दिले. निधी उपलब्ध झाल्यानंतर किमान सहा तात्पुरती न्यायालये जलदगतीने उभारली जातील असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला.

Adv ☝️✅ प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना भेटायला गेलेल्या जेष्ठ वकीलांच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री ऍड. नोएल डाबरे, ऍड.दिगंबर देसाई, ऍड.साधना पारडीवाला, ऍड.मोजेस रॉड्रीग्ज,ऍड.दर्शना त्रिपाठी, ऍड.प्रकाशकोठावळे आणि ऍड.धनंजय चव्हाण हे सहभागी झाल्याची माहिती वसई वकिल संघटनेचे पदाधिकारी जेष्ठ ऍड. दिगंबर देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे, त्यामुळे वसईतील वकिल मंडळी मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
=======================================
✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal : @Mymarathi7.कॉम वर संपर्क साधावा.
![]()
