पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यातील पहिली यादी जाहीर !

शेतकऱ्यांना मिळाला दिलासा :त्वरा करा आधार प्रमाणिकरण करून लाभ मिळवा…!
तर आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पालघर जिल्ह्यातील तालुका निहाय प्राप्त याद्या या जिल्ह्यातील पहिलीच यादी असून आठ ही तालुके मिळून एकूण 10479 शेतकरी बांधव यासाठी रांगेत उभे राहणार असून या योजनेमुळे संबंध पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
संग्रहित 📈
वसई :- आशिष राणे…. 🔝✍️
महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -2026 अंतर्गत पात्र शेतकरी बांधवांची पहिलीच अधिकृत यादी पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका निहाय गावं व केंद्र ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती पालघर जिल्हा उपनिबंधक किशन रत्नाळे यांनी दिली आहे.
Adv 📈
जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यामध्ये शुक्रवार दि. 24 जुलै रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या गावनिहाय याद्या प्राप्त झाल्यानंतर त्या जिल्ह्यातील सर्व आठ ही तालुक्याच्या केंद्रस्तर ठिकाणी असलेल्या गावातील सेवा सहकारी संस्था कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा तसेच आपले सेवा सरकार केंद्र या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
Adv 📈
दरम्यान यातील पात्र यादीतील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी तात्काळ आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होईल त्यांना तात्काळ कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे.
तर आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पालघर जिल्ह्यातील तालुका निहाय प्राप्त याद्या या जिल्ह्यातील पहिलीच यादी असून आठ ही तालुके मिळून एकूण 10479 शेतकरी बांधव यासाठी रांगेत उभे आहेत.
Adv 📈
पालघर जिल्ह्यातील तालुका निहाय प्राप्त याद्याची आकडेवारी….. खालीलप्रमाणे,
डहाणू-2654 तलासरी-629 मोखाडा-2440 विक्रमगड-1108 वसई-87 वाडा- 1235 जव्हार-1138 पालघर-1188 =10479
==============================
पालघर जिल्ह्यातील आठ तालुके निहाय अशा शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त झालेल्या आहेत. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे व शासनाने देऊ केलेल्या कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा”
किशन रत्नाळे 
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,पालघर
==============================
⚠️महत्त्वाची नोंद – 🔝📈कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal : @Mymarathi7.कॉम वर संपर्क साधावा

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!