समर्थन’चे सर्वेसर्वा विवेकभाऊ पंडित यांच्या संस्थेची आंतरराष्ट्रीय भरारी : समर्थनचे अध्यक्ष ऍड.डॉ.अशोक येंडे व प्रा.डॉ.जयश्री येंडे व्हिएतनामच्या दौऱ्यावर

सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या जागतिक लढाईत अभिमानाची बाब ठरलेली ऐतिहासिक घटना, सायबर (convention )
हनोई (व्हिएतनाम), सायबर गुन्ह्यांवरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या करारनाम्याच्या स्वाक्षरी समारंभासाठी (मंत्री दर्जा) विवेकभाऊ पंडित यांनी स्थापन केलेल्या ‘समर्थन’ संस्थेचे अध्यक्ष ऍड.डॉ.अशोक येंडे आणि प्रा.डॉ.जयश्री येंडे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले असून येत्या दोन दिवसात येंडे दापत्य हनोई (व्हिएतनाम) देशात रवाना होत आहे,ही बाब नक्कीच उभ्या वसई सह संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी व खास करून अखंड भारत देशासाठी अभिमानास्पद आहे.

वसई :- आशिष राणे
सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या जागतिक लढाईत अभिमानाची बाब ठरलेली ऐतिहासिक घटना, सायबर (convention) – म्हणून प्रसिद्ध असलेले ऍड.डॉ.अशोक येंडे आणि प्राचार्या डॉ.जयश्री येंडे
दापत्य यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या सायबर गुन्ह्यांवरील करारनाम्याच्या (United Nations Convention Against Cybercrime) स्वाक्षरी समारंभासाठी विशेष आमंत्रित करण्यात आल्याची माहिती स्वतः ऍड.डॉ.अशोक येंडे यांनी दिली.
हा ऐतिहासिक समारंभ दि.२५ आणि दि.२६ ऑक्टोबर २०२५ रोजी हनोई (व्हिएतनाम) येथे पार पडणार आहे.

(छाया : प्राचार्य जयश्री येंडे)

ऍड.डॉ.अशोक येंडे हे ‘समर्थन’ संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत, जी संस्था विवेकभाऊ पंडित यांनी पूर्वी स्थापन केली आहे.

दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी स्वीकारलेला हा करार सायबर गुन्ह्यांचे प्रतिबंध, तपासणी आणि खटल्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी जगातील पहिला सर्वसमावेशक जागतिक करार आहे.

या ऐतिहासिक समारंभात सुमारे १०० देशांतील राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, उपपंतप्रधान, परराष्ट्रमंत्री आणि परराष्ट्र सचिव उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम व्हिएतनाम सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघ सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

या समारंभाच्या उद्घाटन सत्रात व्हिएतनाम देशाचे राष्ट्राध्यक्ष महामहिम लुंगू कुआंग आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस महामहिम अँटोनियो गुटेरेस प्रमुख विवेचन करणार आहेत.

या संदर्भात आपली भावना व्यक्त करताना ऍड.डॉ.अशोक येंडे म्हणाले, “सायबर जग अधिक सुरक्षित करण्याच्या या ऐतिहासिक जागतिक प्रयत्नांचा भाग होणे ही आमच्यासाठी मोठी सन्मानाची बाब आहे. हा करार विश्वास, सामायिक जबाबदारी आणि समन्वित आंतरराष्ट्रीय कृतीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.”

ते पुढे म्हणाले, “सायबर गुन्ह्यांविरुद्धची लढाई ही केवळ कायदेशीर किंवा तांत्रिक बाब नसून ती सामूहिक जागतिक जबाबदारी आहे. हा करार अधिक मजबूत सहकार्य, क्षमता-वृद्धी आणि डिजिटल युगातील अधिकारांचे संरक्षण यासाठी मार्ग प्रशस्त करतो.”

एकूणच त्यांचा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभाग भारतीय कायदेविषयक आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी नक्कीच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे.

सायबर कायदा, न्याय आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची ही जागतिक पातळीवरील दखल संपूर्ण भारत देशातील विविधतेस अधोरेखित करत आहे.

नेमके कोण आहेत हे ऍड.डॉ.अशोक येंडे सर..

ऍड.डॉ.अशोक येंडे हे विधिज्ञ, मध्यस्थ आणि शैक्षणिक तज्ज्ञ आहेत. ते ग्लोबल व्हिजन इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि मे.येंडे लिगल असोसिएट्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय भागीदार आहेत.
खास म्हणजे ऍड.येंडे सर हे भारताचे सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोग यांच्याकडे मान्यता प्राप्त मध्यस्थ म्हणून देखील कार्यरत आहेत.

सध्या ते स्किलटेक विद्यापीठ, मुंबई येथील कायदा विद्याशाखेचे अधिष्ठाता (Dean) आणि प्राध्यापक आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख तसेच आघाडीच्या विधी महाविद्यालयांचे प्राचार्य म्हणून कार्य केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध समित्यांवर प्रतिनिधित्व करणारे डॉ.येंडे यांनी सायबर कायदा, विधी शिक्षण, शासन व्यवस्था आणि शाश्वत विकास या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :-
ऍड.डॉ.अशोक येंडे
मो.: ९८८१०६७७११

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!