ACB चा ✅correct कार्यक्रम :-बोईसरच्या नवापूर ग्रामपंचायतीचा लाचखोर ग्रामसेवक राजेश संखे रंगेहात ACB च्या जाळ्यात….

 

कृषी पर्यटन केंद्राच्या NOC साठी मागितली 20 हजारांची लाच : पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाचा यशस्वी सापळा..लाचखोरीने जिल्हा पुन्हा प्रभावीत…

पालघर :-आशिष राणे
जगातील पहिल्या दहा आंतरराष्ट्रीय बंदराच्या धर्तीवर विकसित होणाऱ्या वाढवण बंदर ज्या आदिवासी बहुल अशा पालघर जिल्ह्यात मोडते त्यां महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हा आणि तालुक्यातील नवापूर ग्रामपंचायमधील लाचखोर ग्रामसेवक राजेश पंढरीनाथ संखे याला 20 हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी रंगेहात ताब्यात घेण्यात आल्याची कारवाई पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली आहें.

Adv

पालघर हा पर्यटन जिल्हा म्हणून हीं घोषित असून याचं जिल्ह्यातील एका कृषी पर्यटन केंद्रास ना हरकत दाखला ( NOC ) देण्यासाठी राजेश संखे या लाचखोर ग्रामसेवकाने पैशाची मागणी केली होती.

या प्रकरणी पडताळणी अंती पालघर लाचलूचपत प्रतिबंधक विभागानें मंगळवारी सायंकाळी सापळा रचून यशस्वी कारवाई केली असून अदयाप गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सातपाटी पोलिस ठाण्यात सुर आहें.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात बोईसर स्थित नवापूर ग्रामपंचायत अस्तिवात असून येथील नवापूर गावात एक कृषि पर्यटन केंद्र कार्यरत होणे कामी या कृषी पर्यटन केंद्राच्या मालकाने या केंद्रात तरंग तलाव (स्विमिंग पूल,) समवेत पर्यटकांच्या निवासासाठी तीन खोल्या, उपहार गृह, व न्याहारी गृह आदी पर्यटन सुविधा सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत नवापूर यांच्या कार्यालयात अर्ज करून ना हरकत दाखला ( NOC ) मिळणे कामी विनंती अर्ज केला होता.

   Adv

मात्र ग्रामसेवक राजेश संखे याने ना हरकत दाखला आपल्याला हवा असेल तर तक्रारदाराकडे 20 हजारांच्या लाचेची मागणी केली
त्यानुसार तक्रारदार यांनी लागलीच पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारऱ्याकडे रीतसर तक्रार दाखल केली.

दरम्यान,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची शहानिषा करीत पडताळणी केली असता त्यात तथ्य आढळून आले

✅आणि अखेर लाचखोर राजेश ACB च्या सापळ्यात रंगेहात अडकला….

पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक दादाराम करांडे, पोलीस निरीक्षक राकेश डांगे, पोलीस कर्मचारी विलास भोये, आकाश लोहारे आणि जितेंद्र गवळे आदी या टीमने मिळून हा सापळा रचला असता मंगळवारी सायंकाळी संखे याने तक्रारदार यांचेकडुन पंचांसमक्ष वीस हजार रुपये रोख रक्कम स्वीकारली.

परिणामी, हीं लाच स्वीकारतांना सापळा लावलेल्या टीमने तात्काळ लाचखोर राजेश यांस ताब्यात घेतले.

या प्रकरणी पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग तसेच तक्रारदार यानी दिलेल्या तक्रारी नुसार राजेश संखे याच्याविरुद्ध सातपाटी पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

✅कांय आहें नेमकं पूर्ण प्रकरण… पहा व वाचा हीं प्रेसनोट..

 

 

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!