विरार आगाशी येथील महिलेचा स्वयंपाकघरात सापाच्या दंशाने मृत्यू ; 

तीन रुग्णालयांत हलवल्यानंतर गमावले प्राण..!

विरार आगाशी सोमाडी येथील शैला ऊर्फ चार्लेटी

एलायस घोन्सालविस यांना मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास स्वयंपाकघरात सापाने दंश केला होता. मात्र तात्काळ उपचारा अभावी गमवावा लागला प्राण…परिसरात हळहळ….

वसई : आशिष राणे📝
वसई तालुक्यातील विरार मधील आगाशी येथील ५१ वर्षीय महिलेचा, घरात विषारी सापाचा दंश झाल्याच्या दुसऱ्या दिवशी,

बुधवारी सकाळी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे

शैला ऊर्फ  चार्लेटी  घोन्सालविस यांना मंगळवारी

पहाटे ५ च्या सुमारास स्वयंपाकघरात सापाने दंश केला होता.
सुरुवातीला त्यांना आगाशी येथील एका खाजगी
रुग्णालयात नेण्यात आले

मात्र त्याठिकाणी प्रकृती खालावल्यामुळे नंतर इतर दोन रुग्णालयांत त्यांना हलवण्यात आले.


दरम्यान विरार मधील एका रुग्णालयात उपचार
सुरू असताना बुधवारी पहाटे १.३० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. घोन्सालविस या विरार पश्चिम
मधील आगाशी येथील सोमाडी भागात पती एलायस घोन्सालवीस तसेच शेरीन व ऐलसी घोन्सालवीस या दोन मुलींसह राहत होत्या.

घरी प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना आगाशी येथीलएका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यानंतर बोळींज येथील वसई-विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्यांना नंतर शेवटी विरार मधील संजीवनी रुग्णालयात दाखल
करण्यात आले.
“त्यांना आमच्या रुग्णालयात आणले असता आम्ही तातडीचे उपचार केले आणि इंजेक्शन दिले. मात्र, प्रकृती बिघडत गेल्याने त्यांना संजीवनी रुग्णालयात हलवण्यात आले,” असे बोळींज येथील महापालिका रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

शैला घोन्सालविस या अंधेरी येथील ‘सीबर्ड मेडिकल सेंटर’मध्ये कार्यरत होत्या; तिथे त्या जहाजांवर काम करणाऱ्या
लोकांसाठी वैद्यकीय विम्याची व्यवस्था करण्याचे काम पाहत होत्या…

तात्काळ उपचाराअभावी गमवावे लागले प्राण…!

एकूणच शैला यांनी सापाने दंश केल्यावर घरीच हळद लावून वेळ काढला तर नेमकं काय चावलाय हेच लक्षात नं आल्याने बरं होईल या भ्रमात राहिल्या किंबहुना त्यांनी कुटूंबाच्या साथीने लागलीच तात्काळ रुग्णालयात धाव घेऊन उपचार घेतले असतें तर नक्कीच त्यांचे प्राण वाचू शकले असतें अशी ही वंदिता त्यांचे मित्र परिवार ग्रामस्थ करीत असून त्यांच्या या अशा अचानक जाण्यानं संपूर्ण कुटुंब व सोमाडी आगाशी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होतं आहे.

आगाशी मधील संत जेम्स चर्च मध्ये होतील अंत्यविधी….!

शैला यांच्यावर बुधवारी सायंकाळी 7 वाजता आगाशी मधील संत जेम्स चर्च मध्ये अंत्यविधी संस्कार होणार असल्याचे त्यांच्या कुटूंबियानी सांगितलं.

मायमराठी7कडून भावपूर्ण श्रद्धांजली…. 🙏💐


.

⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा ! Mymarathi7.com

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!