मुख्यमंत्री आज संपूर्ण दिवस स्वतः पालघर जिल्हा दौऱ्यावर असून यात त्यांचे ५ कार्यक्रम होत असून चारही ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री जातींन हजर राहणार आहेत मात्र वसई विरार महापालिकेच्या सर डी एम पेटिट रुग्णालयाच्या विस्तारित वास्तूचे लोकार्पण ते जिल्हाधिकारी कार्यालयात बसून दूरदृश्य प्रणाली द्वारे “ऑनलाइन” पध्दतीने करणार आहेत
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत बदल
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत बदल
राष्ट्रीय महामार्गावरून मनोर येथून पालघर येथे येणारी व पालघर येथून मनोर कडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
पालघर : आशिष राणे

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कौशल्य विकास उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आदी मान्यवर आज दि १६ जून रोजी सकाळी ११ वाजता पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या अनुषंगाने सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा वर्षा निवासस्थानी मुंबई अहमदाबाद ( महामार्ग क्र ४८ ) राष्ट्रीय महामार्गा मनोर मार्गे पालघर दुर्वेस येथे येणार त्यामुळे पालघर येथून मनोर कडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात व अन्य मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत.
पालघर तालुक्यातील मनोर जवळील दुर्वेस येथील जिल्हा परिषद शाळेत आज सकाळी ११ वाजता विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या वतीने मनोर मैदान या ठिकाणी सामंजस्य करार कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अप्पर जिल्हा दंडाधिकारी सुभाष भागडे यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर डी.एम. पेटिट रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे दु १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा !
आज दि १६ जून रोजी दुपारी १२ वाजता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर डी.एम. पेटिट रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे संपन्न होणार आहे अशी वसई विरार महापालिका प्रशासनाच्या प्रभारी जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे
दुपारी १ वाजता मुख्यमंत्री फडणवीस विरार फाट्या वर ( बांबू लागवड अभियान )
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालघर चे दोन्ही कार्यक्रम आटोपून दु १ वाजता विरार पूर्व खैरपाडा ( विरार फाटा ) येथे बांबू लागवड अभियान अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार असून याप्रसंगी माजी आमदार पाशा पटेल व माजी आमदार विवेक पंडित ( मंत्री दर्जा ) हे सहभागी होणार आहेत
वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं दुपारी २ वाजता होणार उद्घाटन !

वसई विधानसभा मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद आणि लोकसेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने वसई विधानसभेच्या आमदार सौ. स्नेहा ताई दुबे-पंडित यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज दुपारी २ वाजता माणिकपूर समाज उन्नती मंडळाच्या मागील बाजूस असलेल्या ठिकाणी हा सोहळा संपन्न होणार असल्याचे आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाने कळविले आहे
या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत प्रमुख उपस्थिती म्हणून वनमंत्री तथा पालकमंत्री (पालघर जिल्हा),विवेक भाऊ पंडित अध्यक्ष, आदिवासी विकास आढावा समिती (मंत्री दर्जा),डॉ.हेमंत सवरा खासदार, पालघर लोकसभा निरंजन डावखरे ( सदस्य, विधानपरिषद) ज्ञानेश्वर म्हात्रे ( सदस्य, विधानपरिषद )नालासोपारा चे आमदार राजन नाईक,विक्रमगड चे आमदार हरिश्चंद्र भोये. तसेच संघटन मंत्री, भाजपा ठाणे, कोकण चे हेमंत म्हात्रे, श्रीमती राणी द्विवेदी ( सचिव, भाजपा महाराष्ट्र ) आणि सौ. प्रज्ञा पाटील ( जिल्हा अध्यक्षा, भाजपा वसई विरार जिल्हा) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
असा असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पालघर व वसई दौरा

![]()
