वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

वसई विरार शहर महानगरपालिकेची ५ वर्षानंतर होणार निवडणूक ; प्रभाग रचना बदलणार ,२०२२ ला प्रभाग रचनेवर केलेला खर्च वाया

 

आता नविन प्रभाग रचना करण्यात येणार असल्याने पूर्वी २०२२ रोजी केलेल्या प्रभाग रचनेवरील खर्च मात्र वाया गेला आहे. त्यामुळे आता नव्याने २९ प्रभाग होणार असून ४ चे २८ आणि ३ सदस्यांचा एक असे एकूण २९ प्रभाग असणार आहेत.

विरार :- संदीप पंडित 

राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. यातच गेल्या पाच वर्षा पासून लोकप्रतिनिधी विना असलेल्या वसई विरार महानगरपालिकेचीही निवडणूक अखेर होणार आहे.

या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्यात येणार आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच लोकप्रतिनिधीविना ५ वर्षे प्रशासकाने पालिका चालवली आहे.

२०२२ ला या महापालिकेची प्रभाग रचना करण्यात आली होती त्यात १२६ सदस्य असणार होते. आणि ३ सदस्यांचा एक प्रभाग असे ४२ प्रभाग तयार करण्यात आले होते. परंतु सुरुवातीला कोरोना मुले आणि नंतर ओबीसी मुले निवडणूक पुर्ढे ढकलण्यात आली होती. आता नविन प्रभाग रचना करण्यात येणार असल्याने पूर्वी केलेल्या प्रभाग रचनेवरील खर्च मात्र वाया गेल्याचे बोलले जात आहे. नव्याने २९ प्रभाग होणार असून ४ चे २८ आणि ३ सदस्यांचा एक असे २९ प्रभाग असणार आहेत.

क वर्ग वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक २०१५ साली एक सदस्यीय प्रभागाद्वारे झाली होती त्यावेळी पालिकेत ११५ नगरसेवक होते. २८ जून २०२० ला या पालिकेतील लोकप्रतिनिधींची मुदत संपली होती. परंतु त्या काळात कोरोना मुले निवडणुका ६ महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या ३ वेळा पुढे ढकलल्या गेल्या दरम्यानच्या काळात ओबीसी वरून पुन्हा निवडणुका रखडल्या गेल्या त्या सलग पाच वर्षा पर्यंत. २०२२ ला पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यात आली होती त्यात १२६ सदस्य आणि ३ चे ४२ प्रभाग बनविण्यात आले होते. त्याच प्रमाणे प्रभागाची आरक्षणे हि टाकण्यात आली होती. त्यात महापौरांसाठी चे आरक्ष हे राखीव महिला साठी होते. परंतु त्याच दम्यान ओबीसींचा मुद्दा तापला आणि प्रकरण न्यायालयात गेल्याने पुम्हा निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे १० वर्षा नंतर आता निवडणुका होणायाचे संकेत मिळत आहेत. २०२२ लाडू केलेल्या प्रभाग रचना त्यावेळी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली होती. परंतु ओबीसींच्या मुद्द्यामुळे त्यावर कोणताही निर्णय झाला नसल्याने आता पुन्हा एकदा २०११ च्या लोकसंख्ये नुसार प्रभाग रचना करण्यात येणार आहे. २०११ ला वसई विरारच्या लोकसंख्या १२ लाख ३४ हजार ६९० इतकी होती. १४ वर्षा नंतर त्या लोकसंख्येत  दुप्पट वाढ झाली असली तरी जुन्याच लोकसंख्ये नुसार प्रभाग रचना करण्यात येणार आहे. यावेळी सदस्य संख्या हि २०१५ मध्ये असलेली ११५ इतकीच राहणारआहे. परंतु प्रभाग संख्या मात्र २९ असणार आहे. यात ४ सदस्यांचे २८ प्रभाग असणार आहेत तर एक प्रभाग हा ३ सदस्याचा असणार आहे.
======================================

विधानसभा भाजपकडे असल्याने महापालिकेवर बविआ ला सत्ता मिळवणं कठीण तर नाही ना ?

वसई विरार मध्ये भाजपने ३ हि जागा जिंकल्याने येणाऱ्या निवडणुकीत महापालिकेच्या स्थापने पासून सत्तेवर असलेल्या बहुजन विकास आघाडीला मात्र निवडणुकीत मेहनत करावी लागणार आहे. २०१५ ला महापालिकेत बहुजन विकास आघाडीने ११५ पैकी १०८ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. परंतु यावेळी मात्र त्यांना महायुतीचा सामना करावा लागणार आहे. महायुतीत भाजप हा मोठा भाऊ असल्याने एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजप किती जागा सोडते यावर निवडणुकीची गणिते ठरणार आहेत. तर दुसर्या बाजूला बहुजन विकास आघाडी एकला चलोच मार्ग अवलंबिणार कि महाविकास आघाडी बरओबर हात मिळवणी करणार यावर सत्तेची गणिते ठरणार आहेत.
======================================

जनगणना होणे आवश्यक पण ??

२०२१ ला जनगणना होणे अपेक्षित होते. परंतु ती झाली नसल्याने २०११ च्या जनगणनेनुसार येणारी निवडणूक होणार आहे. त्यामुळे वाढलेल्या लोक्संख्येमुळे प्रभाग मोठे होण्याची श्यक्यता वर्तविण्यात येत आहे.
आता नव्याने प्रभाग रचना होणार असल्याने आरक्षणे हि बदलली जाणार आहेत. त्यामुळे २०२२ ला महापौर पदाचे आरक्षण आरक्षित महिलेले साठी होते. तेही बदलले जाणार असे बोलले जात आहे..

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!