मुख्यमंत्री देवाभाऊंच्या रंजक खेळीने बविआ थेट बाजूला : अडीच -अडीच वर्षाचा महायुतीचा फार्मुला सेट…!

शनिवारी (11 जुलै ) सकाळी 11 वाजता अध्यक्षपदासाठी सहकार पॅनलमधून एकूण तीन अर्ज भरले गेले त्यामध्ये आकाश बाबाजी पाटील,अरुण बाळू पाटील, आणि मनीष राजेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले, तर परिवर्तन पॅनलचे आकाश बाबाजी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे भाजपा चे अरुण पाटील व बहुजन विकास आघाडी चे मनीष राजेंद्र पाटील यांची थेट लढत झाली त्यामध्ये अरुण पाटील (कल्याण ) यांना 14 मते पडली तर मनीष पाटील (वसई ) यांना केवळ 7 मते मिळाली आणि 7 मतांच्या फरकाने अरुण पाटील विजयी झाले.
तसेच उपाध्यक्ष पदासाठी देखील 3 उमेदवारी अर्ज आले होते त्यात ज्योती पटेकर, भाग्यश्री भोईर व अमित घोडा पैकी एनवेळी ज्योती पटेकर व अमित घोडा यांनी माघार घेतली, त्यामुळे मतदान नं होताच वाड्याच्या शिवसेना शिंदे गटाच्या भाग्यश्री निलेश भोईर उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आल्या
मुद्दा असां आहे की, बहुजन विकास आघाडीकडे स्वतः ची निर्णायक ५ मते असताना वाढीव दोन मते कुणाची पडली,? यावरून नवा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. भाजपच्या दुसऱ्या गटाकडून बविआला मतदान केले असावे, अशी देखील नवीन चर्चा आहे.
वसई :- आशिष राणे,… सहकार विशेष ✍️
बहुचर्चीत ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अरुण बाळु पाटील यांची निवड झाली आहे. तसेच उपाध्यक्षपदी भाग्यश्री निलेश भोईर यांची बिनविरोध वर्णी लागली आहे.
अवघ्या देशाचं व महाराष्ट्र राज्याच्या सहकारातील विविध अशा बलाढ्य राजकीय व्यक्तीचं या जिल्हा बँक निवडणूकीकडे विशेष लक्ष लागलं होतं.अखेर भाजपा आणि शिवसेना (महायुती) यांच्या चाणक्य रणनीतीमुळे हे यश मिळाले,
अर्थात या चूरशीच्या निवडणुकीमुळे बँकेवरील बहुजन विकास आघाडीचे अनेक वर्षांचे वर्चस्व मात्र बऱ्यापैकी संपुष्टात आले आहे
महाराष्ट्र राज्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली होती,

किंबहुना बँकेवर निवडून आलेल्या २१ जागा आणि आता त्याच्या पाठोपाठ अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही बविआला सपशेल बाजूला सारून भाजपा -शिवसेना यांच्या महायुतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंतिम निर्णयाने सपशेल बाजी मारली आहे.
भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय चाणक्यनीतीच्या या सहकार मय आणि परिवर्तन बघायला मिळालेल्या निवडणुकीत वेगळाच बदल पाहायला मिळाला आहे.
या ऐतिहासिक विजयामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर वर्षानुवर्षे असणारे माजी आमदार हितेंद्र ठाकूर अध्यक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडी पक्षाचे (पॅनल ) वर्चस्व मात्र अखेर मोडीत निघाले असून बँकेची सत्ता आता पूर्णतः भाजपा -शिवसेना महायुतीकडे गेली आहे.

बँकेच्या अध्यक्षपदी अरुण बाळू पाटील यांची तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री निलेश भोईर यांची बहुमताने निवड झाली आहे.
मुख्यमंत्री देवाभाऊंची किमया : दोन्ही पॅनल मध्ये महायुती : बविआचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी शिंदें-चव्हाणांची रणनीती यशस्वी !

खरं तर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत ‘सहकार पॅनल’ विरुद्ध ‘परिवर्तन पॅनल’ अशी थेट लढत सुरुवातीला बऱ्यापैकी रंगली होती. महायुती मधील बरेचशे चेहरे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते मात्र, बँकेवर वर्षानुवर्षे एक हाती पकड असलेल्या बहुजन विकास आघाडीला सत्तेतून बाहेर करण्यासाठी काही तरी ठोस असे करावे लागेल अखेर महायुती धर्म समोर आला आणि आम रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अभ्यासु मार्गदर्शनाने एक आगळी वेगळी यशस्वी अशी चाल खेळली,
त्यांनी भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील आपले उमेदवार आपल्या दोन्ही पॅनलमध्ये उभे केले.

दरम्यान बँकेच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या या रणनीतीमुळे निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचे दोन्ही पॅनल मिळून तब्बल १४ उमेदवार निवडून आले होते.
त्यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नेमके काय होणार ? आणि कोणाचा उमेदवार बाजी मारणार, याकडे केंद्रीय नेतृत्वासोबत राज्यातील मोठया राजकीय वर्तुळाचे देखील लक्ष लागले होते.
अखेर या नाट्यमय अशा राजकीय रंजक नाट्याचा शेवट महायुतीच्या विजयानेचं झाला.

सहकार पॅनलचे कथोरे- परिवर्तनचे कपिल पाटील यांची एकजूट, मात्र शिवसेनेचे एक मत फुटले
अध्यक्षपदाच्या प्रत्यक्ष निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीच्या बाजूने १४, तर बहुजन विकास आघाडीच्या बाजूने ७ उमेदवारांनी मतदान केले. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, दोन्ही पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकलेले भाजपचे खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे या दोन्ही नेत्यांमध्ये शेवटी अध्यक्षपदाच्या निवडीवेळी मात्र एकजूट पाहायला मिळाली. हा मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या समवेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय प्रगल्भतेचा आणि समन्वयाचा मोठा विजय मानला जात आहे.
मात्र, महायुतीसाठी कथोरे आणि पाटील हे पुन्हा एकत्र आले आणि याचे प्रत्यक्षात श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना जातं एकूणच महायुती साठी सहकार वं परिवर्तन पॅनल म्हणून एकत्र या असे आवाहन झालं व महायुतीच्या धर्माने अखेर महायुतीने भाजपा चे अरुण बाळू पाटील आणि शिवसेना शिंदे गटाच्या भाग्यश्री भोईर यांच्या रूपाने बँकेच्या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर आपला कब्जा मिळवत बविआच्या माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांना चार हात लांब ठेवत त्यांची शिट्टी गुल केली आहे हे आता मान्यच करावे लागेल.
निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार,
अध्यक्ष पदासाठी-
आकाश बाबाजी पाटील
अरुण पाटील
मनीष राजेंद्र पाटील या तिघांचे अर्ज होते पैकी आकाश बाबाजी पाटील यांनी माघार घेतली. 2 उमेदवारांमध्ये मतदान झाले-
अरुण पाटील – कल्याण 14 मते
मनिष पाटील – वसई 7 मते
================================
उपाध्यक्ष पदासाठी 3 अर्ज आले होते
ज्योती पटेकर
भोईर भाग्यश्री निलेश
घोडा अमित कृष्णा
यापैकी ज्योती पटेकर व अमित घोडा यांनी माघार घेतली त्यामुळे भाग्यश्री भोईर बिनविरोध उपाध्यक्षपदी निवडून आल्या आहेत.
======================================
✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal : Mymarathi7.कॉम वर संपर्क साधावा.
![]()
