मुख्यमंत्री तथा त्यांच्या कार्यालयाकडून मागणीची तात्काळ दखल, मागणीच्या अंमलबजावणीसाठी डॉ. येंडे यांचा मागणी अर्ज मुख्य सचिवाकडे वर्ग…!

मुख्यमंत्री कार्यालयाचा हा सकारात्मक आणि त्वरित प्रतिसाद सार्वजनिक आरोग्य व प्रशासकीय उत्तरदायित्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ. येंडे यांनी म्हटले आहे. डॉ.येंडे पुढे असे हि म्हणाले, की “अन्नभेसळीविरुद्धची लढाई ही केवळ एका प्रशासकीय तथा सनदी अधिकाऱ्याची मोहीम नसून प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याच्या आणि घटनात्मक जीवनाधिकाराच्या संरक्षणाची लढाई आहे. प्रामाणिक अधिकारी जनहितासाठी प्रभावशाली व्यवस्थेविरुद्ध उभा राहतो, तेव्हा शासन आणि समाजाने त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.”
वसई : -आशिष राणे, वसई✍️🎯
महाराष्ट्रातील अन्नभेसळ, अस्वच्छ अन्ननिर्मिती, असुरक्षित घटकांचा वापर, निकृष्ट साठवणूक आणि विनापरवाना खाद्य व्यवसायांविरोधात कठोर कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तथा वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेला शासनाने पूर्ण पाठबळ व संस्थात्मक संरक्षण द्यावे, अशी महत्वाची मागणी जेष्ठ विधिज्ञ व शिक्षणतज्ज्ञ ऍड.(डॉ.) अशोक येंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
या संदर्भात डॉ येंडे यांनी अन्नभेसळीचे गंभीर आरोग्यविषयक परिणाम, नागरिकांच्या सुरक्षित अन्नाच्या घटनात्मक अधिकाराचे संरक्षण तसेच प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना आवश्यक असलेल्या संस्थात्मक पाठबळाचा जटील मुद्दा असो की,

✅☝️संग्रहित वृत्त (नमो संघराज )
“बदल्यांशी झुंज, अन्न भेसळीविरुद्ध धडक कारवाई आणि त्यात प्रामुख्याने तुकाराम मुंढे आणि प्रशासकीय उत्तर दायित्वाचा प्रश्न” अशी चौफेर चिंता दर्शवणारे एक खरमरित पत्र दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवून त्यांच्याकडे हे मुद्दे उपस्थित केले होतें
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने या निवेदनाची आता गंभीर व तात्काळ दखल घेतली असून ते योग्य कार्यवाहीसाठी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आल्याचे डॉ. येंडे यांना ई मेल द्वारे स्पष्ट कळविण्यात आल्याची माहिती स्वतः डॉ अशोक येंडे यांनी दिली आहे
मागील आठवड्यात डॉ. अशोक येंडे यांनी अन्नभेसळ ही केवळ ग्राहकांची फसवणूक नसून नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवनाला थेट धोका आहे, असे पत्र समस्त राज्यसरकारला नमूद करताना (भा. प्रा. से ) तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली धडक कारवाई कायदेशीर प्रक्रिया, पारदर्शकता, समानता आणि प्रमाणबद्धतेच्या तत्त्वांचे पालन करून अधिक प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी करण्यात आली,

✅Adv☝️ तसेच प्रभावशाली हितसंबंधांच्या दबावापासून त्यांचे संरक्षण करून त्यांना पुरेसा कार्यकाळ आणि प्रशासकीय स्वायत्तता देण्याची मागणीही त्यांनी या पत्रातून केली आहे.किंबहुना डॉ. येंडे यांचं हे सरकारला दिलेलं पत्र आता डोळ्यात अंजन घालणारं ठरलं आहे
परिणामी मुख्यमंत्री कार्यालयाचा हा सकारात्मक आणि त्वरित प्रतिसाद सार्वजनिक आरोग्य व प्रशासकीय उत्तरदायित्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ. येंडे यांनी म्हटले आहे.

✅Adv☝️डॉ. अशोक येंडे पुढे असे हि म्हणाले, की “अन्नभेसळीविरुद्धची लढाई ही केवळ एका प्रशासकीय तथा सनदी अधिकाऱ्याची मोहीम नसून प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याच्या आणि घटनात्मक जीवनाधिकाराच्या संरक्षणाची लढाई आहे.
प्रामाणिक अधिकारी जनहितासाठी प्रभावशाली व्यवस्थेविरुद्ध उभा राहतो, तेव्हा शासन आणि समाजाने त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.”

✅Adv ☝️डॉ. येंडेकडून मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार….!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री कार्यालयाने त्वरित दखल घेतल्याबद्दल डॉ. अशोक येंडे यांनी आभार व्यक्त केले असून, मुख्य सचिवांकडून या विषयावर सकारात्मक व ठोस कार्यवाही होईलचं , अशी अपेक्षा देखील डॉ. येंडे यांनी मायमराठी7 शी बोलताना व्यक्त केली आहे.

✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal : www.Mymarathi7.com वर संपर्क साधावा.
![]()
