असले नाय तें धंदे करू नका..?? हितेंद्र ठाकूर (आप्पा ) वैतागले : वसई-विरारमध्ये “ऑपरेशन लोटस “? ची रंगतेय जोरदार चर्चा..

बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकुरांचा भाजपाला सडेतोड इशारा : बविआचे नगरसेवक गळाला लागणार कीं फुटणार ?

वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर आता वसई विरारमध्ये राजकीय संघर्षाला तोंड फुटलं असून इथं ऑपरेशन “लोटस”ची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

✅काय आहें हे “ऑपरेशन कमल….

हा शब्द मुळातच सन २००८ मध्ये भारतीय जनता पक्षाने कर्नाटक राज्यात वापरल्या जाणाऱ्या राजकीय रण नितीचे वर्णन करण्यासाठी तयार करण्यात आला होता..त्यावेळी या ऑपरेशन चे नेतृत्व माजी मंत्री जी. जनार्दन रेड्डी यांनी केलं होतं आणि त्यामध्ये विरोधी पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न केले गेले होते तेव्हापासून हा शब्द देशभर प्रचलित झाला.

वसई :- आशिष राणे
वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवार दि.१६ जानेवारी रोजी जाहीर झाल्यानंतर आता वसई विरारमध्ये भाजपा विरुद्ध बविआ असा राजकीय संघर्ष वाढताना दिसत आहे.
या अगोदर खरं तर दिल्ली दरबारी व ज्या ज्या राज्यात निवडणूकां होतात त्याठिकाणी “ऑपरेशन लोटस” ची कथा आपण सोशल,प्रिंट किंवा इलेट्रॉनिक मीडियाच्या माध्यमामधून ऐकत आलो होतो,

✅Adv

मात्र दिल्ली आणि मुंबई याचे केंद्र बिंदू जरी असले तरी प्रत्यक्षात इथं वसई विरार च्या राजकारणात किंगमेकर ठरलेले माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने तब्बल दहा वर्षांनी (बविआ) पुन्हा एक हाती सत्ता काबीज करत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे,

अर्थात दि.१५ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या या सार्वत्रिक निवडणूकित पुन्हा तिसऱ्यांदा ११५ पैकी ७१ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले असतानाही, आता भाजपाकडून ‘ऑपरेशन लोटस’ राबवून ठाकुरांचे निवडून आलेले बहुतांश शिलेदार म्हणजेच नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा सध्या वसईत विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु आहे.

दरम्यान या राजकीय उलथा पालथ करणाऱ्या आणि खुमासदार चर्चे बाबत त्यांना विचारलं असता त्यांनी मला माहित नाही मात्र बविआचे अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या खास व नेहमीच्या शैलीत “ऑपरेशन लोटस” बाबत वृताचा खरपूस समाचार घेतला आहें,

✅Adv

ठाकुरांनीं भाजपाला सांगितलं कीं, “माझा एकही नगरसेवक कुठेही जाणार नाही, “असले नाय ते धंदे करू नका…बंद करा हे सर्व…. आधीच लोकांनी तुम्हाला धडा शिकवला आहे, आणि हे जर असं केलं तर लोकं तुमच्या तोंडत शे…?? घालतील.. एवढंच सांगतो, अशा कडक शब्दांत मजबूत इशारा दिला आहे.

गाफिल राहून चालणार नाही कारण… रात्र वैराची आहें….

दुसरीकडे या “ऑपरेशन लोटस “च्या संदर्भात भाजपाचे वसई आणि वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही, मात्र हे वृत्त किती सत्य आहें कीं नाही किंवा खोटं जरी पसरवलं जातं असलं तरी बविआ व त्यांच्या वसई नालासोपारा आणि विरार येथील पक्षश्रेष्टींच्या टीमला आपल्या निवडून आलेल्या नगरसेवकांवर बऱ्यापैकी बारीक नजर ठेवावी लागेल किंबहुना गाफिल राहून चालणार नाही कारण रात्र वैराची आहें….

त्यामुळे पुढील चार दिवसात वसई विरार मध्ये भाजपा कीं बविआ चे नगरसेवक फुटतात कीं फोडले जातात अशा राजकीय घडामोडीच्या चर्चा या महानगरपालिकेच्या महापौर निवडी पर्यंत चर्चील्या जाणार आणि याबाबत एक मोठी राजकीय खेळी सुद्धा खेळली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहें.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!