वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

नवनियुक्त तहसिलदार दीपक गायकवाड स्विकारणार वसई तहसिलदार पदाची सूत्रे : आज सोमवारी दुपारी ३.०० वाजता हाती घेणार पदभार..

महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन विभागाने प्रशासकीय कारणास्तव आणि सार्वजनिक सेवेच्या हितासाठी तहसीलदार संवर्गातील अधिकारी दीपक गायकवाड यांच्या बदलीचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सह सचिव मनीषा जायभाये यांनी सोमवार

दि.२२ डिसेंबर २०२५ रोजी जारी केले होते.

दरम्यान मुंबई उपनगर जिल्हातील कुर्ला विभागातील (सं.गां.यो) तहसीलदार  दीपक गायकवाड हे आता तेथील तहसीलदार पद व निवडणूक कर्तव्यातून मुक्त झाले असून आज सोमवारी दुपारी ३ वाजता तें आपल्या वसई तहसीलदार पदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचे त्यांनी #mymarathi7.Com शी बोलताना स्पष्ट केलं.

वसई :- आशिष राणे
तत्कालीन वसई तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्या पदोन्नती व बदलीने रिक्त झालेल्या वसई तहसीलदार पदासाठी महसूल विभागाने मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला विभागात कार्यरत असलेले(सं.गां.यो) तहसीलदार दीपक गायकवाड यांची नियुक्ती मागील महिन्यातच केली होती, मात्र राज्यांतील सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुका व आचारसंहिता लागू झाल्याने त्यांनी वसईचा पदभार घेतला नव्हता,

दरम्यान मुंबई उपनगर जिल्हातून तहसीलदार गायकवाड हे आता तेथील तहसीलदार पद व निवडणूक कर्तव्यातून मुक्त झाले असून आज सोमवारी दुपारी ३ वाजता तें आपल्या वसई तहसीलदार पदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे,

त्यासाठी नवनियुक्त तहसीलदार दीपक गायकवाड हे आता वसईसाठी मुंबई हुन रवाना झाल्याची माहिती स्वतः तहसीलदार दीपक गायकवाड यांनी मायमराठी7 शी बोलताना दिली.

✅Adv

महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन विभागाने प्रशासकीय कारणास्तव आणि सार्वजनिक सेवेच्या हितासाठी तहसीलदार संवर्गातील अधिकारी दीपक गायकवाड यांच्या बदलीचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सह सचिव मनीषा जायभाये यांनी दि.२२

डिसेंबर २०२५ रोजी जारी केले होते.

मात्र राज्यातील सर्वच महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणुका-२०२५ जाहीर होऊन आचारसंहिता सुरु झाली होती त्यातच दि. १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया आणि दि. १६ जानेवारी रोजी मतमोजणी असल्याने सर्व अधिकारी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यभर निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असल्यामुळे नवनियुक्त तहसीलदार दीपक गायकवाड हे बदलीनंतर आपला रिक्त पदभार सार्वत्रिक निवडणूकिची आचारसंहिता संपल्यावर म्हणजेचं दि. १७ जानेवारी २०२६ रोजी नंतरच स्विकारतील अशी माहिती त्याचवेळी वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी दिली होती.

Adv ✅

आणि वसईकरांची हीं दीड -दोन महिन्याची प्रतीक्षा संपलीय…!

मात्र अखेर तो दिवस आज उजाडला असून नवनियुक्त तहसीलदार दीपक गायकवाड आज दुपारी आपल्या वसई तहसीलदार पदाच्या काटेरी खुर्चीत विराजमान होऊन वसईचा रेंगाळलेल्या कारभाराला दिशा देणार आहेत.

खरं तर आजपावेतो सध्यस्थितीत वसई तहसीलदार हे पद दीड तें दोन महिन्यापासून रिक्त होते त्यात तहसीलदार गायकवाड हे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कुर्ला विभाग अंतर्गत संजय गांधी योजना विभागाचे तहसीलदार या पदावर कार्यरत होते, त्यावेळेस बदली झाली तरी शासनाचा तो आदेश महाराष्ट्र सरकारी कर्मचारी बदली कायदा, २००५ अंतर्गत आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या परवानगीने जारी करण्यात आला होता .

वसईत येण्यापूर्वी कुठे होते तहसीलदार दीपक गायकवाड…?

तूर्तास शनिवार पर्यंत नवनियुक्त तहसीलदार दीपक गायकवाड हे कुर्ला विभागातील संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून कार्यरत होते त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत होते, तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते नवीन पदभार स्वीकारतील हे त्याचवेळी स्पष्ट झालं होतं आणि वसईकरांची हीं दोन महिन्याची प्रतीक्षा संपली आहें.

वसई तहसीलदार व प्रांताधिकारी कार्यालयाचा अनुभव.. पाठीशी पण…व्यवसायभिमुख कामांना प्राधान्य नं देता समाज व लोकांभिमुख कामाची मोठी आशा…!

दुसरीकडे नवे तहसीलदार दीपक गायकवाड हे यापूर्वी वसई तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत होते तर त्यानंतर ते काही काळ त्यांनी वसई उपविभागीय कार्यालयात हीं नायब तहसीलदार म्हणून कामकाज केलेले आहे.

त्यामुळे वसई तालुका महसूल यंत्रणे संबंधित त्यांना बऱ्यापैकी माहिती आहें अर्थात त्यामुळे नव्या तहसीलदारांना फार काही अडचणीचा सामना करावा लागणार नाही हे जरी सत्य असले तरी नव्या तहसीलदारांनी व्यवसायभिमुख कामांना प्राधान्य नं देता समाज हित जपत लोकांभिमुख कामाना प्राधान्य द्यावे अशी वसईकरांची इच्छा आहें यांत ते किती यशस्वी होतात ते येणारा काळचं ठरवेल.

काय काय घडलं आतापर्यंत…पदोन्नती, बदल्या, अतिरिक्त कारभार आणि महसूल यंत्रणाचे गोंधळी वातावरण…. दोन महिने वसई महसूल वाऱ्यावर ??

तत्कालीन वसई तहसिलदार अविनाश कोष्टी यांची दि.७ नोव्हेंबर २०२५ रोजी सेवाजेष्ठता सूची -२०२५ च्या शासन आदेशानुसार आधी उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली होती व चार दिवसांनी दि.११ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या बदलीचा आदेश आला. कोष्टी यांच्या बदलीनंतर ते मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात संजय गांधी योजना विभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले कीं नाही ते माहित नाही. परंतु वसई तहसीलदार पद रिक्त झाल्यावर येथील पदभार सुरुवातीला नायब तहसीलदार राजाराम देवकाते यांच्याकडे सोपावला होता.

मात्र नागरिकांच्या तक्रारी व अप्पर तहसीलदार कार्यरत असताना नायब तहसीलदार यांना पदभार दिल्याच्या कारणाची चूक अवघ्या पाच दिवसांतच लक्षात आल्यावर पालघर जिल्हा प्रशासनाला खडबडुन जाग आली आणि अखेर देवकाते यांच्याकडील तात्पुरता पदभार काढून तो दि.२० नोव्हेंबर पासून वसई महसूल विभागातील अप्पर तहसीलदार (बिनशेती ) विनोद धोत्रे यांच्याकडे सोपवण्यात आला आणि अखेर आज दिनांक रोजी दोन महिने पूर्ण झाले असून धोत्रे यांच्याकडून गायकवाड हे पदभार स्विकारातील..

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!