२२ जानेवारी ठरला महापौर पद आरक्षण सोडतचा मुहूर्त ! २९ मनपांच्या सत्तेचा सुटणार पेच

यावेळी आरक्षण सोडत प्रक्रियेत बदल होणार कां ? तर…जुनीच पद्धत अवलंबणार ??

खरं तर राज्यातील महानगरपालिका निवडणूकीं पूर्वीच महापौर पदासाठी आरक्षण सोडत काढून महापौर पदासाठीचं प्रत्येक शहराचं आरक्षण जाहीर होणं आवश्यक होतं, परंतु तसं झालं नाही. त्यामुळे मंत्रालय स्तरावरून होणारी हीं प्रक्रिया आता निवडणूकीच्या निकालांनंतर होत आहे. अर्थात आरक्षणाची सोडत हीं चक्राकार पद्धतीने केली जाते,

मात्र यावेळी हीं पद्धत बदलली जाऊ शकते, सध्या एस सी, एसटी, महिला आणि ओबीसी या घटकांना रोटेशन पद्धतीने आरक्षण दिलं जातंय.किंबहुना या संदर्भात खरंच काही बदल होणार आहेत कीं नाही, याची अधिकृत स्पष्टता नाही.. तरी वाट पाहू या…. आदेशाची..

वसई विरार महापालिकेसहित भाजपा- बविआ पक्षाचे लक्षलागून राहिले असून महापौर कोण होणार यासाठी इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत..

 

मुंबई /वसई :- आशिष राणे

राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाबाबतची प्रतीक्षा अखेर संपली असून राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष ‘शहराचा प्रथम नागरिक’ अर्थात महापौर पदाकडे लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याची चर्चा होती. दरम्यान नगरविकास विभागाने सोमवारी अधिकृत पत्र काढून महापौर पदाच्या आरक्षणाची सोडतच आता जाहीर केली आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आता दि.२२ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील मंत्रालयात पार पडणार आहे.

मंत्रालयात रंगणार आरक्षणाची सोडत

मिळालेल्या माहितीनुसार, नगरविकास विभागाने यासंदर्भात अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. ही सोडत गुरुवारी दि. २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मंत्रालय, मुंबई येथील ६ व्या मजल्यावरील ‘परिषद सभागृहात’ आयोजित करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या प्रक्रियेचे अध्यक्षपद माननीय राज्यमंत्री (नगर विकास) भूषवणार आहेत.

Adv
वसई विरार महापलिकेचे प्रथम नागरिक म्हणून महापौर पदाचे आरक्षण काय निघणार ? याकडे लक्ष

राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांचे भवितव्य या सोडतीवर अवलंबून असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्याच्या काळातच ही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याने राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.

त्यातच वसई विरार मध्ये बहुजन विकास आघाडीकडे एक हाती सत्ता बहुमत मिळून देखील भाजपा आपला महापौर कसा बसेल या प्रयत्नात आहें, तरी देखील वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण काय निघणार आणि त्यानंतर बविआ आणि भाजपा सहित महायुतीतील रस्सीखेच कशी थांबणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

इच्छुकांच्या आशा पल्लवित…

गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणा अभावी इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था होती. मात्र, आता २२ जानेवारीची तारीख निश्चित झाल्यामुळे इच्छुकांनी आपापल्या परीने महापौर, उप महापौर,गट नेते आणि विरोधी पक्ष नेते सोबत स्वीकृत नगरसेवक आदी पदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

  1. Adv

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!