मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी घरात आजी- आजोबा पाहिजेत — प्राचार्य डॉ.किरण सावे 

या समाजाने खऱ्या अर्थाने सहकार जपला आहे…
मा. आम. हितेंद्र ठाकूर…✅
इकडे मंडळ काढणे सोपे असते परंतु ते इतकी वर्षे तें मंडळ कार्यरत ठेवणे हे मोठे काम आहे तर या किरवली गावाचा इतिहास मोठा आहे. या गावातून छोट्या फंडा मधून आज जिल्ह्यातील सर्वात मोठी वसई विकास सहकारी बँक उभी राहिली आहे.
या समाजाने खऱ्या अर्थाने सहकार जपल्यामुळे अशा मंडळाच्या माध्यमातून सुरु असलेल्या लोकचळवळी आणि मंडळे अशीच अविरत सुरु राहिली पाहिजेत… 
वसई :- आशिष राणे
आजच्या मुलांना शिक्षण देताना इंग्लिश मिडीयम मध्ये घातल्याने त्यांना त्यांची मातृभाषा शुद्ध येत नाही.
तर दुसऱ्या बाजूला एकत्रित कुटुंब पद्धती हीं सुद्धा जवळपास नामशेष होत असल्याने मुलांवर संस्कार करणारे त्यांचे आजी आजोबा मात्र कुठे तरी लांब असतात.
आपल्या मुलांना जागतिक भाषेचे ज्ञान द्या, पण घरात मात्र मातृभाषेतच बोला  त्यामुळे आपली मातृभाषा टिकून राहील.
आज भारत हा असा एकमेव देश आहे जिथे परदेशी भाषेतून शिक्षण दिले जात आहे.
Adv ✅
आपल्या मुलांनी चांगली स्वप्ने बघावीत आणि आपल्या जिद्दीने ती पूर्ण देखील करावीत अर्थात आपल्या मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी घरात आजी आजोबा पाहिजेत असे प्रतिपादन पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण सावे यांनी रविवारी वसईतील किरवली गावात आयोजित केलेल्या बाळ समाजोन्नती मंडळाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात केले. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमवंशी क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष नरेश राऊत होते.
Adv✅
दरम्यान बाळ समाजोन्नती मंडळाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी संपूर्ण गावातील नागरिकांनी पारंपरिक वेशात शोभायात्रा काढली होती.
दुसऱ्या सत्राच्या कार्यक्रमासाठी वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर, वसई विरारचे माजी महापौर राजीव पाटील, सो.क्ष.महामंडळ वसईचे अध्यक्ष नरेंद्र राऊत, वसई विकास बँकेचे चेअरमन आशय राऊत, माजी अध्यक्ष जगदीश राऊत,समाज मंदिर ट्रस्ट चे नितीन म्हात्रे, बाळ समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुभाष चौधरी, आणि महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल (आप्पा) वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वीरेंद्र पाटील यांनी केले तर प्रास्ताविक नंदकुमार राऊत यांनी केले.
Adv✅
विशेष म्हणजे या कार्यक्रमात गावातील कबड्डीपट्टू आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गौतमी राहुल,आणि इतर मान्यवरांचा मंडळाच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला.
सोम. क्षत्रिय (किरवली) गावातील या समाजाने खऱ्या अर्थाने सहकार जपला आहे…
मा.आम. हितेंद्र ठाकूर…
या कर्यक्रमा विषयी बोलताना माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी महानगरपालिका निवडणुकीत या गावाने बहुजन विकास आघाडीला भरभरून मतदान केल्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि मंडळाचे हीं कौतुक केले.
Adv✅
तर आता यापुढे वसई तालुका कला क्रीडा महोत्सवालाही भरघोस निधी दिला जाईल—माजी महापौर प्रवीण शेट्टी
आता महानगरपालिका हद्दीत गेल्यावर्षी बंद केलेली महापौर मॅरॅथॉन , साहित्य जल्लोष ,दिवाळी पहाट ,यासारखे कार्यक्रम पुन्हा नव्या जोमाने सुरु होतील  तसेच वसई तालुका कला क्रीडा महोत्सवालाही भरघोस निधी दिला जाईल असे आश्वासन माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी दिले. त्याचप्रमाणे त्यांनी त्याठिकाणची १ करोड पर्यंतची कामे तातडीने केली जातील असे हीं शेवटी शेट्टी यांनी सांगितले.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!