मागून पाणी मिळते नं मागता दूध मिळते……
आपले प्रवीण अण्णा…झाले पालिका गटनेते..
वसई: – आशिष राणे, यांच्याकडून ✍️
“हीं तर योग्य माणसाची निवड” (This is the selection of the right person) हा विषय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित आहे,
“योग्य माणसाची निवड” म्हणजे केवळ एका पक्षाची किंवा व्यक्तीची निवड नसून, त्या व्यक्तीची कार्यक्षमता, प्रामाणिकपणा आणि विकासाची दृष्टी यावर आधारित असावी, जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खऱ्या अर्थाने सुशासन प्रस्थापित होईल. अर्थात माजी महापौर म्हणून धुरा सांभाळलेले वसई गावातील हितेश आप्पा चे अत्यंत विश्वासू शिलेदार प्रवीण अण्णा हे खूप शांत, सुस्वभावी, गालावर नेहमीच स्मित हास्य, कमी व मोजकंच बोलणं, अभ्यासू वृत्ती मात्र प्रसंगी आक्रमक होणं, मुळातच प्रशासनात व राजकीय पक्षात अशी फार मोजकी माणसं असतात आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रवीण अण्णा च्या रूपाने पालिका गट नेता म्हणून हीं जी त्यांची निवड केली आहें, हीं योग्यच आहें हिच प्रामाणिक कार्यकर्त्याला मिळालेली पोच पावती असल्याचं यां निवडीने अधोरेखित झाले आहें
विरार : -संदीप पंडित…. ✍️

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकी नंतर सर्वात जास्त जागा मिळवून एकहाती सत्ता मिळवत बहुजन विकास आघाडी पुन्हा तिसऱ्या वेळी दहा वर्षानंतर सत्तेवर आली आहे.

महापौरांचे आरक्षण उद्या गुरुवारी दि.२२ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होईल, तरीहीं मंगळवारी सायंकाळी बहुजन विकास आघाडी आणि त्यांच्या पक्षाच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांच्या महत्वाच्या बैठकीत माजी महापौर प्रवीण शेट्टी यांची निवड करण्यात आली.
बहुजन विकास आघाडीचे मित्र पक्ष मनसे आणि काँग्रेस च्या निवडून आलेल्या ७१ नगरसेवकांची मंगळवारी संध्याकाळी विरार येथील विवा महाविद्यालयात एक बैठक संपन्न झाली.या बैठकीला निवडून आलेले बहुजन विकास आघाडीचे सर्व नगरसेवक जातीने हजर होते.
त्यामुळे बहुजन विकास आघाडी फुटणार असल्याच्या आता यां अफवाच ठरल्या आहेत,

या बैठकीला बविआ चे सर्वेसर्वा माजी आम. हितेंद्र ठाकूर,क्षितिज ठाकूर, माजी महापौर प्रवीणाताई ठाकूर,,माजी महापौर तथा जेष्ठ नेते नारायण मानकर,माजी खासदार बळीराम जाधव,जितूभाई शहा,पंकज ठाकूर, माजी उपमहापौर सगीर भाई डांगे आदी नेते आवर्जून उपस्थित होते.
या बैठकीत माजी आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी गटनेतेपदी वसईतील प्रवीण शेट्टी यांची निवड करण्यात आल्याची पहिली घोषणा केली.

यां घोषणेने उपस्थितांनी आंनद व यां निर्णयाचे स्वागत करीत गटनेते प्रवीण शेट्टी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
![]()
