वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

भावपूर्ण शद्धाजंली : आणि उपमुख्यमंत्री अजित दादांच्या निधनाचे वृत्त ऐकून मी निशब्द झाले….

 

आणि मला माझे म्हणणे मांडायला पूरेसा अवधी मिळाला. नवीन सदस्यांना पाठबळ देणारे,आमचे मनोबल वाढवणारे आमचे अजित दादा….आज आपल्यात नाहीत….!

दादांच्या निधना नंतर वसईच्या आमदार स्नेहा ताई #मायमराठी7शी बोलताना व्यक्त झाल्या आणि त्यांनी त्यांच्याच भावुक शब्दातून दादांविषयी थोडं लिहीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहें

स्नेहा ताई दुबे -पंडित,
आमदार,वसई विधानसभा

वसई :- आशिष राणे…

एक धाडसी, अभ्यासू व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी दिवसरात्र धडपडणारा बहूआयामी असा नेता आज आपण गमावला आहे. कालच मंत्रालयात माझी वसईच्या विकासकामासंदर्भात त्यांच्याशी भेट झाली होती, आणि आज अत्यंत दु:खदायक अशी ही घटना घडली.

राज्याच्या विकासाचे व्हिजन कायम उराशी बाळगणाऱ्या नेत्याचे असे अकाली जाणे, फार क्लेशकारक आहे. त्यांची काम करण्याची पद्धत इतरांना मार्गदर्शक ठरणारी होती. मला त्यांचे वेळोवेळी अविस्मरणीय असे अनुभव आले.

रोजगार हमी योजनेवरील मजुरांची मंजुरी थकल्याची बाब मी आपल्या भाषणात सभागृहात मांडली असता दादा यांनी त्वरित मजुरांची 220 कोटीची रक्कम देण्याचे आदेश दिले.

 


गेल्या अर्थसंकल्पावरील भाषणासाठी मला कमी वेळ मिळाला होता, म्हणून मी मला अधिक वेळ मिळावा अशी मागणी करत होती.

त्यावेळी दादा यांनी मला मध्येच थांबवून सभापतींना सांगितले की ” तीला बोलू द्या, वेळ वाढवून द्या, ” आणि मला माझे म्हणणे मांडायला पूरेसा अवधी मिळाला. नवीन सदस्यांना पाठबळ देणारे,आमचे मनोबल वाढवणारे दादा आज आपल्यात नाही हा विचारच अस्वस्थ करणारा आहे. दादांचे असे जाणे हे राज्याचे कधीही न भरून येणारे नुकसान आहे.

स्नेहा ताई दुबे पंडित,
आमदार, वसई विधानसभा मतदारसंघ,

 

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!