आणि भाई शेठ 👊 डॅडी” च्या मैत्रीचे🌹 ऋणानुबंध… फुलले : भेटीचा फोटो व्हायरल

जेव्हा… भाई ठाकूर आणि (डॅडी ) अरुण गवळी…दोघे विरार मध्ये एकत्र भेटतात तेव्हा चर्चा तर झालीच पाहिजे…!
दुसरीकडे काळाच्या ओघात मुंबईतील गँगवार संपुष्टात आल्यानंतर, एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले वसई -विरारचे भाई ठाकूर व दगडी चाळीचे अरुण गवळी उर्फ डॅडी यांच्या अचानक झालेल्या विरार भेटीमुळे सर्वत्र चर्चा रंगू लागल्या आहेत.

वसई :- आशिष राणे

एकेकाळी सन १९८० ते १९९० तसेच १९९३ च्या मुंबईतील साखळी बोंबस्फ़ोट काळाच्या दोन्हीहीं दशकातील अंडरवर्ल्ड मधील दोन प्रमुख चेहरे व एकमेकांचे पक्के वैरी मानले जाणारे विरारचे जयेंद्र विष्णु ठाकूर उर्फ भाई ठाकूर आणि मुंबईतील दगडी चाळीचे सर्वेसर्वा अरुण गुलाब गवळी उर्फ डॅडी या दोघांची अलीकडेच भाई ठाकूर यांच्या विरार येथील निवासस्थानी गळाभेट झाल्याचे समोर आले आहे.,

मिळालेल्या माहितीनुसार,अलीकडेच सोमवारी विरार स्थित जयेंद्र उर्फ भाई ठाकूर यांच्या निवासस्थानी ही भेट झाली असून या भेटीवेळी भाई ठाकूर यांनी डॅडी” ना मित्र व या मैत्रीचे ऋणानुबंध म्हणून “श्रीगणेशा”ची एक सुबक मूर्ती भेट दिली,

त्याप्रसंगी कोणीतरी हा फोटो काढला आणि अखेर या भेटी संदर्भातला दोघांचा दिलखुलास फोटो रातोरात विविध समाज माध्यमातून प्रचंड व्हायरल झाला.

आणि डॅडी नी विरार येण्याचं वचन पाळलं…

या भेटीचे नेमकं प्रयोजन काय होतं हे मात्र जाणून घेताना डॅडी” च्या अगदी जवळ व दगडी चाळीत काही काळ वास्तव्यास असलेल्या एका निकटवर्तीयाने सांगितले की, डॅडी तब्बल १७ वर्षानंतर म्हणजेच गतवर्षी सप्टेंबर २०२५ मध्ये कारागृहातून बाहेर आपल्या घरी परतले,
मात्र दरम्यानच्या काळात डॅडी कारागृहात असताना त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई गवळी (८५) यांचे भायखळा येथे निधन झाले होते..
अर्थात त्यावेळेस काही दिवस बहुधा धार्मिक विधीसाठी पे्रॉल वर बाहेर आलेल्या डॅडीच्या सांत्वनासाठी भाई ठाकूर यांनी डॅडीची भायखळा येथील घरी भेट घेतली होती, त्यावेळेस भाई ठाकूर यांनी डॅडी ना विरार येथे येण्याचं निमंत्रण दिलं होतं,

परिणामी मागील सोमवारी डॅडी नी थेट विरार गाठून भाई ठाकूर यांच्या विरार निवासस्थानी ही सदिच्छा भेट घेत आपले वचन पूर्ण करत दोघांनी ही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

वसई विरारकरांना व मुंबईकरांना लागलीय उत्सुकता…

अर्थात या भेटीमुळे राजकीय आणि गुन्हेगारी जगतात विविध तर्क वितर्क लावले जात असले तरी या भेटीचे कारण कुठलेही असो परंतु नक्कीच या भेटीच्या पडद्यामागे व्यावसायिक कारण असू शकेल. तरी देखील त्यातून नेमकं काय साध्य होईल याची मात्र वसई विरारकरांना व मुंबईकरांना खूपच उत्सुकता लागुन राहिली आहे.

 

✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा !
Mymarathi7.com

 

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!