ब्रेकिंग :- पालघरचे खासदार डॉ हेमंत सावरा यांच्या गाडीला भीषण अपघात : घोडबंदर येथे डंपरची जोरदार धडक

 

खासदारांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक…!

विशेष म्हणजे आपण स्वतः खासदार असताना राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचे नियम न पाळणे केंद्र व राज्यांतील सत्ताधारी भाजपाच्या खासदाराला कसे जिवावर बेतू शकले असतें किंबहुना हा भीषण अपघात व त्यातून बचावण हे एक उदाहरण आहे. अर्थात खासदार डॉ हेमंत सावरा यांनी वाहतूक नियमाचे पालन आणि भान ठेवणं गरजेचे आहे

वसई :- आशिष राणे

भारतीय जनता पार्टीचे पालघर लोकसभा मतदार संघांचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांच्या इनोव्हा गाडीचा आज (1 मे ) सकाळी घोडबंदर रोडवर भीषण अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदारा डॉ सावरा यांची ची इनोव्हा गाडी मुंबईच्या दिशेने रॉंग साईडने जात असताना मुंबहुन गुजरातच्या दिशेने येणाऱ्या डंपरने डॉ. सावरा यांच्या गाडीला समोरून जोरदार धडक दिली.

दरम्यान या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून गाडीतील एअर बँगस उघडल्याने सुदैवाने खासदार डॉ.हेमंत सावरा व त्यांचे कुटूंबातील सदस्य हे बचावले आहेत, त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या गाडीच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा !

Mymarathi7.com

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!