एमएमआरडीए”च्या सुर्या योजनेच्या कवडसा पंपिंग स्टेशन आणि सुर्या नगर जलशुद्धीकरण केंद्रास होणारा विद्युत पुरवठा वादळी पाऊस वाऱ्यामुळं खंडित….

 

दुरुस्तीच्या कामात येतं आहेत अडथळे : तरीही युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम चालू….(संग्रहित फोटो)

वसई :- आशिष राणे
एमएमआरडीए”च्या सुर्या योजनेच्या कवडसा पंपिंग स्टेशन आणि सुर्या नगर जलशुद्धीकरण केंद्रास होणारा विद्युत पुरवठा मागील दोन दिवस झाले सुरु असलेला वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळं पूर्णतः खंडित झाल्याचे महावितरण कं. मार्फत वसई विरार शहर पाणीपुरवठा विभागाने रविवारी रात्री उशिरा स्पष्ट केलं आहे.

दरम्यान पालघर जंगलपट्टी भागात वादळी पाऊस वाऱ्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येतं असून तरीही पाणीपुरवठा सुरळीत चालू होण्यासाठी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम चालू करण्यात आले असले तरी रविवार दि 26 ऑक्टोबर 2025 रोजी दु.4 वाजता हा विद्युत पुरवठा खंडित झाला.

त्याचा परिणाम मात्र वसई विरार शहर महापालिका विभागातील अंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या विभागास झाला असून भारतीय हवामान खात्यानं इशारा दिल्यानुसार पुढील दि.30 ऑक्टोबर पर्यंत संबंध पालघर जिल्ह्यात पिवळा अलर्ट दिला आहे.

तर याचा सर्वाधिक परिणाम पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच योजनावर होतं असून वारंवार कोसळत असलेल्या धुव्वादार वादळी वारा आणि पावसामुळे दुरुस्तीच्या कामात मोठे अडथळे येत असल्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास विलंब लागत आहे.

जुन्या वं नवीन योजनेतून पाणीपुरवठा सुरु : तरीही पाणी जपून वापरा..?
वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या सुर्या धरणाच्या जुन्या आणि नवीन योजनेतून तसेच एमएमआरडीए” च्या सुर्या धरणाच्या योजनेतून शहरात सर्वत्र पाणी पुरवठा होत असतो.
पाणीपुरवठा विभागाने माहिती दिल्यानुसार रविवारी 4 वाजता एमएमआरडी”ए च्या सुर्या योजनेच्या कवडसा पंपिंग स्टेशन आणि सुर्या नगर जलशुद्धीकरण केंद्रास होणारा महावितरण कं.चा विद्युत पुरवठा वारा वादळ आणि पाऊस असल्याने खंडित झाल्याचे सांगितलं तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम चालू असून वारा वादळ आणि पाऊस असल्याने दुरुस्ती च्या कामात अडथळे येत असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागत आहे.त्यामुळे रविवारी दुपारी 4. 00 वाजल्या पासून एमएमआरडीए मार्फत शहरात होणारा पाणी पुरवठा पूर्ण पणे बंद आहे.

पाणीपुरवठा विभागाने केलं आवाहन..

दुसरीकडे महापालिकेच्या जुन्या आणि नवीन योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत चालु असला तरी एमएमआरडीए” च्या सुर्या योजनेचा पाणी पुरवठा बंद असल्याने शहरात होणारा पाणी पुरवठा अनियमित आणि कमी प्रमाणात होत आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन वजा याची नोंद घेण्याची विनंती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केली आहे.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!