वसईच्या २४ वर्षीय सत्यम दुबेच्या अवयवदानाने ५ जणांना मिळाले नवजीवन..!
“सर्वांना कायम मदत करणारा आमचा मुलगा गेला पण जातांनाही कोणाचे तरी जीव वाचवावे”अशी आर्त सामाजिक भावना अंगी ठेवत दुःखावर मात करत पालकांची तब्बल चार दिवस अवयवदानासाठी प्रतीक्षा….

वसई :- आशिष राणे ( खास बातमीवृत)
मुंबई वं अन्य राज्याच्या पाठोपाठ आता पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील नालासोपारा ते दक्षिण मुंबई असं ‘ग्रीन कॉरिडॉर’ची अभूतपूर्व पहिलीचं अशी अंमलबजावणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानं ५ जणांना जगण्याची उमेद म्हणून नवसंजीवनी मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,रस्ते अपघातात ‘मेंदूमृत’ (Brain Dead) झालेल्या वसई, दिवाणमान येथील सत्यम संतोष दुबे (२४) या तरुणाचे अवयवदान करून त्याच्या कुटुंबियांनी समाजाला मानवतेचा महान आदर्श घालून दिला आहे. दुबे कुटुंबियांच्या या धाडसी निर्णयामुळे गरजू रुग्णांना सत्यमच्या दोन्ही किडन्या, यकृत आणि दोन डोळे असे ५ अवयव एकाचवेळी दान करता आले, ज्यामुळे पाच लोकांना नवजीवन मिळाले.
सत्यमचा भर दिवाळीत वापी येथे मोटारसायकल अपघात झाला असता त्याला तातडीने वसई स्टेला येथील श्रीसाई हॉस्पिटलमध्ये आणलं मात्र उपचारादरम्यान तो ‘मेंदू मृत’ झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
आणि “ग्रीन कॉरीडॉर” ची निर्मिती झाली….
(दि. २३ ऑक्टोबर रोजी दु १२.३० वाजता नालासोपारा स्थित रिद्धी विनायक रुग्णालयातून दक्षिण मुंबई च्या दिशेने अवयवदानासाठी निघालेली रुग्णवाहीका, संबंधित वाहतूक पोलीस वं अन्य पोलीस वाहनाचे पथक, वैद्यकीय पथक, अग्निशमन पथक, “ग्रीन कॉरीडॉर ला फॉलो करत निघालं आणि अवघ्या ४५ ते ५० मिनिटात हे लक्ष पूर्ण केलं) पहा… हा व्हिडीओ…
पालकांचा अलौकिक धीराला सलाम…..!
या हृदयद्रावक परिस्थितीत, सत्यमच्या आई-वडिलांनी अलौकिक असा मनाचां खंबीरपणा दाखवला.त्यांच्या मते “सर्वांना कायम मदत करणारा आमचा सत्यम मुलगा हे जग सोडून जातांनाही त्याच्या मार्फत कोणाचे तरी जीव वाचवावे, हीच आमची भावना आहे,” असे म्हणत त्यांनी दुःखावर मात केली आणि सलग चार दिवस अवयव दानाचा आग्रह लावून धरला. दुबे कुटुंबीयांनी पूर्ण सहकार्याने ही दान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तयारी दाखवली, त्यांचा हा धीर विशेष कौतुकास पात्र ठरला आहे.
रिद्धी विनायक हॉस्पिटल – संबंध पालघर जिल्हासाठी ठरतंय वरदान …!

घडलेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून, दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम (दादा ) पवार यांनी नेहमी सारखी सजगता दाखवत या प्रकरणात ही पुढाकार घेतला आणि त्यांनी सांगितले की,आमच्या विनंतीनुसार, अवयव दानाच्या शक्यतेसाठी त्यांनी सत्यमला नालासोपारा येथील रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित केलं आणि खऱ्याअर्थी ही मोहीम सुरु झाली,
अवयव दानासाठी रिद्धी विनायक हॉस्पिटल हे एकमेव केंद्र..
खास म्हणजे सध्या मीरा रोडपासून डहाणू आणि गुजरात सीमेपर्यंतच्या पट्ट्यात अवयव दान स्विकांरण्यासाठी नोंदणीकृत (Registered) असलेले रिद्धी विनायक हॉस्पिटल हे एकमेव केंद्र उपलब्ध आहे.
यामुळेच या भागातील नागरिकांसाठी अवयवदानाची एक मोठी सोय याठिकाणी उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळेच दि.२३ ऑक्टोबर २०२५ रोजी अवयव दान प्रक्रिया पूर्ण होऊन ती यशस्वी झाल्याचे पुरुषोत्तम पवार यांनी सांगितलं.
वसई- नालासोपाऱ्यातून मुंबईकडे ‘ग्रीन कॉरिडॉर’ची पहिलीच यशस्वी अंमलबजावणी :
या अवयव दानाचे वैशिष्ट्य म्हणजे, अवयव वेळेत गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी वसई तालूका व त्यातील नालासोपारा- वसई- घोडबंदर सारख्या भरगच्च रहदारीच्या शहरातून मुंबईकडे प्रथमच ‘ग्रीन कॉरिडॉर’ची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली.
हे कार्य फार जिकरीच व आव्हानत्मक होतं, अर्थात मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत समस्त पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा, वं खास करून मुंबई पोलीस आदी यंत्रणाच्या सुयोग्य समन्वयामुळेचं हे शक्य झाले.
संस्था, पोलीस आणि डॉक्टर वं अन्य व्यक्तीच्या टीमवर्कचं उत्तम नियोजन : ग्रीन कॉरिडॉर

यशस्वी अवयवदानासाठी अनेक व्यक्ती व संस्थांचा सुयोग्य समन्वय आवश्यक होता. या प्रक्रियेत डॉ. वेंकट गोयल, डॉ. प्रणय ओझा, डॉ. सत्यप्रकाश यादव, डॉ. विठ्ठल निकम, ZTCC च्या उर्मिला महाजन तसेच नालासोपारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल वळवी, सहा. पोलीस निरीक्षक विनोद जाधव, उप-निरीक्षक रंगनाथ गीते,पोलीस हवालदार तुकाराम दराडे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचे तसेच विरार-सोपारा वाहतूक शाखेचे मोठे योगदान याप्रसंगी लाभले. तसेच, रिद्धी विनायक हॉस्पिटलचे ऑर्गन डोनेशन कॉर्डिनेटर सागर वाघ आणि त्यांच्या टीमने ही अथक परिश्रम घेतले.
रिद्धी विनायक हॉस्पिटलमधील हे दुसरे यशस्वी अवयव दान ठरले असून, वसईच्या सत्यम दुबेच्या रूपाने पुन्हा एकदा पाच गरजू रुग्णांना जगण्याची नवी आशा मिळाली आहे. ‘मरावे परी अवयव रूपी उरावे’ या उक्तीला सत्यमच्या कुटुंबियांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सार्थ ठरवले आहे.

सत्यमचां मेंदू मृत झाल्याचे समजलं आणि तेव्हा पासून पुढील तीन दिवस कुटूंबातील सदस्यांसोबत वार्तालाप करून ती अवयवदानसाठीची प्रक्रिया सुरु झाली,त्यात कुटुंबीयांना योग्य माहिती देणं, त्यांच्याकडून प्रशासकीय बाबी व आमच्या अन्य सरकारी यंत्रणा वं कागदोपत्री प्रक्रिया फार कमी वेळेतच पूर्ण करून घेणं ही खूप क्लिष्ठ प्रक्रिया असतें,मात्र आम्ही ती सचोटीनं वं तत्परतेने पूर्ण केली वं हे अवयवदान मिशन यशस्वी केलं याचं आम्हाला खूप समाधान आहे.”
सागर वाघ
रिद्धी विनायक हॉस्पिटल, नालासोपारा
ऑर्गन डोनेशन कॉर्डिनेटर
ग्रीन कॉरीडॉर म्हणजे काय रे भाऊ……✅

ग्रीन कॉरिडॉर ही एक विशेष वाहतूक व्यवस्था आहे जी रुग्णालयातून अवयव काढल्या जाणाऱ्या ठिकाणापासून ते प्रत्यारोपण करण्याच्या ठिकाणापर्यंत अवयव पोहोचवण्यासाठी तयार केली जाते. या मार्गावर, वाहतूक सिग्नल आपत्कालीन वाहनांसाठी (उदा. रुग्णवाहिका) हिरवे केले जातात, जेणेकरून अवयव कमीत कमी वेळेत सुरक्षितपणे पोहोचवता येईल. हा मार्ग विशेषतः अवयव प्रत्यारोपण आणि गंभीर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींसाठी वापरला जातो.
ग्रीन कॉरिडॉरची वैशिष्ट्ये :

वाहतूक व्यवस्थापन : यात एका मार्गावरील सर्व रहदारी नियंत्रित केली जाते, ज्यामुळे रुग्णवाहिका किंवा अवयव घेऊन जाणारे वाहन कोणत्याही अडथळ्याशिवाय वेगाने प्रवास करू शकते.
वेळेचे महत्त्व: अवयव प्रत्यारोपण वेळेवर होणे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे, ग्रीन कॉरिडॉरचा उद्देश वेळेची बचत करणे हा आहे.
व्यापक वापर : हा फक्त अवयव प्रत्यारोपणच नाही, तर इतर गंभीर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतही वापरला जाऊ शकतो.
मॅन्युअल नियंत्रण: या मार्गावरील वाहतूक सिग्नल मॅन्युअली नियंत्रित केले जातात, जेणेकरून अवयव घेऊन जाणाऱ्या वाहनाला मार्ग मिळेल.
नालासोपारा -वसई वं मुंबई पोलिसांचे विशेष आभार…🙏
पालघर ठाणे जिल्हातील मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त अंतर्गत सर्व पोलीस, वसई विरार मनपा रुग्णवाहिका, अग्निशमन पथक, महामार्ग पोलीस आणि खास करून मुंबई हद्दीतील वाहतूक विभाग आणि नालासोपारा येथील रिद्धी विनायक हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक यांचे मोठे यश या दोन्ही प्रसंगी दिसून आले.
मृत रुग्णाचे अवयवदान करून ते पुन्हा नवीन दात्याच्या जीवनदानासाठी देऊन ग्रीन कॉरीडॉर मार्फत राबविण्यात आलेली हि मोहीम यशस्वी केली त्यामुळे या सर्व यंत्रणानी पुन्हा एकदा एक नवीन अध्याय रचला आहे. या सर्व वीरांना mymarathi7.com आणि वसईकरांचा मानाचा मुजरा…!
![]()
