दुर्गकन्या, गढरागिणी आणि हिरकणी अशा तिनही उपाधी व 35 वर्षात 650 गडकिल्यांची भारत भर व महाराष्ट्र राज्यात भटकंती करणाऱ्या या दुर्गकन्येस शिवप्रेमिंचा मानाचा सलाम…. तर शिवरायांचा एकेरी उल्लेख टाळा आणि बोला जय भवानी जय शिवाजी असे ठणकावून सांगणाऱ्या या हिरकणीचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी व थक्क करणारा आहे…

वसई :- आशिष राणे
मनात असलं तर घरांघरात बसेल शिवराय हा दृष्टीकोन अंगी बाळगा किंबहुना गडकोट किल्ले सर्वधन व उभारणी पुढच्या पिढीला घडवायचं असेल तर केवळ महाराज्यांचे विचार मनात नव्हे तर ते प्रत्यक्ष आपल्या आचरणात आणले पाहिजेत असे परखड विचार दुर्गकन्या हमीदा खान यांनी वसईत काढले.
(वसई तालुका पत्रकार संघाचे प्रास्ताविक सादर करताना सचिव आशिष राणे)
त्या श्री.सिध्दनाथ सामाजिक व शैक्षणिक संस्था (रजि) प्रायोजित, आणि वसई तालुका पत्रकार संघ (रजि) आयोजित किल्ले उभारणी व देखावा आणि ऑनलाईन रांगोळी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होत्या.

बुधवारी दिपावली पाडव्याच्या संध्येला संपन्न झालेल्या या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून दुर्गकन्या हमीदा खान यांच्या समवेत मान्यवरामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण म्हापळकर,शिवेसेना (उबाठा) गटाच्या माजी नगरसेविका किरण चेंदवणकर, श्री.सिध्दनाथ सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राजेश्री बाबर ,खजिनदार राजाराम बाबर, माजी विरोधी पक्ष नेते विनायकदादा निकम,शिवसेनेचे पालघर जिल्हा लोकसभा संघटक विवेक पाटील, विजय काशिलकर, सुनील मुळ्ये, वसई तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित, स्वराज्य संघटना अध्यक्ष मंगेश म्हस्के, आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसई तालुका पत्रकार संघाचे सचिव आशिष राणे यांनी प्रास्ताविक केले तर सिद्धनाथ संस्थेचे खजिनदार राजाराम बाबर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
(श्री सिद्धनाथ सामाजिक संस्थेचे खजिनदार राजाराम बाबर मनोगत व्यक्त करताना)
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दुर्गकन्या हमिदा खान यांनी सांगितले कि ,मी गेली 35 वर्षे झाली दुर्ग,गड किल्ले विविध शिवकालीन संग्रह यांची भटकंती करत आहे सुरुवातीला काही समजलं नाही मात्र हळूहळू माझं मन शिवराय व त्यांच्या 425 वर्ष पासून उभे असलेल्या किल्याकडे वळत गेलं, केवळ भारत नव्हे तर संपूर्ण जगात ज्याच्या पराक्रमाची,शौर्याची यशोगाथा गायली जाते,
महाराजांची दूरदृष्टी आणि त्यांच्या कार्याची जाण ठेवण्यासाठी आपण सामाजिक बांधिलकी जोपासून दरवर्षी दिवाळी ला एका तरी किल्यावर दिवा, पणती लावा व किल्ले प्रकाशित करा,हिच खऱ्याअर्थी दिवाळी आहे असे ही खान म्हणाल्या,
(स्वराज्य फाउंडेशन चे मंगेश म्हस्के सूत्रसंचालन व आभार व्यक्त करताना..)
वसई तालुका पत्रकार संघ व सिद्धनाथ सामाजिक संस्थेसोबत आहे हे आनंदादायी आहे तर अशा गडकिल्ले सर्वधन उभारणी व आताच्या पिढीला प्रोत्साहनासाठी वसई तालूका पत्रकार संघ व त्यांचे पदाधिकारी सामाजिक संस्था सोबत आहेत हे खूपच प्रेरणादायी आहे अर्थात आयोजकांनी व सहभागी संस्था विद्यार्थी तरुण तरुणी किंवा बच्चे कंपनीनी कृपया या गड किल्ले उभरणी सर्वधन,देखावे यांना स्पर्धा म्हणून त्यांच्याकडे ना पाहता आपण सहभागी जरूर व्हा,मात्र अशा उपक्रमामध्ये सहभागी होताना प्रत्यक्ष इतिहास डोळ्यासमोर ठेवा आणि तो इतिहास जगायला शिका असे ही आवर्जून सांगितले, दुसरीकडे महाराजा विषयी घोषणा देताना प्रामुख्याने एकेरी उल्लेख टाळा.. आणि जय भवानी जय शिवाजी असे बोलण्याची शिवप्रेमीना शेवटी भावनिक साद ही घातली
तसेच या कार्यक्रमा अंतर्गत मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते रांगोळी, गडकिल्ले उभारणी साठी सहभागी व पारितोषिक घोषित झालेल्या सर्व उपस्थित स्पर्धकांना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व रोख रक्कम म्हणून बक्षीस वाटप करण्यात आले,
या कार्यकमाला वसई तालुका पत्रकार संघांचे पदाधिकारी व सदस्यांची ही विशेष उपस्थिती लाभली यामध्ये सर्वश्री संघाचे उपाध्यक्ष भरत म्हात्रे,कार्यालय प्रमुख नितांत राऊत, कार्यकारी सदस्य शिवकुमार शुक्ला, विवेक पाटकर, राजु सोनी, कीर्तन उपाध्याय आदी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार प्रा. मंगेश मस्के यांनी केले.
================================
ऑनलाईन रांगोळी स्पर्धा विजेते
प्रथम : तेजस्वी वरठे
द्वितीय: विदुला चुरी
तृतीय: सिद्धी घरत
=================================
गड किल्ले उभारणी स्पर्धा
प्रथम : शिवबा युवा मित्र मंडळ, नालासोपारा
द्वितीय: लडसिक लखमोजी देव क्रिकेट क्लब दरपाळे
तृतीय:सिंहगड :- तरे परिवार पारिजात अपार्टमेंट, प्रहार ऑफिसच्या बाजूला, विरार पूर्व
उत्तेजनार्थ :
१)दुर्गप्रेमी ग्रुप, साई अभ्युदय कॉम्प्लेक्स, नालासोपारा वेस्ट
२)खराळे गाव
३)श्री अपार्टमेंट, विरार
४)भंडारी समाज पापडी गाव
![]()
