वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

वसईत सोमवारी भाजपाच्या वतीने शासकीय दाखले शिबिराचे आयोजन

 

“वसईतील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन शासकीय दाखले मिळवण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे “

वसई :- 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने दि ९ जून २०२५, सोमवार रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत वसई पश्चिम येथील ग्रीन पार्क बिल्डिंग, भाजपा कार्यालया जवळ, शास्त्रीनगर येथे एक दिवसीय विविध शासकीय दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात सिनियर सिटीजन दाखला, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल दाखला तसेच रहिवास दाखला यांसाठी अर्ज करता येणार असून इच्छुक नागरिकांनी आपली नोंदणी आधी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या शिबिराचे समन्वयक उत्तम कुमार , महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ठ असून श्री शिवप्रहार प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सिध्देश तावडे यांच्या विशेष पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

वसईतील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन शासकीय दाखले मिळवण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!