“आता मराठी शाळा वाचवण्यासाठी व विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी जूचंद्र स्थित गावकऱ्यानी उभारलीय लोकंचळवळ “
वसई :-
मराठी शाळांची त्यातल्या त्यात जिल्हापरिषदेच्या शाळांची स्थिती फार गंभीर आहे. त्या शाळेची अवस्था हि बरोबर नसते त्याच प्रमाणे आता सर्वसामान्य लोक आपल्या पाल्याना हायटेक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवत असल्याने जिल्हापरिषदेच्या शाळांची पटसंख्याही रोडावत असताना वसई तालुक्यातील जूचंद्र गावातील गावकऱ्यांनी शाळा सुधार समितीच्या माध्यमातून शाळा हायटेक केली असून शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी ते पुढे सरसावले आहेत यातून गावातील लोकांनी मराठी शाळा वाचविण्यासाठी एक जणू चळवळच उभारली असल्याची प्रचिती येते आहे.
सध्या सर्वत्र शाळांची प्रवेश प्रक्रिया जोरात सुरू आहेत त्यात जुचंद्र जिल्हा परिषद शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा व शाळेची विद्यार्थींसंख्या वाढावी यासाठी आता ग्रामस्थांनी देखील पुढाकार घेतला आहे हे विशेष आहे.

शाळेत प्रवेश घ्या ; अगदी सर्व समावेशक अत्याधुनिक सोई-सुविधांचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार !
त्यासाठी त्यांनी सोशल मिडीया व बॅनरव्दारे जाहिरात करून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. जुचंद्र जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास सर्व समावेशक शिक्षणपद्धतीसह मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत मध्यान्ह भोजन योजना, अँड्रॉइड टीव्हीव्दारे डिजीटल क्लासरूम, कम्प्युटर लॅब, प्ले रूम, सिसीटिव्ही कॅमेरा सुरक्षा, इन्वरर्टर सुविधा, नविन पंखे, वॉटर फिल्टर, परसबाग (गार्डन) व शाळा आवारात पेव्हर ब्लॉक इत्यादी अत्याधुनिक सोई-सुविधांचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे.अशा प्रकारच्या सर्व सुविधा देणारी जुचंद्र जिल्हा परिषद शाळा वसई तालुक्यातच नव्हे तर पालघर जिल्ह्यात सरस ठरली आहे.
तब्बल ११४ वर्षांचा आहे इतिहास ; शाळेचे नूतनीकरण व आधुनिकीकरण !
तब्बल ११४ वर्षांचा इतिहास असलेल्या जुचंद्र जिल्हा परिषद मराठी शाळेची इमारत (अंदाजे ८५ वर्षे) जुनी झाल्याने दुरूस्तीची गरज लक्षात घेता लोकवर्गणीतून शाळेचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात आलेले आहे. पुढील २० ते २५ वर्षांचे नियोजन करून शाळा नूतनीकरणामध्ये वर्ग खोल्यांची उंची वाढवून नविन पत्र्यांची छत, वर्ग खोल्या दुरूस्ती/टाईल्स व रंगरंगोटी, नविन पोषण आहार किचन, टॉयलेट-बाथरूम दुरूस्ती/टाईल्स व रंगरंगोटी, कंपाऊंड दुरूस्ती, नविन बँचेस, सी.सी.टि.व्ही. सुरक्षा, अँड्रॉइड टीव्हीव्दारे डिजीटल क्लासरुम, नविन इलेक्ट्रिक फिटींग, इन्वरर्टर सुविधा, नविन पंखे, वॉटर फिल्टर, परसबाग (गार्डन) व शाळेसमोरील आवारात पेवर ब्लॉक बसवून शाळा सुविधासंपन्न व सुंदर बनविण्यात आलेली आहे. फक्त शाळाच नव्हे तर शाळेलगत असलेल्या दोन्ही बालवाड्यांचेही सर्व सुविधांनी सुशोभीकरण करण्यात आलेले आहे.
त्यामुळे जुचंद्र जिल्हा परिषद शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे सोशल मिडीया व बॅनरच्या माध्यमातून जाहिर आवाहन करण्यात आले आहे. तसेच गावात व बाहेर देखील जनजागृती करण्याचे काम आता गावकरी आणि शाळा सुधार समितीने हाती घेतले असून यातून दोन गोष्टी साधल्या जाणार आहेत एक म्हणजे मराठी शाळा टिकली जाईल आणि दुसरे म्हणजे मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना हायटेक शिक्षण मिळेल असे मत शाळा सुधार समितीचे सल्लागार जितेंद्र भोईर यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
![]()
