वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

रानभाजीची राणी “शेवळी” वसई – विरारच्या बाजारात ग्रामीण भागातील सामान्य आदिवासी बंधु भगिनींकडून रानभाज्या घेण्यासाठी आवाहन

अवकाळी पावसाची किमया  जरी झाली असली तरी जून मासाचा पाऊस सुरू होण्यापूर्वीच बाजारात रानभाज्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून साऱ्या पालघर जिल्हावासीयांची तथा मुंबई आणि आसपासच्या रहिवाश्यांची अगदी आवडती असलेलीं शेवळाची आमटी हि खवव्यांची आवडती भाजी कायम जिभेवर राहिली आहे”.(संग्रहित छायाचित्र )

वसई :- आशिष राणे

वैद्यकीय सल्ल्यानुसार पालेभाज्या खाव्यात मात्र रानभाज्या ही खा अर्थात त्यात प्रामुख्याने शेवळी ही फारच बहुगुणी व औषधी आहेत, त्यामध्ये लोह आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे ती आरोग्यासाठी खूप फायद्याची जरी असली तरी पालघर जिल्ह्यातील जंगलपट्टी भागातील रानभाजीची राणी म्हणजे शेवळी हि तर सर्वश्रुत आहे,
यापूर्वी पावसाच्या पहिल्याच सरित हि शेवळे बाजारात दाखल व्हायची मात्र यंदा एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पावसामुळे रानभाज्या तेजीत आल्या त्यातच प्रत्यक्षात जून मासाचा खरा पाऊस सुरु होण्यापूर्वीच वसई विरारच्या बाजारात रानभाज्या मधील एक प्रकार हा डेरे दाखल होऊ लागल्याने शेवळी ची जुडी घेण्याकरिता नागरिकांची उडी पडली आहे,

(संग्रहित छायाचित्र)

त्यामुळे ह्या शेवळी रानभाजीला इतर भाज्यांच्या तुलनेत चांगलाच भाव मिळत असल्याने जंगलाचे राजे आदिवासी बांधव मात्र बऱ्यापैकी खुशीत असून प्रत्यक्षात ७ जून नंतर मान्सून सुरु झाल्यावरच या रानभाजीला अधिक प्रतिसाद मिळेल असे हि शेवळी विक्रेते शिणवार काका यांनी सांगितले

साऱ्या पालघर जिल्हा वासीयांची तथा मुंबई आणि आसपासच्या रहिवाश्यांची अगदी आवडती असलेलीं शेवळ्याची आमटी हि तर खवव्यांची आवडती भाजी कायम राहिली आहे,

डहाणू,पालघर ,सफाळे ,विरार येथील शिरसाड ,वसईतील,कामण,तुंगारेश्वर ,चिंचोटी ,नागला या जंगल पट्टी भागातील गावांच्या डोंगर पठारावर हि शेवळे निर्मिती होतात आणि त्यांना शहराकडे आणून वसई विरारच्या बाजारात या रानभाजींची विक्री केली जाते,

एकंदरीतच अजून पावसाला खरी सुरुवात झाली नसल्याने शेवळे ,आणि इतर रानभाज्याचे उत्पादन कमी आहे ,त्यामुळे पाच शेवळे असलेल्या जुडीला पंधरा, वीस ते पंचवीस व नंतर चाळीस हुन अधिक रुपयांचा दर मिळत असून वाढत्या महागाई मध्ये व अवकाळीने केलेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बंधू भगिनींना ,आंबे,जांभू,करवंद विक्री बरोबर हा एक जोड धंदा मिळाला आहे, किंबहुना ग्रामीण भागातील सामान्य आदिवासी बंधु भगिनींकडून वसईतील नागरिकांनी सर्वच प्रकारच्या रानभाज्या खरेदी करून घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे की,

जेणेकरून केवळ पावसाळ्यातच या भाज्या बाजारात येतात व दूरवर जंगलपट्टी भागातुन शहरात येऊन हे बांधव याठिकाणी त्या भाज्यांची विक्री करतात जेणेकरून त्यांना उत्तम रोजगार उपलब्ध होईल

 

शेवळे हि मांसाहारी व शाकाहारी सुद्धा ! 
खास करून शेवळी हि खाजरी रानभाजी असून तिची आमटी करताना तिची खाज घशाला खवखव करू नये यासाठी ह्या भाजी बरोबर आवळ्याची हि विक्री जोरात आहे,ह्या आवळ्याचा रस शेवळ्याच्या आमटीत मिसळतात,त्यामुळे ह्या रानभाजीस खाजरेपणा कमी होण्यास मदत मिळते,
तर हि शेवळे वालाच्या भाजीत तर मासाहारी म्हणून कोळंबी आणि जवळा या मच्छीच्या भाजीत मिश्रित करून अनेक जण खवय्ये हे अगदी जेवायला तुटून पडतात असे ही चित्र सर्वत्र दरवर्षी बघायला मिळत आहे,

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!