वैद्यकीय क्षेत्रात मोठी गरुड झेप : रिद्धी विनायक हॉस्पिटलच्या नर्सिंग ट्रेनिंग इव्हेंटमध्ये परिचारिका व नर्सिंग विद्यार्थी युवकांचा जबरदस्त उत्साह..!

 

रिद्धी विनायक रुग्णालयाने घेतलेलं हे व्यापक प्रशिक्षण ही काळाची गरज ठरतंय…!

आरोग्य विभागात नर्सिंग (परिचारिका) ही आरोग्य यंत्रणेचा कणा मानली जाते तर डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून परिचारिका ही प्रत्यक्ष रुग्णसेवा, आजार प्रतिबंध, पुनर्वसन आणि आरोग्य शिक्षणाचे बहुमोल कार्य पार पाडतात त्याचसोबत परिचारिका केवळ रुग्णांवर उपचार करत नाहीत, तर त्या आरोग्य संवर्धन, रोग प्रतिबंध, आणि रुग्णाच्या संपूर्ण बरे होण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतातआणि म्हणूनच आज संपूर्ण विश्वात नर्सिंग (परिचारिका ) मग ती स्त्री असो कीं पुरुष यांना अन्यन साधारण महत्व आहे.

वसई -नालासोपारा: – आशिष राणे,

वसई तालुक्यातील नालासोपारा पश्चिम येथील प्रसिद्ध अशा रिद्धी विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिद्धी विनायक कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने “द बिगेस्ट नर्सिंग ट्रेनिंग प्रोग्राम” चे रविवारी (३१ मे ) रोजी नालासोपारा येथे भव्य आयोजन करण्यात आले होते, किंबहुना आरोग्य सेवेची गुणवत्ता अधिक उंचावण्याच्या उद्देशाने आयोजित केलेला हा महा-प्रशिक्षण शिबिर वैद्यकीय क्षेत्रातील आजवरचा सर्वात मोठा मंच मानला जात आहे.

१२०० हून अधिक परिचारिका आणि २९ नर्सिंग कॉलेजांचा ऐतिहासिक सहभाग :


या कार्यक्रमाची भव्यता यावरून लक्षात येते की, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे २९ नामांकित नर्सिंग कॉलेजांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ‘नर्सिंग केअर’ला नवीन आयाम देण्यासाठी आयोजित या सत्रात १२०० हून अधिक भावी आणि कार्यरत परिचारिकांनी प्रशिक्षण घेतले. या विशाल सहभागामुळे हा कार्यक्रम विभागातील सर्वात मोठा नर्सिंग परिषद ठरला.

Adv

“आरोग्य सेवांचा कणा परिचारिकाच असतात आणि त्यांचा कौशल्य विकास समाजासाठी अत्यंत लाभदायक आहे.”—- आम. राजन नाईक

या ऐतिहासिक कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नालासोपाराचे आमदार राजन नाईक आवर्जून उपस्थित होते. रिद्धी विनायक हॉस्पिटलच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करताना ते म्हणाले की, “आरोग्य सेवांचा कणा परिचारिकाच असतात आणि त्यांचा कौशल्य विकास समाजासाठी अत्यंत लाभदायक आहे.” असे प्रतिपादन यावेळी आम राजन नाईक यांनी केलं
याशिवाय, नालासोपारा मेडिकल असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष डॉ सचिन पाटील, कोषाध्यक्ष डॉ सचिन भिरुड यांच्यासह अनेक वरिष्ठ डॉक्टरांनी व पदाधिकाऱ्यांनीही या कार्यक्रमास विशेष उपस्थिती लावली होती,तसेच वैद्यकीय जगतातील अनेक नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे या प्रशिक्षण सत्राचे महत्त्व अधिकचं वाढताना दिसलं.

Adv

वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज संघटनांचे मिळाले भरभरून सहकार्य—

आरोग्य क्षेत्रातील या महाकुंभाला देश आणि राज्यातील अनेक नामांकित वैद्यकीय संघटनांचे भक्कम समर्थन लाभले आहे . तर या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात खालील निवडक संघटनांनी खांद्याला खांदा लावून सहकार्य केले:

OGSMB – ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी

✅AMC – मुंबई असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स

✅AFG – असोसिएशन ऑफ फेलो गायनॅकॉलॉजिस्ट्स

Adv

डॉक्टरांचे विशेष योगदान :-

रिद्धी विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. एस. एन. अग्रवाल, डॉ. वेंकट गोयल, डॉ. माधवी गोयल, डॉ. अदिती गोयल आणि डॉ. अनुपमा ओख, डॉ. हेमंत जोशी आदी यांच्यासह अनेक वरिष्ठ डॉक्टरांचे विशेष व उल्लेखनीय योगदान लाभले.

हॉस्पीटल व्यवस्थापनांकडून विशेष आभार :-
रिद्धी विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व्यवस्थापनाने सर्व सहकारी डॉक्टर संघटना, डॉक्टर्स, आम.राजन नाईक आणि विशेषतः दूरवरून आलेल्या हजारो नर्सिंग स्त्री- पुरुष विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानले असून वैद्यकीय क्षेत्र अधिक प्रगत व आधुनिक बनवण्यासाठी भविष्यातही असे ज्ञानवर्धक आणि कौशल्य विकास कार्यक्रम निरंतर आयोजित करत राहू, असा संकल्प देखील याप्रसंगी रिद्धी विनायक हॉस्पिटल व्यवस्थापनाने मनपूर्वक व्यक्त केला.

———————————————————————-

✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा !
Mymarathi7.com

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!