माणिकपूर परिसरातील फुर्टाडो टॉवर, बी के एस स्कुल येथील घटना : परिसरातील वीज पुरवठा खंडित : प्रचंड गर्मी आणि विजेचा वापर वाढल्याने ओव्हरलोड होऊन हा स्फ़ोट झालाय.

महावितरण आणि वसई विरार शहर महापालिकेचं अर्थपूर्ण दुर्लक्ष ? संयुक्त मोहीम राबवणं आवश्यक !
वसई विरार शहरात महावितरण च्या रोहित्र, मोठाले डी पी बॉक्स व विजेचे खांब यांच्या खाली, मध्य भागी आजही फेरीवाले आपले दुकान थाटून बिनधास्त धंदा करत आहेत, माणिकपूर च्या या घटनेत दुर्घटना स्थळी रोहित्र ठिकाणी दोन फेरीवाल्यांनी आपलं बस्तान ठोकलं होत या संदर्भात महापलिका,अतिक्रमण विभागा व महावितरण आणि पोलीस विभाग यांनी संयुक्त मोहीम राबवली तर अशा घटनानां आळा बसेल व कोणी जखमी किंवा जीवितहानी देखील होणार नाही
(संग्रहित V-PB)
वसई : -आशिष राणे
वसईच्या माणिकपूर येथील फुर्टाडो टॉवर व रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरण कं.च्या ट्रान्सफार्मर (रोहित्र) चा भीषण स्फोट झाल्याची गंभीर घटना घडली आहे
शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास झालेल्या या जोरदार स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,

Adv ✅
अचानक घडलेल्या या दुर्घटनेत दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माणिकपूर परिसरात ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण कं.चे ३१५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसवण्यात आले आहे. या रोहित्राद्वारे परिसरातील ३०० हून अधिक ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. शनिवारी सकाळी अचानक या रोहित्रातून ऑइल गळती सुरू झाली आणि काही वेळातच भर रस्त्यावर कडेला असलेल्या रोहित्राचा मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली.

Adv ✅
या घटनेची माहिती मिळताच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
मात्र, आगीची तीव्रता इतकी जास्त होती की, रोहित्रा जवळ असलेल्या विद्युत वाहिन्या आणि डीपी बॉक्स जळून पूर्ण खाक झाले आहेत. या स्फोटामुळे माणिकपूर परिसराचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.
वाढती मागणी व ओव्हरलोडमुळे घडला अपघात
पावसाळा सुरु झालाय मात्र पावसाच्या जागी प्रचंड कडक ऊन किंबहुना सूर्य आग ओकतोय त्यामुळे अति उकाड्यामुळे नागरिक एसी, कुलर आणि इतर उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत.
परिणामी, विजेचा वापर कमालीचा वाढला आहे. याच ओव्हरलोड मुळं हा भीषण अपघात घडल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Adv ✅
ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) नियमित तपासणीची मागणी
घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. वीज ग्राहकांना पुरवठा करणारी रोहित्रं, विद्युत वाहिन्या आणि डीपी बॉक्स सुस्थितीत आहेत की नाही, याची महावितरणने वेळोवेळी आणि नियमित तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे,” अशी मागणी वीज ग्राहक नेहमीच करत असतात मात्र त्यांच्या तक्रारी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते आणि अशा घटना घडतात.
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली !
महावितरणचे हे रोहित्र अत्यंत गजबजलेल्या आणि रहदारीच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे या रोहित्राजवळ फुटाडो रहिवाशी संकुल व बी के एस शाळा देखील आहे, जिथे नेहमीच विद्यार्थी आणि पालकांची मोठी वर्दळ असते.
मात्र, शनिवारी शाळेला सुट्टी असल्याने या मार्गावर नेहमी सारखी गर्दी नव्हती. त्यात नशीब रोहित्र ठिकाणी चारही बाजूस पत्रे लावले असल्यामुळे गरम ऑइल बाहेर दूरवर फेकलं गेलं नाही, त्यामुळे एक मोठा आणि जीवघेणा अनर्थ सुदैवाने टळला आहे.
✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा !
Mymarathi7.com
![]()
