Update : वसईच्या सनसिटीत फुटलेली सूर्याच्या जल वाहिनीचं दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर पूर्ण..

 

आठ तासांच्या दुरुस्ती नंतर नवघर माणिकपूर शहरात पाणीपुरवठा सुरळीत… घागर भरण्यास नागरिक सज्ज

वसई:- आशिष राणे

वसईच्या सनसिटीत शनिवारी दुपारी फुटलेली सूर्याची जल वाहिनीचं दुरुस्तीचं कामं पूर्ण करण्यात आले आहें. तब्बल आठ तास युद्धपातळीवर सुरु केलेल्या दुरुस्तीच्या कामांनंतर नवघर माणिकपूर शहरात आता पाणीपुरवठा सुरळीत आणि पूर्ववत झाला असून नवघर माणिकपूर शहरवासियं आता घागर भरण्यास सज्ज झाले आहेत.

Adv

वसई विरार शहर महापालिकेच्या प्रभाग समिती “एच” नवघर मणिकपूर शहर विभागास पाणी पुरवठा करणारी ६०० मि.मी व्यासाची सूर्या योजनेची जलवाहिनी शनिवार दि.२७ डिसेंबर रोजी दु.१.३० वाजता सनसिटी भागात नवीन टाकीचे पायलिंगचे काम चालू असताना नादुरुस्त (लिकेज) झाली होती.

दरम्यान पाणीपुरवठा विभागाने तात्काळ त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु केलं आणि हे काम शनिवारी रात्रीच ८ वाजता पूर्ण झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभाग नियंत्रक यांनी दिली आहे,
परिणामी सात ते आठ तासांच्या यां दुरुस्तीच्या कामास अंदाजे पाच ते सहा तास लागतील असे दुपारीच पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केलं होत.


मात्र दिलेल्या वेळेत पालिकेच्या बांधकामं व जल अभियंता टीम व त्यांच्या कामगारांनी हे काम पूर्ण केल्यानं आता शनिवारी रात्रीच नवघर माणिकपूर शहरातील बंद व विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत झाला आहें.

Adv

त्यामुळे एच प्रभागातील शहरात काही काळ उताणी झालेली घागर पुन्हा नळाखाली भरण्यास नागरिक सज्ज झाले आहेंत.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!