वर्दीतल्या माणसाची खरी नोंद : हा तर महाराष्ट्राच्या सुपुत्राचा योग्य सन्मान…
✅कष्ट, जिद्द.. मेहनत आणि शिक्षण आणि त्यावरूनचं आपली परिस्थिती बदलते… यावर ठाम आहेत दाते सर
✅मीं अनुभवलेले ते मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त…. सदानंद दाते सर
✅दातें सरांच्या स्पष्ट आणि कडक शिस्तीमुळे माझ्या सहित विविध माध्यमातील पत्रकार हीं प्रभावित आहेत…
अत्यंत सामान्य आणि प्रतिकूल परिस्थितीतून जीवन जगत आलेले दाते सर यांची साधी जीवनशैली आहें, मात्र कडक शिस्त, कर्तव्यात जराही चुकायचं नाही, सल्ला नको मात्र प्रत्यक्ष कृती वर भर देणाऱ्या कामाच्या शैलीसाठी दाते सर सर्वश्रुत ओळखले जातात.वर्दीतल्या त्या माणसाची सरकारने एक वेगळी नोंद घेतली आहें.
वसई:- आशिष राणे,✍️
अवघ्या महाराष्ट्र राज्याला ज्यांचा अभिमान राहिला आहें असे महाराष्ट्र राज्याचे लढवय्ये सुपुत्र (बॅच १९९० ) चे भारतीय पोलीस सेवेतील सनदी अधिकारी डॉ.सदानंद वसंत दाते यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक (DGP) पदाच्या नियुक्तीवर मंगळवार (दि.३० डिसेंबर ) रोजी शिक्कामोर्तब झाले होते,या संदर्भातला लेखी शासन आदेश महाराष्ट्र शासनाचे गृहविभागाचे सह सचिव सुग्रीव धपाटे यांनी दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी जारी केला आहें.
मागील महिन्यापासून राज्याला या निर्णयाची मोठी प्रतीक्षा होती कीं, राज्याचे नवे पोलीस महासंचालक कोण होणार ? अर्थात हे अत्यंत महत्वाचे असे पद वं त्याची गनिमा फार मोठी आहें.
दरम्यान राज्याच्या पोलिस महासंचालक डॉ.रश्मी शुक्ला आज दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने डॉ.दाते हे आज आपला पदभार स्वीकारतील.
एकूणच राज्याच्या पोलीस महासंचालक पदी कोण असेल त्यासाठी मागील महिन्यात राज्याच्या गृह विभागाने सात ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली होती.
याकरता राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख डॉ.सदानंद दाते यांचे नाव यात प्रामुख्याने चर्चेत होते. तसेच त्यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाने सातपैकी तीन नावांची निवड करून ती महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवली होती.अखेर त्यातूनच सदानंत दाते यांच्या नियुक्तीवर दि.३० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी शिक्कामोर्तब करण्यात आले.

Adv✅
विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र सरकारने त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) भारतीय पोलीस सेवा डॉ. रश्मी शुक्ला यांचा ‘महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक’ म्हणून कार्यकाळ दि.३ जानेवारीला २०२६ रोजी संपत आहे. त्यानंतर सदानंद दाते हे अधिकृत रित्या हा पदभार स्वीकारतील.
महाराष्ट्राच्या डीजीपीचा कार्यकाळ किती वर्षांचा असेल ?
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पॅनेलमेंट समितीने शिफारस केलेल्या पॅनेलमध्ये समाविष्ट असलेले सदानंद वसंत दाते, भारतीय पोलिस सेवा यांची ‘महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक (एचओपीएफ)’ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागानं असे हीं म्हटले आहे की, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित निकाल आणि आदेशांनुसार, ‘पोलीस महासंचालक (HOPF)’ या पदावर नियुक्त झालेल्या भारतीय पोलीस सेवेच्या अधिकाऱ्याचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. त्यानुसार, भारतीय पोलीस सेवेतील सदानंद वसंत दाते हे नियुक्तीच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी ‘पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य (HOPF)’ या पदावर राहतील.

Adv ✅
शिक्षण व घरखर्चा करता वृत्तपत्र विक्रेता ते डीजीपी पर्यंतचां प्रवास : दातेच्या विविध पदांचा चढता आलेख….
दरम्यान, सदानंद दाते हे मूळचे पुण्याचे आहेत. २००३ मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून ‘आर्थिक गुन्ह्यांचे निरीक्षण: व्यवस्थापन नियंत्रण प्रणाली दृष्टीकोन’ या विषयावर पीएचडी केली. भंडाराचे पोलीस अधीक्षक ते सीबीआय, मुंबई गुन्हे शाखा, फोर्स वन, सीआरपीएफ, कायदा मंत्रालय, मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालय आणि एटीएस अशा प्रत्येक भूमिकेत सदानंद दाते यांनी आपली छाप सोडली आहे.
मात्र खूप कमी लोकांना माहिती आहे की, सदानंद दाते हे त्यांच्या शैक्षणिक व घर खर्चासाठी सकाळी विविध वृत्तपत्र घरी टाकणे असं विक्रेता म्हणून काम करत होते. त्यांच्याबद्दल असे हीं म्हटले जाते की, कोणतेही सरकार किंवा कोणताही नेता त्यांच्यावर कोणतेही चुकीचे काम करण्यास दबाव आणू शकत नाही, कारण ते कोणत्याही चुकीच्या गोष्टीला लगेच नकार देतात. सदानंद दाते यांनी त्यांच्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत पोलीस खात्यातील दहशतवादविरोधी कारवाया, संघटनात्मक विकास, सामुदायिक पोलिसिंग आणि पोलीस कल्याण यासारख्या विविध विभागांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
विविध उल्लेखनीय पुरस्काराने सन्मानित..!
सदानंद दाते यांना महात्मा गांधी शांतता आणि सांप्रदायिक सद्भावना पुरस्कार, पोलीस पदक (प्रशंसनीय सेवेसाठी, 2007) आणि राष्ट्रपती पोलीस पदक (शौर्यासाठी, 2009) यांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सदानंद दाते दि.१ एप्रिल २०२४ पासून राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) महासंचालक (डीजी) होते. यापूर्वी त्यांनी सीबीआयमध्ये उपमहानिरीक्षक (डीआयजी), महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख, मुंबईतील सह पोलिस आयुक्त (गुन्हे आणि कायदा आणि सुव्यवस्था) आणि मीरा-भाईंदर, वसई-विरार उपप्रदेशाचे ते पहिले पोलिस आयुक्त म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम पाहिले आहे.
कष्ट, जिद्द.. मेहनत आणि शिक्षण आणि त्यावरूनचं आपली परिस्थिती बदलते… यावर ठाम आहेत दाते सर…
दाते यांनी वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी, सावित्रीबाई फुले, आणि पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट (पीएच.डी.), इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियामधून पात्र कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट आणि हम्फ्रे फेलोशिप अंतर्गत मिनेसोटा विद्यापीठात व्हाईट-कॉलर आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रणाचा अभ्यास केला आहे.
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तलयाची उत्तम वं सुनियोजित घडी बसवली…. डॉ दाते यांचं प्रभावी कार्य…
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे ते पहिले पोलीस आयुक्त म्हणून डॉ.सदानंद दाते यांना जो मान मिळाला होता त्याचं त्यांनी सोनं केलं वं ती घडी उत्तम प्रकारे बसवली. त्यावेळी त्यांची नियुक्ती सप्टेंबर २०२० मध्ये झाली आणि त्यांनी या नवीन आयुक्तालयाची स्थापना आणि सुनियोजित कामकाज सुरू करण्या सोबत येथील वाढती लोकसंख्या, गुन्हे गारीला आळा म्हणून नवीन पोलीस बळ वाढवणे,व त्याचबरोबर पोलीस ठाणी वाढवून कायदा वं सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अर्थात त्यांच्या अभ्यासू कार्यपद्धतीमुळे आणि कर्तव्यकठोर सेवेमुळं ते सर्वसामान्य नागरिकांना दाते सर हे अगदी सहज नावाने ओळखू लागले होते आणि आजही दाते सर उच्चपदस्थ अधिकारी म्हणून झाले असले तरी पोलीसांच्या समस्या, प्रश्नासोबत सर्वसामान्य नागरिकांचे हीं प्रश्न, समस्या, दाखल तक्रारी, गुन्हे आदी न्यायिक भूमिका बाबत ते आजही सामान्य अधिकारी म्हणूनच कार्य करतील आणि हिच त्यांची ख्याती राहिली आहें, किंबहुना महाराष्ट्र राज्याच्या सुपूत्राचा हा योग्य सन्मान झाला आहें हे म्हणणं वावगं ठरणारे नसेल.
प्रभावी काम आणि उत्कृष्ट सेवा..
✅मग तो मुंबई तील २६/११ चां आतंकवादी हल्ला असो…
✅पहलगामसह अनेक हाय प्रोफाइल प्रकरणाचा तपास
✅रवी पुजारी टोळी कमकुवत करण्याचे धाडस वं त्यात मिळालेलं श्रेय..
✅कसाबला तुरुंगातून ने आण करण्याची जबाबदारी
✅वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यदर्शना नंतरची मोठी चोख पोलीस बंदोबस्त जबाबदारी..
✅मीं अनुभवलेले ते मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त…. सदानंद दाते सर

✅दातें सरांच्या स्पष्ट आणि कडक शिस्तीमुळे माझ्या सहित विविध माध्यमातील पत्रकार हीं प्रभावित..
अत्यंत सामान्य आणि प्रतिकूल परिस्थितीतून जीवन जगत आलेले दाते सर यांची साधी जीवनशैली आहें, मात्र कडक शिस्त, कर्तव्यात जराही चुकायचं नाही, सल्ला नको मात्र प्रत्यक्ष कृती वर भर देणाऱ्या कामाच्या शैलीसाठी दाते सर सर्वश्रुत ओळखले जातात.
हे मीं वं माझ्या सहकारी पत्रकांरांनी त्यावेळीचं म्हणजे दाते सर मीरा भाईंदर – वसई विरार आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले तेव्हाचं ओळखले..
त्यांची कार्यपद्धती, फारच सुरेख होती.. अधिकारी घाबरायचे पण हीं भीती आदरयुक्त होती, मग माध्यमासाठी प्रतिक्रिया असतील, किंवा सोशल मीडियावर माहिती किंवा मोबाईल उचलणे, मेसेजला लागलीच रिप्लाय देण्याची पद्धत फारच वाखण्याजोगी आहें, आजही मीं मागील महिन्यात त्यांचं नाव लोकसेवा आयोग म्हणजे दिल्ली च्या केंद्रात पाठवलं त्यावेळी मीं कदाचित वसईहून दाते सरांना मोबाईल फोन करणारा पहिलाच असेल, मात्र आपल्या ओळखीचा आय पी एस दर्जाचा एक दिल्ली तील एक उच्चपदस्थ अधिकारी आणि त्यांना मीं “पोलीस महासंचालक” म्हणून आधीच शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांनी माझ्या शुभेच्छा आनंदाने कबूल केल्या मात्र, त्यांनी सांगितले कीं, (Thank you but let’s wait ) आधी होऊ दे आणि हासून अगदी आंनदाने बोलल्यावर फोन ठेवला.
बघा ना..किती सहजपणे त्यांनी मला समजावलं.
असं म्हणतात कीं पोलीस आयुक्त रुजू होण्यापुर्वीच त्यांनी वसई विरारला मुक्काम ठोकला होता, प्रत्यक्षात पोलीस आयुक्त म्हणून येण्यापूर्वीचं त्यांनी संपूर्ण वसई विरार क्षेत्र पिंजून काढलं होतं.
पत्रकार परिषद किंवा त्यांना पुष्पगुच्छ देतांना कोणी फोटो ग्राफी वं प्रसिद्धी करणे त्यांना सहसा आवडत नाही : मुळातच नाही. दुसरीकडे दाते खाजगी कार्यक्रमांना उपस्थित राहताना अनेकदा त्यांच्या अधिकृत वाहनावरील तारे ते झाकून ठेवतात, माझ्या मुंबईतील काही पत्रकांरांनी त्यांचा अनुभव शेअर केला होता, कीं,एकदा, दिल्लीत प्रतिनियुक्तीवर असताना, मुंबईचे काही पत्रकार त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा दाते सर पत्रकारांसोबत रस्त्यावरून चालत जात होते. त्यावेळी सिग्नलवर वाहतूक नव्हती, त्यामुळे पत्रकारांनी लागलीच तो रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला, असता शिस्तप्रिय सदानंद दाते सरांनी त्या सर्व पत्रकारांना तात्काळ थांबवलं होतं आणि म्हटले की, मी तेव्हाच रस्ता ओलांडणार जेव्हा पादचाऱ्यांसाठीचा सिग्नल हिरवा असेल. अशा खूपच बारीक सारीक मोठ्या मात्र अनुभव घेण्याजोग्या गोष्टी नीं बऱ्यापैकी माझ्या सहित पत्रकारांना दाते यांनी प्रभावित केले आहें.
एक खरं आहें कीं दाते सरांच्या लेकी जिद्द मेहनत कष्ट आणि महत्वाचे शिक्षण घेतले कीं माणसांची परिस्थिती बदलते मग कितीही अडचणीचा डोंगर असो या आणि अशा अनेक कार्यवाही जबाबदाऱ्या त्यानी उत्तम प्रकारे सांभाळून ते आज या सर्वोच्च पदावर पोचले आहेत..आणि दाते सर मला पत्रकार म्हणून ओळखतात याचा मला सार्थ अभिमान आहें.असो. दाते सरांना आणि त्यांच्या महाराष्ट्र पोलीस विभागाला त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.. 🙏💐
काय आहें गृह विभागाचा आदेश…

![]()
