मागील 2 महिन्यांची प्रतिक्षा संपली : उपनिबंधक कुमार चव्हाण लवकरच स्विकारणार पदभार !

दरम्यान मागील साडेतीन वर्षाहुन अधिक कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केलेले सहकारी संस्था, वसईचे तत्कालीन तालुका उपनिबंधक अमर शिंदे यांची व पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी या दोघांची राज्य शासनाने दि.30 एप्रिल 2026 रोजी प्रशासकीय कारणास्तव नियमित बदली केली होती,मात्र पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांना नवीन पद स्थापना दिली गेली नाही मात्र त्यांच्या जागी तात्काळ ठाणे मधून किशन रत्नाळे यांची नियुक्ती झाली व अमर शिंदे यांना ठाणे शहरात नियुक्ती देण्यात आली अगदी त्यावेळेपासूनचं मागील दोन महिने हें वसईच पद रिक्तचं होते,
वसई :- आशिष राणे ,वसई
मागील दोन महिन्यापासून वसई तालुका सहकारी संस्था उपनिबंधक ही “काटेरी मुकुट” पदाची ही महत्वाची जागा रिक्त होती, तर शासनाने नव्या नियुक्ती पर्यंत येथील तात्पुरता पदभार पालघरचे सहाय्यक निबंधक विनय शिंदे यांच्याकडे सोपवला होता,
मात्र आता वसईकरांची ही मोठी प्रतिक्षा संपली असून महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने, महाराष्ट्र राज्य सहकारी अपिल न्यायालय, मुंबई येथे निबंधक म्हणून कार्यरत असलेले कुमार चव्हाण यांची उपनिबंधक, सहकारी संस्था, वसई या जागी नियुक्ती केली आहे,

☝️Adv✅ या संदर्भात सहायक निबंधक सहकारी संस्था गट -ब (राजपत्रित ) या संवर्गातून उपनिबंधक सहकारी संस्था गट -अ या संवर्गात पदोन्नती व पदस्थापना देण्याबाबतचे तसे लेखी आदेश महाराष्ट्र शासन, सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाचे उपसचिव यांनी दि.29 जून रोजीच्या आदेशाने काढले आहेत.
त्यानुसार यदा कदाचित गुरुवार दि.2 जुलै 2026 रोजी दुपारी अथवा लवकरच नवनियुक्त वसई उपनिबंधक कुमार चव्हाण हें आपला वसई तालुका उपनिबंधक पदाचा पदभार पालघरचे सहायक निबंधक विनय शिंदे यांच्याकडून स्विकारतील अशी माहिती वसई येथील उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

☝️Adv ✅ पालघर -ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सार्वत्रिक निवडणूक, तसेच जीं डी सी ए च्या परीक्षा, आणि सहकार विभागातील नियमित बदल्या- पदोन्नती यांच्या आदेशाला विलंब होणार होता,
अर्थात वसई तालुक्या सारख्या सहकाराच्या तालुक्यातील नागरिकांच्या असंख्य विविध कामकाजा विषयीची गैरसोय नको म्हणून येथील पदभार शासनाने त्याचवेळी तात्पुरता स्वरूपात पालघरचे सहायक निबंधक विनय शिंदे यांच्याकडे सोपवला होता,
मात्र सहायक निबंधक विनय शिंदे हें आठवड्यातून दोनचं दिवस वसईला भेट देत होते किंबहुना त्यांच्याकडे पालघर, चा मूळ पदभार त्यात वसई व अन्य तालुक्याचा ही अतिरिक्त पदभार होता,
एकूणच आता वसई तालुक्यास पूर्ण वेळ उपनिबंधक मिळाल्याने आजवर रखडलेली कामें, दावे आता नियमित व मार्गी लागण्यास मदत मिळणार आहे.

☝️Adv ✅ अर्थात नवनियुक्त उपनिबंधक कुमार चव्हाण यांनी निबंधक,महाराष्ट्र राज्य सहकारी अपिल न्यायालय, मुंबई व अन्य विविध जिल्हातील त्यांच्या आतापर्यंतच्या उत्तम कामकाजाची पार्श्वभूमी राहिली असल्यानेच त्यांना राज्य शासनाने सहकाराचा हा तालुका म्हणुन वसईत धाडले आहे,
किंबहुना ते या वसईत आपला राज्य सहकारी अपिल न्यायालयाचा निबंधक पदाचा अनुभव आणि संस्थात्मक तक्रारी, दावे आदी प्रकरणा बाबतचा “न्यायिक ठसा” कसा उमटवतात हे पाहणे नक्कीच आव्हानात्मक असेल.
✅काय आहे शासन आदेश

✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा !
Mymarathi7.com
![]()
