सेवेत बेशिस्त वर्तन : अदानी कंपनीस परस्पर पत्र पाठवल्याचा ठपका…

निलंबित करण्यात आलेले अधिक्षक अभियंता मदन सांगळे यांनी दोन दिवसांपूर्वी अदानी कंपनीस परस्पर पत्र पाठवून, या पुढे घरगुती ग्राहकाचे वीज मीटर पूर्व संमती पत्र न घेता परस्पर बदलल्यास , यातून होणारे वाद, आंदोलन झाल्यास याची जबाबदारी आपल्यावर राहील. असे पत्रात नमूद करण्यात आले होते.
कल्याण /वसई :- आशिष राणे
स्मार्ट मीटर लावण्यास विरोध करणारे पत्र अदानी कंपनीस वरिष्ठांना न कळवता परस्पर पाठवल्याच्या कारणास्तव महावितरणच्या पालघर मंडळ कार्यालयाचे अधिक्षक अभियंता मदन सांगळे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती कल्याण कोकण प्रादेशिक कार्यालयाचे
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे.

Adv✅
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक यांच्या स्वाक्षरीने निलंबन आदेश नुकतेच जारी करण्यात आले.
निलंबित अधिक्षक अभियंता मदन सांगळे यांनी दोन दिवसांपूर्वी अदानी कंपनीस परस्पर पत्र पाठवून, या पुढे घरगुती ग्राहकाचे वीज मीटर पूर्व संमती पत्र न घेता परस्पर बदलल्यास , यातून होणारे वाद, आंदोलन झाल्यास याची जबाबदारी आपल्यावर राहील. असे पत्रात नमूद करण्यात आले होते.

Adv✅
दरम्यान केंद्रीय विद्युत प्राधीकरण, भारत सरकारचे राजपत्र, तसेच मुख्य कार्यालयाकडून देण्यात आलेल्या सुचनेनुसार भारतीय वीज कायदा २००३ कलम ५५ नुसार वीज ग्राहकांना दोष रहित वीज मीटरची जोडणी देऊन अचूक वापराची नोंद ठेवणे ही वीज वितरण कंपनीने स्वतः हून अंमलबजावणी करण्याची बाब आहे.

Adv✅
मात्र अधिक्षक अभियंता मदन सांगळे यांनी परस्पर पत्र लिहून बेशिस्त वर्तन केले. यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे कल्याण,कोकण प्रादेशिक कार्यालय,
यांनी स्पष्ट केलं आहे.
✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा !
Mymarathi7.com
![]()
