क्रीडा संकुलाची सातत्याने पाहणी : उद्देश सफलां ने ठाकुरांचे समाधान…
मग त्यामध्ये तालुका, राज्य , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाव उज्वल करत आहेत. राष्ट्रीय क्रीडासंकुल उभारले गेले तर सरावाची संधी व त्यातून अनेक स्पर्धक तयार होतील हा एकमेव उद्देश ठेवून हे क्रीडा संकुल उभारण्यात आल्याची माहिती बविआने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

वसई :- आशिष राणे
पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना सराव व स्पर्धेसाठी खेळाचे भव्य दालन विरार येथे उभारले गेले आहे राष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल खेळाडूंना फायदेशीर ठरणार असून , बविआ अध्यक्ष व माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे खेळांडूंसाठी हे व्हिजन पूर्णत्वास येत आहे या क्रीडा संकुलाची माजी आमदार क्षितिज ठाकूर हे सातत्याने पाहणी करत आहेत.

वसई विरार शहर महापालिकेच्या माध्यमातून बोळींज म्हाडा वसाहत आरक्षण क्र १६२ मध्ये क्रीडा संकुल व क्लब हाऊस उभारण्यासाठी घोषणा करण्यात आली होती त्यानुसार आता हे काम पूर्ण झाले असून सराव करण्यासाठी खेळाडूंना चांगले क्रीडासंकुल मिळणार असल्याने सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झाला आहे.

या क्रीडासंकुलात 400 मीटरचा सिंथेटिक ट्रॅक, टेबल टेनिस , बॉक्सिंग , मार्शल आर्ट ,तरणतलाव , बास्केटबॉल , बॅडमिंटन कोर्ट , फुटबॉल , लांब ,उडी भालाफेक, थाळीफेक यासह अन्य खेळांसाठी क्रीडासंकुलात सराव करता येणार आहे,
जेणेकरून खेळाडूंना भविष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल.
दरम्यान माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून .वसई तालुका कला क्रीडा सुरु झाला यात आता हजारो खेळाडू सहभागी होत आहे. तर वसई विरार महानगरपालिकेतर्फे नऊ प्रभागातून कला क्रीडा महोत्सवातून स्पर्धा भरविल्या जातात त्याचा फायदा खेळाडूंनाच होत असतो.
मग त्यामध्ये तालुका , राज्य , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाव उज्वल करत आहेत. राष्ट्रीय क्रीडासंकुल उभारले गेले तर सरावाची संधी व त्यातून अनेक स्पर्धक तयार होतील हा एकमेव उद्देश ठेवून हे क्रीडा संकुल उभारण्यात आल्याची माहिती बविआ ने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

इतकंच नव्हे तर भव्य क्रीडा संकुलात विविध खेळांना प्राधान्य देण्यात आले आहे अर्थात विरार पालिका मुख्यालय नजीक असलेल्या या क्रीडा संकुलाला माजी आमदार क्षितिज ठाकूर हे भेट देत असून अंतिम कामाची पाहणी देखील करत आहेत.

त्यामुळे येथील खेळाडूंसाठी सर्व सुविधा संपन्न क्रीडा संकुल उभारले गेले असल्याने याचा सर्वाधिक फायदा तालुका -जिल्ह्यातील स्पर्धकांना उंचीवर नेण्यासाठी होणार आहे, किंबहुना त्यामुळे क्षितिज ठाकूर यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
******************************************
✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा ! Www.Mymarathi7.com
![]()
