पदभार स्विकारल्यावर घेतली राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट..!
दुसरीकडे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, तसेच समस्त नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या संरक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या राज्याच्या पोलीस दलाला डॉ. दातें सारखा एक प्रामाणिकपणे काम करणारा अधिकारी मिळाला आहें. त्यानुसार डॉ.दातेंच्या कार्यकाळात पोलीस दलास व नागरिकांना एक नवा आयाम मिळेल, असा दृढ विश्वास देखील या नियुक्तीमुळे राज्यातील जनमाणसांत निर्माण झाला आहे.

वसई :- आशिष राणे
प्रामाणिक, कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी अशी देशभर ख्याती असलेले वरिष्ठ आय.पी.एस अधिकारी डॉ.सदानंद वसंत दाते यांनी शनिवारी सायंकाळी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला आहें.
सेवानिवृत्त पोलीस महासंचालिका श्रीमती. डॉ. रश्मी शुक्ला यांच्याकडून आपला पदभार स्विकारल्यावर त्यांनी माझ्या कार्यकाळात महाराष्ट्र पोलीस दल त्यांचे नेतृत्व आणि अनुभवाने अधिक सक्षम होईल असा आत्मविश्वास ही महाराष्ट्र पोलीस दलाला देत ही धुरा सांभाळली आहें.

त्यानंतर सायंकाळी उशिरा महाराष्ट्र पोलीस महासंचालक पद आणि कार्यालयाचा पदभार स्विकारल्यावर डॉ. दाते यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “वर्षा” निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली,यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

दि. ३ जानेवारी २०२६ रोजी राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक श्रीमती.डॉ.रश्मी शुक्ला या सेवानिवृत्त झाल्या त्यांना शनिवारी दिवसभरात राज्याच्या (गृह ) पोलीस विभागाच्या वतीनं चालत आलेल्या प्रथा परंपरेनुसार अगदी शासकीय दिमाखदार सोहळ्यात वाजत गाजत सन्मानांने “गार्ड ऑफ ऑनर” असा निरोप देण्यात आला.

दरम्यान श्रीमती डॉ.शुक्ला यांचा सेवानिवृत्तीचां कार्यक्रम पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे उत्साहात पार पडला.
याप्रसंगी शिस्त, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक असलेले त्यांचे नेतृत्व पोलीस दलाला व राज्यांतील जनतेला सदैव प्रेरणादायी राहील तसेच सेवानिवृत्ती निमित्त त्यांना भावी वाटचालीसाठी महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व उपस्थित अधिकाऱ्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

आपल्या सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभा दरम्यान भावनिक प्रतिक्रिया देताना श्रीमती. डॉ.रश्मी शुक्ला म्हणाल्या कीं, मीं गेली ३७ वर्षे पोलीस दलात सेवा केल्यानंतर, मी भारतीय पोलीस सेवेतून आज दि.३ जानेवारी रोजी निवृत्त होत आहे. ही एक अतिशय जुनी आठवण आहे. महाराष्ट्र पोलिसांनी मला खूप काही दिले आणि मी खूप काही शिकले ही आहे. महाराष्ट्र पोलिसांना नवीन उंचीवर नेण्यासाठी सर्वांनी एका टीमसारखे काम केले. मी खूप समाधानी आहे आणि महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगले आयुष्य आणि आरोग्य मिळावे यासाठी देखील प्रार्थना करते.”
सेवानिवृत्ती नंतर डॉ. शुक्ला आणि मुख्यमंत्री फडवणीस भेट.!

असे म्हणत शेवटी त्यांनी सर्वांचा निरोप घेत राज्याचे मुख्यमंत्री फडवणीस यांची वर्षा निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी डॉ. शुक्ला यांच्या आतापर्यंतच्या यशस्वी कारकिर्दी बाबत मनःपूर्वक शुभेच्छा देऊ केल्या.
![]()
