पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांचे आम.स्नेहाताई दुबे पंडित यांच्या समवेत आलेल्या शिष्टमंडळाला ठोस आश्वासन”या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. आयुक्तांनी सांगितले की,

“विद्यार्थिनींचे सुरक्षित शिक्षण हे आमच्यासाठी प्राधान्याचे आहे, तसेच या प्रकरणातील सर्व बाजूंची सखोल चौकशी आणि निष्पक्ष तपास तातडीने करण्यात येईल.”असे ही स्पष्ट केले
वसई:- आशिष राणे
विरार पश्चिम येथील एका प्रसिद्ध महाविद्यालयीन शिक्षण संस्थेत एफ.वाय.बी.कॉम मध्ये (FYBcom) शिकणाऱ्या कु. रिचा सचिन पाटील या १९ वर्षीय विद्यार्थिनीने दि.१३ ऑक्टोबर २०२५ रोजी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
या घटनेने संपूर्ण वसई-विरार शहर हादरले असून समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे कु.रिचा ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत होती त्यामधीलचं काही विद्यार्थ्यांसह इतर बाहेरील व्यक्ती या घटनेला जबाबदार असून त्या विरारच्या महाविद्यालय प्रशासनाने या घटनेपूर्वीची तक्रार योग्यरित्या हाताळली असती तर ही घटना टाळता आली असती असे मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून कु.रिचा पाटील हिच्या आत्महत्ये मागील कारणांचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सर्व थरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवारी मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयात वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांची भेट घेतली.
या भेटीत कु.रिचा पाटील आत्महत्या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आयुक्त कौशिक यांच्याकडे करण्यात आली.
या शिष्टमंडळात सर्वश्री भाजपा वसई-विरार शहर जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील, जिल्हा सरचिटणीस जोगेंद्र प्रसाद चौबे, बिजेंद्र कुमार,मनोज बारोट,भूषण किणी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा ज्योत्स्ना मेहेर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विनीत तिवारी आणि योगेश सिंह व अश्विन सावरकर यांचा सहभाग होता.
दरम्यान याप्रसंगी आमदारांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन देताना सांगितले की, “ही घटना फक्त एका विद्यार्थिनीची नाही तर असंख्य मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित करणारी आहे.
कु.रिचा सारख्या निष्पाप विद्यार्थिनींना शिक्षणाच्या ठिकाणी असुरक्षितता जाणवणे ही चिंतेची बाब आहे आणि म्हणूनच या प्रकरणातील दोषींना कायद्याच्या चौकटीत राहून कठोर शिक्षा होणे अत्यावश्यक आहे.
परिणामी या भेटी वेळी पोलिस आयुक्तांनी उपस्थित शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींना कोणतीही दया दाखवली जाणार नाही.
आयुक्तांनी सांगितले की, “विद्यार्थिनींचे सुरक्षित शिक्षण हे आमच्यासाठी प्राधान्याचे आहे, तसेच या प्रकरणातील सर्व बाजूंची सखोल आणि निष्पक्ष तपास तातडीने करण्यात येईल.”असे ही स्पष्ट केले.
एकूणच या घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजातील सर्व पालकांनी एकत्र येऊन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा गांभीर्याने घ्यावा असे ही आवाहन वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी वसईकरांना केलं आहे.
![]()
