आय.ए.एस दर्जा प्राप्त अनिलकुमार ईडी पुढे काय नेमकी उजळणी करणार ?
दि २९ जुलै रोजी ७ वा.सकाळी माजी आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या वसईतील शासकीय निवासस्थानी टाकण्यात आलेल्या छाप्यात संशयित कागदपत्रे, डिजिटल पुरावे, हार्डडिस्क व अन्य जिल्ह्यात नातेवाईकांकडे टाकलेल्या छाप्यांत
₹ १.३३ कोटींची रोकड व बेहिशोबी मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे ईडीने जप्त केली, या धडक कारवाईत पवार यांनी जानेवारी २०२२ ते १७ जुलै २०२५ असे (४३ महिने) म्हणजेच तब्ब्ल साडेतीन वर्षात व त्याही पलीकडे जाऊन बदली आदेशानंतर ही ११ दिवस अतिरिक्त कामकाज केलेल्या अनेक गंभीर कारनाम्यांचा पडदा ईडीच्या अधिकाऱ्यांनी टरा…टरां.. फाडलायं, तर पुढील काळात अशा अनेक प्रश्नाची उत्तरे आता माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना त्यांच्या पत्नी सहित त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना ही दयावयाची आहेत आणि म्हणूनच आता ही दोन समन्स ईडीकडून खालीलप्रमाणे बजावण्यात आली आहेत.
१) समन्स प्रत : बुक नं. ५९ अनु.क्रं.२९२१
श्री.अनिल खंडेराव पवार, वेळ : सकाळी ११ वाजता, ठिकाण :- वरळी, मुंबई
२) समन्स प्रत : बुक नं. ५९ अनु.क्रं.२९२२
सौं.भारती अनिल पवार वेळ : सकाळी ११ वाजता, ठिकाण :- वरळी, मुंबई

वसई :- आशिष राणे
वसई-विरार शहर महापालिकेचे “महान रत्न” माजी आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या वसईतील शासकीय निवासस्थानी ईडीने दि.२९ जुलै रोजी छापा टाकल्यानंतर आता (ईडी ) सक्तवसुली संचलनालय ऍक्शन मोड मध्ये आली आहे
या संदर्भात दि.१ ऑगस्ट रोजी (ईडी ) ने पवार दाम्पत्यासं समन्स बजावले असून त्याच्या दोन्ही समन्स कॉपी मायमराठी7.Com च्या हाती लागल्या आहेत.
विशेष म्हणजे ईडीने केवळ पवार यांनाच समन्स बजावलं नाही तर त्यांच्या समवेत यांच्या सुविद्य पत्नी भारती अनिल पवार यांना ही स्वतंत्र समन्स बजावले असून दोघांना कागदपत्रे घेऊन चौकशीला उपस्थित राहण्याचं समन्स ईडीचे तपास अधिकारी प्रदयूमन शर्मा यांनी दि. १ ऑगस्ट रोजी काढल्याचे समन्स कॉपी वरून समजते.
ईडीने या प्रकरणी मंगळवार दि.२९ जुलै रोजी माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या वसईतील शासकीय निवासस्थानासह महाराष्ट्र राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, सटाणा अशा विविध जिल्ह्याच्या १२ ठिकाणी छापे टाकले त्यात पवार यांच्या नाशिक येथील पुतण्याकडे रू.१ कोटी ३३ लाख रुपयांची रोकड व काही मालमत्ताची कागदपत्रे मिळाली असता ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहेत.
ईडीला हवीत ” म्होरक्या” पवारांकडून उत्तरे ?
या एकूणच गंभीर धाडसत्र प्रकरणानंतर माजी आयुक्त पवार यांचं वसई विरार महापालिका प्रशासना तील त्यांनी चालवलेलं सिंडीकेट,बिल्डर्स, आर्किटेक, लाईझनर, ठेकेदार, दलाल यां सर्वाना सोबत घेऊन त्यांचा म्होरक्या म्हणून बजावलेली अतिशय महत्वाची भूमिका, दुसरीकडे दि.१७ जुलै रोजी ठाणे शहरात एस आर ए अंतर्गत सी ई ओ म्हणून बदली झाल्यानंतर देखील तब्ब्ल ११ दिवसात मंजूर केलेल्या त्या अंदाजित १३० हुन अधिक संशयित बांधकाम परवानग्या, अन्य महत्वाच्या फाईल्स खास म्हणजे ( उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांना निलंबित केल्यावर देखील ही जागा महिना दीड महिना रिक्त असताना रेड्डी च्या ही सर्व फाईल्स स्वतः च्या विशेष अधिकारात तपासून त्या मंजूर केल्याचा दाट संशय आहे ) तसेच ४१ इमारतीचे अनधिकृत बांधकामं व त्यावरील तोडक कारवाई असेल किंवा आरक्षण बदलणं, आणि नातेवाईकांच्या सहकार्याने तयार केलेल्या विविध संस्था (शेल कंपन्या) प्रति चौरस फूट २५ फूट असे कमिशन पोटी घेणारे आयुक्त पवार यांनी हा पैसा अन्यत्र वळवला,अशा नानाविध प्रकरणी ईडीला याबाबत अनेक प्रश्न व त्यांची उत्तरे यांची अधिक माहिती घेण्यासाठी ईडीने अनिलकुमार पवार व त्यांच्या पत्नी भारती पवार अशा दोघांना समन्स बजावले आहे.
या धाडसत्र प्रकरणी पवार यांच्यासह एकूण सहा जणांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे,
मात्र पैकी दोनच समन्स समोर आले आहेत. खरं तर पवार यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली असली तरी त्यांनी या प्रकरणामुळे नवीन पदभार घेतलेला नाही ते अदयाप ही शासकीय निवासस्थानीच आहेत किंबहुना ते ईडीच्या वाऱ्या मुळे आता कुटूंबासह मुंबईत वास्त्यवास आहेत.
मात्र त्यांचं सर्व सामान अजूनही वसईतच आहे,असे समजते,विशेष म्हणजे ईडी ने दि.१ ऑगस्ट रोजी बजावलेल्या दोन्ही समन्स मध्ये त्यांचा राहण्याचा पत्ता देखील वसई पश्चिम स्थित पं. दीनदयाळ नगर असा स्पष्ट लिहिला आहे. त्यामुळे बदली होऊन दुसरा महिना उगवला तरीही पवार यांना वसई महापालिकेचं शासकीय निवास स्थान व वसई सोडवतच नाही हेच त्रिवार सत्य आहे.
आय.ए.एस दर्जा प्राप्त पवार ईडी ला नेमकी कशी उत्तरे देणार ?
अर्थात दि.४ ऑगस्ट रोजी माजी आयुक्त अनिलकुमार पवार पती व पत्नी भारती पवार यां दोघांना ईडीने समन्स बजावून हजर राहण्यास सांगितलं आहे
आता पाहू या याठिकाणी हजर राहून हे दोघे ईडीच्या अधिकाऱ्यांना कशाप्रकारे यां संपूर्ण प्रकरणाबाबत लेखी म्हणणे सादर करणार हे नंतरच कळू शकेल.

माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल होणार ? सुपडा साफ होणार
दुसरीकडे दोनच दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने उशिरा का होईना निलंबीत उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्या वतीने आचोळे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे रेड्डी यांच्या नालासोपारा पूर्व व हैद्राबाद येथील निवास स्थानी दि १४ मे व १५ मे रोजी ईडीने धाडी टाकल्या होत्या त्यात रेड्डी कडे २३कोटी चे सोने हिरे जडीत दागिने व ८.३कोटीची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानुसार आता माजी आयुक्त यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सूत्राकडून समजतंय.त्यामुळे भविष्यात पवार यांच्या संबंधित कलाकार मंडळीसह सर्वांच्या अडचणीत कमालीची वाढ होणार आहे कारण ईडी कडे जबरदस्त पुरावे हाती लागले आहेत आणि ईडी पुढील काही महिने वसई विरार मध्ये ठाण मांडून सर्व सुपडाच साफ करणार याबाबत अजिबात शंका नाही
ईडीने बजावलेली दोन खालील प्रमाणे ही समन्स पहा…

![]()
